Complete Guidance For MPSC Exams, Current Affairs, Rajyaseva, PSI, STI Exams, Job Alerts 2020

14 July 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

भारतात बायोकॉन करोनावर एक नवीन औषध आणत आहे:
भारतात बायोकॉन करोनावर एक नवीन औषध आणत आहे:

14 July 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (14 जुलै 2020)

भारतात बायोकॉन करोनावर एक नवीन औषध आणत आहे:

 • भारतात बायोकॉन करोनावर एक नवीन औषध आणत आहे.
 • बायोटेक्नोलॉजी क्षेत्रातील मोठी कंपनी असलेल्या बायोकॉनने इटोलीझुमॅब हे इंजेक्शन बाजारात आणणार असल्याचे जाहीर केले आहे.
 • COVID-19 ची सामान्य ते गंभीर लक्षण असणाऱ्या रुग्णांना हे इंजेक्शन देण्यात येईल. या एका इंजेक्शनची किंमत आठ हजार रुपये आहे.
 • बायोकॉनला ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडून इटोलीझुमॅब इंजेक्शनसाठी मंजुरी मिळाली आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (13 जुलै 2020)

“गुगल भारतात करणार 75 हजार कोटीची गुंतवणूक:

 • गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचई यांनी गुगल भारतामध्ये डिजीटलायझेशनसाठी 75 हजार कोटींची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा केली आहे.
 • पुढील पाच ते सात वर्षांमध्ये ही गुंतवणूक केली जाणार असल्याचे पिचई यांनी स्पष्ट केलं आहे.
 • गुगल फॉर इंडिया मोहिमेअंतर्गत 10 बिलीयन डॉलरच्या (75 हजार कोटी रुपये) गुंतवणूकीची घोषणा केली.

‘बीएमडब्ल्यू’ गाडी विकण्याचा निर्णय घेतला- भारताची धावपटू द्युती चंदने:

 • भारताची अव्वल महिला धावपटू द्युती चंदने तिची आलिशान ‘बीएमडब्ल्यू’ गाडी विकण्याचा निर्णय घेतला आहे.
 • टोक्यो ऑलिम्पिकची तयारी करण्यासाठी पैसेच शिल्लक राहिले नसल्याने गाडी विकण्याचा निर्णय नाइलाजास्तव घ्यावा लागत असल्याचे 24 वर्षीय द्युतीने म्हटले आहे.
 • आलिशान बीएमडब्ल्यू ही 30 लाखांची गाडी विकण्याचा निर्णय घेतला आहे.
 • देशासाठी भविष्यात आणखी पदके जिंकून जेव्हा मी चांगली कमाई करेन त्यानंतर पुन्हा आलिशान गाडी विकत घेईन.

दिनविशेष :

 • थोर समाजसुधारक तसेच केसरीचे पहिले संपादक गोपाल गणेश आगरकर यांचा जन्म 14 जुलै 1856 रोजी झाला.
 • महानुभाव वाङमयाचे नामवंत संशोधक यशवंत खुशाल देशपांडे यांचा जन्म 14 जुलै 1884 मध्ये झाला.
 • सन 2003 या वर्षी जागतिक बुद्धिबळ महासंघ व्दारा सन्दीप चंदा यांना ग्रँडमास्टर पुरस्कार मिळाला.
 • डाकतार विभागाची 163 वर्षांपासूनची तार सेवा 14 जुलै 2013 मध्ये बंद झाली.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (17 जुलै 2020)

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC World