14 May 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

संचालक डॉ तात्याराव लहाने
संचालक डॉ तात्याराव लहाने

14 May 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (14 मे 2020)

पीएम केअर फंडकडून 3100 कोटींचं वाटप :

 • करोनाशी लढण्यासाठी पीएम केअर फंडकडून 3100 कोटींचं वाटप करण्यात आलं आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे.
 • महत्त्वाचं म्हणजे यामध्ये स्थलांतरित मजुरांसाठीही मोठी तरतूद करण्यात आली आहे.
 • पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, स्थलांतरित मजुरांसाठी 1000 कोटी खर्च केले जाणार आहेत. याशिवाय व्हेंटिलेटर खरेदी आणि लसनिर्मितीसाठी ही रक्कम वापरण्यात येणार आहे.
 • करोनाशी लढा देण्यासाठी पीएम केअर फंडकडून 3100 कोटींचं वाटप करण्यात आलं आहे. यामधील 2000 कोटी रुपये व्हेटिलेटरची खरेदी करण्यासाठी वापरले जाणार आहे. तर 1000 कोटी रुपये स्थलांतरित मजुरांची काळजी घेण्यासाठी वापरले जाणार आहे. तर उर्वरित 100 कोटी रुपये लसनिर्मिती करण्यासाठी खर्च करण्यात येणार आहेत.
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोनाविरोधात लढण्यासाठी PM-Cares फंडची निर्मिती केली होती. यावेळी त्यांनी लोकांना पीएम केअर फंडसाठी मदत करण्याचं आवाहन केलं होतं.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (13 मे 2020)

इन्कम टॅक्स रिटर्न्स भरण्यासाठी 30 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ :

 • इन्कम टॅक्स रिटर्न्स भरण्याची मुदत 30 नोव्हेंबर पर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली आहे. अत्यंत महत्त्वाची अशी ही घोषणा आहे.
 • करोनाचं संकट आणि लॉकडाउन यामुळे जी स्थिती निर्माण झाली आहे त्यातून दिलासा देण्यासाठी 20 लाख कोटींचं पॅकेज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलं.
 • तर या 20 लाख कोटींच्या पॅकेजमध्ये काय काय असणार आहे यासंदर्भातली पत्रकार परिषद निर्मला सीतारामन घेत आहेत. त्या दरम्यानच त्यांनी ही घोषणा केली.
 • तसेच 100 कोटींपेक्षा कमी उलाढाल असलेल्या छोट्या आणि मध्यम व्यवसायांना आत्मनिर्भर योजनेतून कर्ज देण्यात येईल.
 • 25 कोटींपर्यंत कर्ज मिळण्याची सोय या योजनेत आहे. या कर्जासाठी गॅरंटीची आवश्यकता भासणार नाही
  MSME सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांची व्याख्या बदलली.
 • छोटे उद्योग प्रगती करुन मोठे होऊ शकत नव्हते. कारण त्यांना छोटे उद्योग म्हणून मिळणारे फायदे त्यांना उलाढाल वाढल्यावर मिळत नाहीत आणि ते मोठ्या स्पर्धेत टीकू शकत नाहीत. म्हणून सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांची MSME ची व्याख्या बदलली.
 • तर उत्पादन हा निकष असणार नाही. उलाढाल आणि गुंतवणूक यानुसार सूक्ष्म आणि लघु आणि मध्यम उद्योगांची वर्गवारी करण्यात येईल. त्यानुसार त्यांना सेवा उद्योगांनाही हेच नियम लागू होणार. आधीचे निकष बदलून ते आता वाढवण्यात आले आहेत असंही स्पष्ट करण्यात आलं.

बाबर आझम पाकिस्तान वन-डे संघाचा कर्णधार :

 • पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आपल्या वन-डे संघाचं नेतृत्व, तरुण खेळाडू बाबर आझमकडे सोपवलं आहे.
 • तर गेल्या वर्षी बाबर आझमकडे पाकिस्तानच्या टी-20 संघाची सूत्र सोपवण्यात आली होती. यानंतर वन-डे संघाचं नेतृत्व देऊन पाक क्रिकेट बोर्डाने बाबर आझमच्या खांद्यावर मोठी जबाबदारी टाकली आहे.
 • पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अधिकृत परिपत्रक काढत याविषयी माहिती दिली आहे. दरम्यान अझर अली पाकिस्तानचं कसोटी क्रिकेटमध्ये नेतृत्व करेल.
 • पाकिस्तानचा माजी कर्णधार सरफराज अहमदची याआधीच कसोटी आणि टी-20 संघाच्या कर्णधारपदावरुन उचलबांगडी करण्यात आली होती. यानंतर खराब कामगिरीचं कारण देत पाक क्रिकेट बोर्डाने वन-डे संघाचं नेतृत्वही सरफराजच्या हातातून काढत बाबरकडे सोपवलं आहे.

आयुष अंतर्गत उपचारांसाठी टास्क फोर्सची स्थापना :

 • राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता लोकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे आणि सौम्य लक्षणे असलेले व ज्यांच्यात लक्षणे दिसून आली नाहीत असे कोरोनाबाधित रुग्ण यांच्यावर उपचार करण्यासाठी आयुष मंत्रालयांतर्गत असलेल्या आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी व योगचिकित्सा सारख्या पद्धतीचा अवलंब करण्याचे योजिले आहे.
 • तर याकरिता आयुष्य संचलनायमार्फत विशेष टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली असल्याचे वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागामार्फत जाहीर करण्यात आले आहे.
 • तसेच 9 जणांच्या या टास्कफोर्समध्ये वैद्यकीय शिक्षण संचलनालयाचे संचालक डॉ तात्याराव लहाने हे अध्यक्षस्थानी असणार आहेत.
 • तर या आधी आयुष अंतर्गत असलेल्या आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी व योगचिकित्सा पद्धतींचा अवलंब गुजरात, पंजाब , मध्यप्रदेश, केरळ , गोवा सारख्या राज्यांत यशस्वीरीत्या करण्यात आला आहे.
 • यासंदर्भात केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाकडून देखील वेळोवेळी सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत.
 • तसेच ही वस्तुस्थिती विचारात घेऊन महाराष्ट्र राज्यातही आयुष्य अंतर्गत असलेल्या उपरोक्त पद्धतींचा वापर करण्यात यावा अशी मागणी होत होती. त्या पार्श्वभूमीवर आयुष संचालनालय , महाराष्ट्र यांकडून शासनाला यासंदर्भात प्रस्ताव ही सादर करण्यात आला होता. याचमुळे या टास्कफोर्सची स्थापना करण्यात आली आहे.

दिनविशेष :

 • 14 मे 1940 मध्ये दुसरे महायुद्ध – हॉलंडने जर्मनीसमोर शरणागती पत्करली.
 • एअर इंडिया ची मुंबई – न्यूयॉर्क विमानसेवा 14 मे 1960 मध्ये सुरू झाली.
 • कुवेतचा संयुक्त राष्ट्रसंघात 14 मे 1963 मध्ये प्रवेश.
 • 14 मे 1657 मध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (15 मे 2020)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.