14 जून 2022 चालू घडामोडी – Current Affairs

जागतिक रक्त दाता दिन
जागतिक रक्त दाता दिन

14 June 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (14 जून 2022)

प. बंगालमध्ये मुख्यमंत्रीच कुलपती :

 • पश्चिम बंगालच्या विधानसभेने सोमवारी राज्यातील विद्यापीठांचे कुलपती मुख्यमंत्री असतील, असे विधेयक मंजूर केले.
 • त्यामुळे राज्यपाल जगदीप धनखर यांच्या जागी आता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी विद्यापीठांच्या कुलपती असतील.
 • राज्याचे शिक्षणमंत्री ब्रत्या बासू यांनी हे ‘द वेस्ट बेंगॉल युनिव्हर्सिटी लॉज (अमेंडमेंट) बिल-2022’ हे विधेयक विधानसभेत मांडताना सांगितले, की मुख्यमंत्री विद्यापीठांच्या कुलपती झाल्यास काहीही गैर होणार नाही.
 • 294 आमदारांच्या विधानसभेत या विधेयकाच्या बाजूने 182 मते पडली.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (13 जून 2022)

एस-400 मिसाईल डिफेन्स सिस्टिम्स नियोजित वेळेनुसार भारताला मिळणार :

 • एकीकडे रशिया आणि युक्रेन या देशांमध्ये युद्ध सुरु असताना भारत देशाला रशियाकडून एस-400 मिसाईल डिफेन्स सिस्टिम वेळेवर आणि कोणताही अडथळा न येऊ देता पुरवल्या जातील असे विधान रशियन राजदूत डेनिस अलिपोव यांनी केले आहे.
 • भारत आणि रशिया यांच्यातील राजनैतिक संबंधाला या वर्षी 75 वर्षे झाले आहेत.
 • भारताने 2018 साली एस-400 एअर मिसाईल डिफेन्स सिस्टिम्सच्या खरेदीसाठी पाच मिलियन अमेरिकी डॉलर्सचा रशियासोबत करार केला होता.
 • तर या करारांतर्गत भारताला 5 एस-400 एअर मिसाईल डिफेन्स सिस्टिम्स मिळणार होत्या.
 • दरम्यान, रशियाने भारताल एस- 400 एअर डिफेन्स मिसाईल सिस्टिमचा पहिला करण्यास मागील वर्षी डिसेंबर सुरुवात केली होती.
 • त्यानंतर मिसाईलची दुसरी तुकडी एप्रिल महिन्यात भाराताला सुपूर्द करण्यात आली होती.

आयपीएलचे टीव्ही आणि डिजिटल माध्यम हक्क दोन स्वतंत्र ब्रॉडकास्टर्सकडे :

 • इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) माध्यम हक्कांबाबत लिलाव सुरू आहे.
 • लिलावाच्या दुसऱ्या दिवशी टीव्ही आणि डिजिटल हक्क विकले गेले आहेत.
 • 2023 ते 2027 या वर्षांसाठी हे हक्क दोन वेगवेगळ्या कंपन्यांनी 44,075 हजार कोटी रुपयांना विकत घेतल्याचे म्हटले जात आहे.
 • म्हणजे आयपीएल आता टीव्हीवर वेगळ्या चॅनेलवर आणि अॅप व वेबसाइटवर दिसेल.
 • एकूण 410 सामन्यांसाठी हे माध्यम हक्क विकण्याचे आल्याची माहिती मिळत आहे.
 • समोर आलेल्या माहितीनुसार, आयपीएलचे टेलिव्हिजन हक्क सोनीला आणि डिजिटल हक्क वायाकॉमकडे (रिलायन्स) गेले आहेत.

युवा जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धात गुरुनायडू सनापतीची सुवर्णकमाई :

 • भारताच्या गुरुनायडू सनापतीने युवा जागतिक अजिंक्यपद वेटलिफ्टिंग स्पर्धेतील मुलांच्या 55 किलो वजनी गटात सुवर्णपदकाची कमाई केली.
 • तर या स्पर्धेत सुवर्ण कामगिरी करणारा तो भारताचा पहिला वेटलििफ्टगपटू ठरला.
 • तसेच महाराष्ट्राच्या सौम्या दळवीने 45 किलो कांस्यपदक पटकावले.
 • तर या कामगिरीमुळे भारताने आतापर्यंत स्पर्धेत चार पदकांची कमाई केली आहे.

दिनविशेष :

 • 14 जून हा दिवस ‘जागतिक रक्त दाता दिन‘ म्हणून पाळला जातो.
 • भारतीय खगोलशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ ‘निळकंथा सोमायाजी‘ यांचा जन्म 14 जून 1444 मध्ये झाला.
 • महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी ‘अनाथ बालिकाश्रम‘ ही संस्था 14 जून 1896 मध्ये स्थापन केली.
 • भारताला स्वायत्तता देण्यासंबंधीची ‘वेव्हेल योजना‘ 14 जून 1945 रोजी जाहीर झाली होती.
 • ए.सी. किंवा डी.सी. यापैकी कोणत्याही विद्युतप्रवाहावर चालणार्‍या उपनगरी गाडीचा (Electric Multiple Unit EMU) शुभारंभ 14 जून 2001 मध्ये पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक वासुदेव गुप्ता यांच्या हस्ते झाले.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (15 जून 2022)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.