14 September 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

14 September 2018 Current Affairs In Marathi

14 September 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (14 सप्टेंबर 2018)

न्या. रंजन गोगोई सुप्रीम कोर्टाचे नवे सरन्यायाधीश:

 • सुप्रीम कोर्टचे न्या. रंजन गोगोई हे आता नवे सरन्यायाधीश (CJI) असणार आहेत. राष्ट्रपतींनी सुप्रीम कोर्टाचे नवे सरन्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती केली आहे.
 • 3 ऑक्टोबरला रंजन गोगोई सरन्यायाधीश पदाची शपथ घेतील. सरन्यायाधीश दीपक मिश्रा हे 2 ऑक्टोबरला सेवानिवृत्त होत आहेत. दीपक मिश्रा यांनी त्यांचे उत्तराधिकारी म्हणून रंजन गोगोई यांचे नाव केंद्र सरकारला पाठवले होते. ज्यावर केंद्र सरकारने शिक्कामोर्तब केले आहे. Ranjan Gogai
 • रंजन गोगोईंच्या निमित्ताने पहिल्यांदाच ईशान्य भारतातील व्यक्ती सरन्यायाधीशपदी नियुक्त होते आहे. सर्वोच्च न्यायालयतील ज्येष्ठता क्रम लक्षात घेता न्या. मिश्रा यांच्यानंतर रंजन गोगोई हे दुसऱ्या स्थानी आहेत. सर्वोच्च न्यायालयातील सर्वात वरिष्ठ न्यायमूर्तींना सरन्यायाधीश पदाची जबाबदारी दिली जाते.
 • न्या. रंजन गोगोई हे 2001 मध्ये गुवाहाटी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले होते. त्यानंतर फेब्रुवारी 2011 मध्ये ते पंजाब-हरयाणा हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश होते. एप्रिल 2012 त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदाची जबाबदारी स्वीकारली. आता त्यांची नियुक्ती सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी करण्यात आली आहे.

भारतीय कुमारांचा दुहेरी सुवर्णवेध:

 • षोड्शवर्षीय उदयवीर सिंगच्यालक्ष्यवेधीकामगिरीच्या बळावर जागतिक अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेतील कुमारांच्या 25 मीटर पिस्तूल प्रकारात 13 सप्टेंबर रोजी भारताच्या खात्यावर वैयक्तिक आणि सांघिक सुवर्णपदकाची भर पडली.
 • उदयवीरने वैयक्तिक प्रकारात 587 गुण (प्रीसिजनमध्ये 291 आणि रॅपिडमध्ये 296) मिळवून सुवर्णपदक पटकावले. अमेरिकेच्या हेन्री लेव्हेरेटला (584 गुण) रौप्य आणि कोरियाच्या ली जाईक्योनला (582 गुण) कांस्यपदक मिळाले.
 • भारताच्या विजयवीर सिधूला 581 गुणांसह चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले, तर राजकन्वर सिंग संधूला (568 गुण) 20वा क्रमांक मिळाला.
 • भारताच्या तीन स्पर्धकांची गुणसंख्या 1736 झाल्यामुळे सांघिक सुवर्णपदकावरही नाव कोरता आले. चीनला (1730 गुण) रौप्यपदक आणि कोरियाला (1721 गुण) कांस्यपदक मिळाले.

2019 मधील आयपीएलचा महासंग्राम भारताबाहेर होणार:

 • 2019 मध्ये लोकसभा निवडणुका आणि आयपीएल सामने एकाचवेळी येणार असल्याने आयपीएलचे हे सत्र भारताबाहेर जाण्याची शक्यात आहे. 2009 आणि 2014च्या निवडणुकीवेळी आयपीएलचे सामने द. आफ्रिका आणि युएईमध्ये खेळण्यात आले होते. IPL-2019
 • लोकसभा निवडणुका आणि आयपीएल सामने एकाचवेळी येणार असल्याने या सामन्यांना सुरक्षा पुरवण्यास केंद्र सरकारने असमर्थता दर्शवली आहे. त्यामुळे बीसीसीआयने सामने भारताबाहेर हलवण्याचा निर्णय घेतला आहे.
 • सध्या बीसीसीआयचे लक्ष निवडणुकीच्या तारखा कधी जाहीर होतात याकडे आहे. कारण त्यावरच 2019च्या आयपीएलचे आयोजन केले जाणार आहे. येत्या 9 एप्रिल ते 3 जून दरम्यान आयपीएल सामने होणार असून, सार्वत्रिक निवडणुकाही मे महिन्याच्या मध्यापर्यंत संपतील.
 • बीसीसीआयचे सचिव संजय पटेल यांनी यापूर्वीच आयपीएलचा एक टप्पा दक्षिण आफ्रिकेमध्ये होण्याची शक्यता वर्तवली होती. बीसीआयसमोर इतरही अनेक पर्याय असल्याचे पटेल यांनी म्हटले आहे.

राज्यात मेगा टेक्‍सटाईल पार्कचा प्रस्ताव:

 • शेतीपाठोपाठ राज्यात सर्वाधिक रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या यंत्रमाग व्यवसायाला नवा आयाम देण्याचा राज्य शासनाचा निर्धार आहे. त्यासाठी मालेगावसह सोलापूर, भिवंडी व खामगाव या चारही ठिकाणी मेगा टेक्‍सटाईल पार्क सुरू करण्याचा शासनाचा प्रस्ताव आहे.
 • वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत नुकत्याच झालेल्या बैठकीत याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी 15 दिवसांत शासनास प्रस्ताव सादर करावे, असे आदेश देण्यात आले. सुमारे अडीचशे कोटी रुपये खर्चून चार मेगा टेक्‍सटाईल पार्क सुरू झाल्यास रोजगारात वाढ होऊन पूरक व्यवसायांना व संबंधित शहरांच्या विकासाला चालना मिळेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
 • राज्यातील इचलकरंजी व डोंबिवली येथे कापडावर प्रक्रिया करणारे टेक्‍सटाईल पार्क आहेत. यंत्रमाग व्यवसाय असलेल्या शहरांतच कापड निर्मिती व प्रक्रिया व्हावी, या हेतूने संबंधित शहरांत मेगा टेक्‍सटाईल पार्कचा प्रस्ताव आहे.
 • या चारही शहरांत सध्या जुन्या यंत्रमागावरच कामकाज चालत असल्याने ती यंत्रमाग अत्याधुनिकीकरणाच्या बाबतीत पिछाडीवर आहेत. या चारही शहरांमध्ये कपड्यावर प्रक्रिया (प्रोसेस युनिट) करणारे उद्योग सुरू झाल्यास कापड निर्मितीच्या खर्चातही बचत होईल.

आता पतंजलीची दूध क्षेत्रातही ‘एँट्री’:

 • योगगुरु रामदेवबाबा यांच्या पतंजलीने यापूर्वी कापड उद्योगात पदार्पण केले होते. त्यानंतर आता त्यांनी दूध क्षेत्रातही ‘एंट्री’ केली आहे. गणेश चतुर्थीच्या निमित्ताने त्यांनी 13 सप्टेंबर रोजी ही एंट्री केली आहे.
 • पतंजलीचे दुग्धजन्य उत्पादन दिल्ली-एनसीआर, राजस्थान, पुणे आणि इतर काही ठिकाणी उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती रामदेवबाबांकडून देण्यात आली.
 • रामदेवबाबांनी पतंजली दुग्ध व्यवसायात उतरत आहे. ‘पतंजलीच्या उत्पादनामध्ये गायीचे दूध, पनीर, बटरमिल्क, दही उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या दुग्धजन्य पदार्थांसह पालेभाज्या मिळणार आहेत.
 • पतंजलीचे दूध शंभर टक्के शुद्ध असेल. हे दूध विक्रीपूर्वी याची चाचणी करण्यात येणार आहे. या दुधाच्या चाचणीनंतरच हे दूध विक्रीसाठी जाणार आहे. गायीच्या दुधाची निर्मिती अधिक व्हावी आणि पुढील वर्षापर्यंत 10 लाख लिटर दुधाची निर्मिती व्हावी, हा त्यामागचा उद्देश आहे’, असे रामदेवबाबांनी सांगितले.
 • रामदेवबाबा पुढे म्हणाले, ‘सुमारे 40 लाख लिटर गायीच्या दुधाची विक्री उद्यापासून बाजारात केली जाणार आहे. कंपनीकडून 2 हजार गावातून एक लाख शेतकऱ्यांकडून दूध उपलब्ध केले जाणार आहे’.

दिनविशेष:

 • शिक्षणतज्ज्ञविचारवंत यमुनाबाई हिर्लेकर यांचा जन्म 14 सप्टेंबर 1901 मध्ये झाला.
 • सन 1948 मध्ये दोन तासांच्या चकमकीनंतर भारतीय सैन्याने दौलताबादचा किल्ला जिंकून घेतला.
 • 14 सप्टेंबर 1949 मध्ये हिंदी हि भारताची राष्ट्रभाषा म्हणून घोषित करून हिंदी दिन साजरा केला.
 • सन 1960 मध्ये ऑर्गनायझेशन ऑफ द पेट्रोलियम एक्स्पोर्टिंग कंट्रीज (OPEC) ची स्थापना झाली.
 • मायक्रोसॉफ्ट कंपनीने वर्ष 2000 मध्ये विंडोज एमई रिलीज केले.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.