14 January 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

14 January 2019 Current Affairs In Marathi

14 January 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (14 जानेवारी 2019)

ज्येष्ठ अभिनेत्री ‘आशा पारेख’ यांना जीवनगौरव पुरस्कार:

  • ‘बिमलदा माझे मायबाप आहेत. त्यांच्यामुळेच मी सिनेसृष्टीत आले. नाहीतर डॉक्टर किंवा अन्य व्यवसायात असते’, अशा शब्दांत ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांनी आपल्या आठवणी जागवल्या. त्यांना ज्येष्ठ दिग्दर्शक बिमल रॉय यांच्या 52व्या स्मृतीदिनानिमित्त ‘बिमल रॉय मेमोरियल फिल्म सोसायटी’कडून दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. asha parekh
  • हा सोहळा स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक ट्रस्ट येथे पार पडला. आशा पारेख 8-9 वर्षांच्या असताना बिमल यांनी त्यांना अभिनय करण्याची पहिली संधी दिली होती.
  • तसेच सुलोचना दीदींकडूनही त्यांना अभिनयाविषयी मार्गदर्शन मिळाले. त्यामुळे ‘बिमलदा आणि सुलोचनाबाई यांचे माझ्या आयुष्यात विशेष स्थान आहे’, असे म्हणत आशा पारेख यांनी कृतज्ञता व्यक्त केली. या कार्यक्रमात आशा पारेख आणि बिमल रॉय यांच्या चित्रपटातील गाण्यांचे सादरीकरण करण्यात आले.

लोहगाव विमानतळाचा जगात पाचवा क्रमांक:

  • लोहगाव विमानतळावरून जगभरात भरारी मारणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, गेल्या वर्षीच्या नऊ महिन्यांच्या तुलनेत यंदा सुमारे 14 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. प्रवाशांची संख्या वाढत असलेल्या देशातील विमानतळांच्या यादीत लोहगाव विमानतळाने पाचवा क्रमांक पटकावला आहे.
  • लोहगाव विमानतळावरून दररोज उड्डाण होणाऱ्या विमानांची संख्या गेल्यावर्षी 158 होती, तर आता हे प्रमाण 200 वर पोचले आहे. विमानांच्या फेऱ्यांची वाढती संख्या लक्षात घेता यंदा पुणे विमानतळ सुमारे एक कोटी प्रवाशांचा टप्पा ओलांडेल, अशी शक्‍यता लोहगाव विमानतळाचे संचालक अजयकुमार यांनी वर्तविली आहे.
  • बंगळूर विमानतळाच्या प्रवाशांची संख्या 28 टक्‍क्‍यांनी, अहमदाबाद विमानतळाची 22.8 टक्‍क्‍यांनी, हैदराबाद विमानतळाची 21.9 टक्‍क्‍यांनी, तर चेन्नई विमानतळाच्या प्रवाशांची संख्या 14.7 टक्‍क्‍यांनी वाढली आहे. पुणे विमानतळाची संख्या 14.6 टक्‍क्‍यांनी वाढली आहे.
  • गेल्यावर्षीच्या एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यानच्या प्रवाशांच्या संख्येशी 2017 मधील प्रवासी संख्येबरोबर तुलना करून भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) हा निष्कर्ष काढला आहे. नोव्हेंबर 2017 मध्ये लोहगाव विमानतळावरून 198, तर गेल्यावर्षी 200 आंतरराष्ट्रीय विमानांची उड्डाणे झाली आहेत, असे भारतीय विमानतळ प्राधिकरणाने म्हटले आहे.

पॅडी अपटन राजस्थान रॉयल्सच्या प्रशिक्षकपदी:

  • आगामी आयपीएल हंगामासाठी राजस्थान रॉयल्स संघाने पॅडी अपटन यांची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. याआधीही 2013-15 सालात अपटन यांनी राजस्थानच्या संघाचे प्रशिक्षकपद भूषवले होते. IPL-2019
  • अपटन यांच्या मार्गदर्शनाखाली 2013 साली राजस्थान रॉयल्सचा संघ उपांत्य फेरीपर्यंत पोहचला होता. राजस्थान व्यतिरीक्त अपटन यांनी आयपीएलमध्ये पुणे आणि दिल्लीच्या संघाला प्रशिक्षण दिले आहे.
  • अपटन यांचा अनुभव हा आमच्या संघासाठी अतिशय महत्वाचा आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी आम्ही अपटन यांच्या हाती संघाची कमान सोपवत असल्याचे राजस्थान संघाच्या प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
  • अपटन हे 2011 साली भारताच्या विश्वचषक विजेत्या संघाचे सहायक प्रशिक्षक म्हणून काम पाहत होते. त्यामुळे अपटन यांच्या मार्गदर्शनाखाली राजस्थानचा संघ कशी कामगिरी करतोय याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

फेब्रुवारीत ‘अस्तित्व-पारंगत सन्मान’ सोहळा:

  • रंगभूमीचा पाया समजल्या जाणाऱ्या एकांकिका या नाटय़प्रकारात मराठी रंगभूमीवर सातत्याने वेगवेगळे प्रयोग होत असतात. या प्रयोगांचे मूल्यमापन एकांकिका स्पर्धाच्या माध्यमातून होतच असते.
  • परंतु एकांकिका सादर करणाऱ्या मंडळींना कोणत्याही स्पर्धेविना एकत्र आणून त्यांच्या वर्षभरातल्या कामगिरीचा ‘अस्तित्व- पारंगत सन्मान’च्या रूपाने गौरव करण्याचेअस्तित्व‘ या प्रायोगिक नाटय़संस्थेने ठरवले आहे.
  • 2009 पासून सुरू झालेल्या या उपक्रमात सन्मानित झालेले अनेक रंगकर्मी आज नाटक, सिनेमा आणि दूरचित्रवाणी या क्षेत्रांत नावलौकिकप्राप्त झाले आहेत.
  • ‘पारंगत सन्मान’अंतर्गत गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात सादर झालेल्या एकांकिकांमधून सवरेत्कृष्ट एकांकिका, लेखन, दिग्दर्शन, अभिनय, प्रकाशयोजना, नेपथ्य आणि संगीत या विभागांसाठी हे पुरस्कार दिले जाणार आहेत.
  • खुल्या आणि महाविद्यालयीन या दोन्ही गटांसाठी हे पुरस्कार असतील. रविवार, 24 फेब्रुवारी रोजी मुंबईतील पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या मिनी थिएटरमध्ये हा पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे.
  • पारंगत सन्मान पुरस्कारांसाठी 1 फेब्रुवारी 2018 ते 31 जानेवारी 2019 दरम्यान प्रथम पुरस्कारप्राप्त एकांकिका तसेच वैयक्तिक स्वरूपातील प्रथम पारितोषिक प्राप्त करणारे कलावंत व तंत्रज्ञ पात्र असतील.

दिनविशेष:

  • भारताचे अर्थमंत्री डॉ. चिंतामणराव व्दारकानाथ देशमुख उर्फ सी.डी. देशमुख यांचा जन्म 14 जानेवारी 1896 रोजी झाला होता.
  • सन 1923 मध्ये विदर्भ साहित्य संघाची स्थापना झाली.
  • ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या बंगाली लेखिका महाश्वेतादेवी यांचा जन्म 14 जानेवारी 1926 मध्ये झाला.
  • लोकसत्ता हे मराठी वृत्तपत्र 14 जानेवारी 1948 मध्ये सुरू झाले.
  • सन 1994 मध्ये मराठवाडा विद्यापीठाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असा नामविस्तार करण्यात आला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.