14 March 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

14 March 2019 Current Affairs In Marathi

14 March 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (14 मार्च 2019)

मध्य रेल्वे मार्गावर आता ड्रोनव्दारे नजर:

 • मध्य रेल्वे मार्गावरील मुंबई विभागातील सर्व म्हणजे 115 स्थानकांचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यानुसार सीएसएमटी ते इगतपुरी, लोणावळा आणि रोह्यापर्यंत असलेल्या सर्व स्थानकांवरील आणि स्थानकांच्या परिसराचे सर्वेक्षण ड्रोनद्वारे केले जाईल. अपघात, सुरक्षा, रेल्वे मार्गावरील मालमत्ता यावर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात येणार आहे.
 • सर्वेक्षणात सीएसएमटी ते इगतपुरी (137 किमी), लोणावळा (128 किमी), खोपोली (115किमी) आणि रोहा (144 किमी) या परिसराची आताची स्थिती कॅमेऱ्यातून कैद केली जाईल.
 • मध्य रेल्वे मार्गावर होणाऱ्या अपघाताची नोंद, अपघाताचे कारण, अपघात होण्याआधीची आणि नंतरची स्थिती या सर्व माहितीचा दस्तावेज बनविण्यात येईल.
 • ड्रोनच्या साहाय्याने चोरी, गुन्ह्यांचा उलगडा करणेही सोपे होईल. रेल्वेची मालमत्ता, अतिक्रमणाच्या घटना या सर्व बाबींवरही ड्रोनद्वारे लक्ष ठेवले जाईल, अशी माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (13 मार्च 2019)

जगभरातील युझर्सना तांत्रिक अडचणीचा फटका:

 • 13 मार्च रोजी सकाळी गुगलच्या सेवा वापरताना तांत्रिक अडचण आल्याचा प्रकार ताजा असतानाच रात्री फेसबुक आणि इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईट्सवरील युझर्सनाही तांत्रिक अडचणीचा सामना करावा लागला.
 • फेसबुकवर “Down for required maintenance” असा संदेश झळकत असून इन्स्टाग्राम युझर्सनाही अशाच अडचणीचा सामना करावा लागत आहे. Facebook
 • 14 मार्च रोजीही सकाळी देखील अनेक युझर्सनी फेसबुक आणि इन्स्टाग्राम वापरताना तांत्रिक अडचण येत असल्याची तक्रार ट्विटरवर केली. इतके तास फेसबुकवर तांत्रिक अडचणीचा सामना करावा लागल्याची बहुधा ही पहिलीच वेळ असावी.
 • 13 मार्च रोजी रात्री भारतासह जगभरातील फेसबुक आणि इन्स्टाग्राम युझर्सना पोस्ट करताना आणि अकाऊंट लॉग इन करताना तांत्रिक अडचणीचा सामना करावा लागला. फेसबुकवर लॉग इन करता येत नसून फेसबुककडून दिलगिरी व्यक्त करणारा संदेश स्क्रीनवर झळकत आहे.
 • ‘फेसबुक सध्या देखभाल- दुरुस्तीच्या कामासाठी बंद असून लवकरच सेवा पूर्ववत होईल. तुम्ही दाखवलेल्या संयमासाठी धन्यवाद’, असे यात म्हटले आहे. काही जणांच्या मोबाईल अॅपवर फेसबुक सुरू असले तरी फोटो किंवा मजकूर अपलोड करण्यात अडचणी येत आहेत.
 • भारतासह अमेरिकेतील वॉशिंग्टन, सिएटल भाग, लॅटिन अमेरिका, ब्रिटन मधील काही शहरांत सेवेत अडचणी येत आहेत. 14 मार्च रोजी सकाळपर्यंत फेसबुक आणि इन्स्टाग्रामबाबत हीच परिस्थिती होती.

पश्चिम घाटात बेडकाच्या नव्या प्रजातीचा शोध:

 • जगातील जैवविविधतेचे मोठे केंद्र असलेल्या पश्चिम घाटातील पर्वतराजीत बेडकाची एक नवीन प्रजाती सापडली असून त्या बेडकाचे नाव तारांकित बटू बेडूक (स्टारी ड्वार्फ फ्रॉग) असे आहे. त्याचा पोटाचा भाग नारिंगी असून पाठ करडय़ा रंगाची आहे, त्यावर तारांकित आकाशासारखे ठिपके आहेत.
 • अंगठय़ाच्या आकाराचा या लहान बेडकाला अस्ट्रोबॅट्रॉकस कुरिचियाना असे नाव नाव देण्यात आले आहे. ते त्याचे शास्त्रीय नाव आहे. त्याच्या शरीरावरील ठिपके व तो आढळतो तेथील कुरीचियारमला ही मानवी प्रजात, यांच्यावरून त्याला हे नाव देण्यात आले आहे.
 • एका वैज्ञानिक नियतकालिकात याबाबतचा शोधनिबंध प्रसिद्ध झाला आहे. ए. कुरिचियाना ही विज्ञानासाठी बेडकाची केवळ नवी प्रजाती आहे. एवढेच नव्हे तर त्या प्रजातीला प्राचीन वारसा आहे.
 • बेडकाच्या वंशवृक्षाचे संशोधन करणाऱ्या या उपकुटुंबास अ‍ॅस्ट्रोबॅट्राचिना असे म्हटले आहे. या बेडकाशी संबंधित प्रजाती काही कोटी वर्षांपूर्वी अस्तित्वात असाव्यात असे अमेरिकेतील फ्लोरिडा म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी या संस्थेचे डेव्हिड ब्लॅकबर्न यांनी म्हटले आहे.

बोइंग 737 मॅक्स विमानांना भारतात उड्डाणबंदी:

 • इंडियन एअरलाइन्सच्या ताफ्यातील सर्व बोईंग 737 मॅक्स 8 विमानांना उड्डाणबंदी करण्यात आली असल्याची माहिती नागरी हवाई वाहतूक सचिव पी.एस. खरोला यांनी दिली. 14 मार्च हा ‘आव्हानात्मक’ दिवस असेल असेही त्यांनी पत्रकारांना सांगितले. Airport
 • या विमानावरील बंदी उठवणे निरनिराळ्या यंत्रणांकडून मिळणाऱ्या माहितीवर अवलंबून राहील आणि हे लगेचच घडणार नाही, असे नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाचे (डीजीसीए) प्रमुख बी.एस. भुल्लर यांनी सांगितले. या विमानांच्या उड्डाणबंदीचा निर्णय डीजीसीएने जाहीर केला.
 • स्पाइसजेटच्या ताफ्यात बोईंग 737 मॅक्स 8 प्रकारची 12 विमाने आणि जेट एअरवेजच्या ताभ्यात 5 विमाने असून, त्यांचे उड्डाण आधीच थांबवण्यात आले आहे. स्पाइसजेट त्याच्या बहुतांश प्रवाशांना त्यांच्या इतर विमानांमध्ये सामावून घेणार असून, गरज भासल्यास इतर कंपन्याही तसेच करतील असे खरोला म्हणाले.
 • इथिओपियन एअरलाइन्सचे एक बोइंग 737 मॅक्स 8 आदिस अबाबाजवळ कोसळून चार भारतीयांसह 157 लोक ठार झाल्यानंतर काही दिवसांतच या विमानाच्या उड्डाणावर बंदी घालण्याचा निर्णय गेण्यात आला आहे.

दिनविशेष:

 • सन 1931 या वर्षी पहिला भारतीय बोलपट आलम आरा मुंबई मध्ये प्रदर्शित झाला.
 • ख्यातनाम अभिनेते प्रभाकर पणशीकर यांचा जन्म सन 1931 मध्ये झाला होता.
 • सन 1954 मध्ये दिल्ली येथे साहित्य अकादमीची स्थापना झाली.
 • सिक्कीममधील आदिवासी समाजातील चोकीला अय्यर यांनी सन 2001 मध्ये भारताच्या पहिल्या महिला परराष्ट्र सचिव म्हणून सूत्रे हाती घेतली होती.
 • सन 2010 मध्ये ज्येष्ठ कन्नड साहित्यिक डॉ. एस.एल. भैरप्पा यांच्या हस्ते लोकसंस्कृतीचे उपासक आणि संशोधक डॉ. रा.चिं. ढेरे यांना पुण्यभूषण पुरस्कार पुण्यात देण्यात आला.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (15 मार्च 2019)

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
1 Comment
 1. अभय says

  खुप कमी पोस्ट आहेत सर ज्यास्त माहिती पुरवा

Leave A Reply

Your email address will not be published.