14 September 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

देशात 80 नव्या रेल्वे गाड्या धावणार:
देशात 80 नव्या रेल्वे गाड्या धावणार:

14 September 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (14 सप्टेंबर 2020)

टिकटॉक अॅपची भागीदारी मायस्क्रोसॉफ्ट विकणार नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

 • चिनी कंपनी बाईटडान्सची मालकी असलेल्या ‘टिकटॉक’ या प्रसिद्ध व्हिडिओ शेअरिंग अॅपची भागीदारी मायस्क्रोसॉफ्ट विकणार नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
 • मायक्रोसॉफ्टने स्वतः ही माहिती दिली आहे. दरम्यान, अमेरिकेत टिकटॉकच्या कार्यात्मकतेची भागीदारी विकणे किंवा हे अॅप बंद करण्याची कालमर्यादा लवकरच समाप्त होणार आहे.
 • या पार्श्वभूमीवर हा निर्णय समोर आला आहे. त्यामुळे अमेरिकेत आता टिकटॉक बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
 • ट्रम्प यांच्याकडून बाइटडान्स कंपनीला टिकटॉकचे कार्यात्मकता (ऑपरेशन्स) अमेरिकेत सुरु ठेवण्यासाठी त्याची भागीदारी अमेरिकन कंपनीला विकण्यासाठी 15 सप्टेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

दहा हजार अतिमहत्त्वाच्या भारतीयांच्या हालचालींवर एक मोठी तंत्रज्ञान कंपनी पाळत ठेवून:

 • राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री, प्रमुख विरोधी पक्षनेते, अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आणि सरन्यायाधीश यांच्यासह सुमारे दहा हजार अतिमहत्त्वाच्या भारतीयांच्या हालचालींवर चीनस्थित एक मोठी डिजिटल तंत्रज्ञान कंपनी पाळत ठेवून असल्याची माहिती हाती आली आहे.
 • चीनच्या आतापर्यंतच्या कायापालटात आणि ‘हायब्रीड वॉरफेर’मध्ये माहिती तंत्रज्ञानाचा वापर करणारी ‘आद्य संस्था’ असे म्हणवून घेणाऱ्या या कंपनीचे नाव ‘झेनुआ डाटा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कंपनी लिमिटेड’ असे आहे.
 • चीन सरकार आणि कम्युनिस्ट पक्षाशी संबंधित असलेल्या या कंपनीचे मुख्यालय शेन्झेन शहरात आहे. ही कंपनी केवळ महत्त्वाच्या आणि अतिमहत्त्वाच्या राजकीय नेत्यांवरच नजर ठेवून नाही, तर अनेक राजकीय संस्था आणि उद्योगांवरही ती हेरगिरी करीत आहे.
 • राजकारण ते उद्योग आणि न्यायव्यवस्था ते माध्यम या यंत्रणांवरही ही कंपनी हेरगिरी करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. इतकेच नव्हे तर भारतातील सर्व क्षेत्रांतील गुन्हेगारांचा तपशीलही या कंपनीकडे आहे.

देशात 80 नव्या रेल्वे गाड्या धावणार:

 • देश अनलॉक होत असताना केंद्रानं आता रेल्वे प्रवासालाही परवानगी दिली आहे. लॉकडाउनमध्ये सुरु असलेल्या विशेष रेल्वेच्या संख्येत केंद्र सरकारनं वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
 • आजपासून देशात 80 नव्या रेल्वे गाड्या धावणार आहेत. या गाड्यांसाठी 10 सप्टेंबर पासून तिकीट आरक्षणास सुरुवात झाली आहे.
 • आगामी काळ प्रमुख सणासुदीचा काळ असल्याने रेल्वेकडून विशेष ट्रेनची संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे दिसत आहे. दसरा, दिवाळी, छठ पुजा सारखे सण पुढील काळात असल्याने या दरम्यान रेल्वेची संख्या वाढवण्याची मागणी होत असते.
 • शिवाय, रेल्वेंमध्ये गर्दी देखील वाढत असते. हे बाब लक्षात घेता रेल्वेकडून 80 नव्या विशेष रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
 • मुंबई, कोलकाता, लखनऊ, पाटणा, दिल्ली या मार्गांवर विेशेष रेल्वे धावणार आहेत. सध्या विशेष रेल्वेच्या नावाने 230 एक्स्प्रेस रेल्वे चालवल्या जात आहेत. ज्यामध्ये 30 राजधानी एक्स्प्रेसचा समावेश आहे.

हॅमिल्टनला जेतेपद- टस्कन ग्रां. प्रि. फॉम्र्युला-वन शर्यत:

 • मर्सिडिझ संघाच्या लुइस हॅमिल्टन याने अपघातामुळे व्यत्यय आणलेल्या टस्कन ग्रां. प्रि. फॉम्र्युला-वन शर्यतीत आपले कसब पणाला लावत विजेतेपद मिळवले.
 • आपल्या कारकीर्दीतील 90वे जेतेपद मिळवणारा हॅमिल्टन हा मायकेल शूमाकरच्या विक्रमी जेतेपदांपासून फक्त एका विजयाने दूर आहे.
 • मुगेलोच्या अवघड ट्रॅकवर प्रथमच झालेल्या या शर्यतीत पहिल्या सात फेऱ्यांदरम्यान दोन अपघात नोंदवले गेल्यामुळे सहा ड्रायव्हर्सना शर्यतीतून माघार घ्यावी लागली.

दिनविशेष :

 • शिक्षणतज्ज्ञ व विचारवंत यमुनाबाई हिर्लेकर यांचा जन्म 14 सप्टेंबर 1901 मध्ये झाला.
 • सन 1948 मध्ये दोन तासांच्या चकमकीनंतर भारतीय सैन्याने दौलताबादचा किल्ला जिंकून घेतला.
 • 14 सप्टेंबर 1949 मध्ये हिंदी हि भारताची राष्ट्रभाषा म्हणून घोषित करून हिंदी दिन साजरा केला.
 • सन 1960 मध्ये ऑर्गनायझेशन ऑफ द पेट्रोलियम एक्स्पोर्टिंग कंट्रीज (OPEC) ची स्थापना झाली.
 • मायक्रोसॉफ्ट कंपनीने वर्ष 2000 मध्ये विंडोज एमई रिलीज केले.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.