14 February 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

14 February 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (14 फेब्रुवरी 2020)

पाण्याखालून धावणारी भारतातील पहिली मेट्रो सज्ज:

  • देशात सर्वात पहिल्यांदा मेट्रो सेवा सुरु करुन इतिहास रचणारे कोलकाता शहर आता पुन्हा एकदा इतिहास रचणार आहे. कारण, पाण्याखालून धावणारी देशातील पहिली मेट्रोही आता कोलकाता शहरातून धावणार आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते या मेट्रोचं उद्घाटन होणार आहे.
  • तर कोलकात्यात पहिली मेट्रो सेवा 1984 मध्ये सुरु झाली होती. त्याची घौडदौड आज एकविसाव्या शतकातही सुरुच आहे. रेल्वे मंत्री पीयूष गोयल बुधवारी कोलकाता ईस्ट-वेस्ट मेट्रो सेवेला हिरवा झेंडा दाखवणार आहेत.
  • तसेच त्यानंतर शुक्रवारी 14 फेब्रुवारी रोजी सर्वसामान्य जनतेसाठी ही सेवा खुली होईल. या मेट्रोची सर्वात खास बाब म्हणजे ही मेट्रो पाण्यात बनवण्यात आलेल्या बोगद्यातून धावणार आहे.
  • त्याचबरोबर ही देशातील सर्वात स्वस्त मेट्रो असणार आहे. एकूण 15 किमीची ही मेट्रो लाईन असणार आहे.
  • तर या मेट्रोनं एका स्टेशनहून दुसऱ्या स्टेशनला जाण्याचं तिकीट केवळ पाच रुपये असणार आहे. दरपत्रकानुसार, दोन किमीसाठी पाच रुपये, पाच किमीसाठी 10 रुपये, दहा किमीसाठी 20 रुपये त्यानंतर शेवटच्या स्टेशनपर्यंत 30 रुपये इतकं भाडं आकारण्यात येणार आहे.
  • त्याचबरोबर या मेट्रोमध्ये प्रवाशांना अनेक सुविधांचा लाभही मिळणार आहे. यामध्ये प्लॅटफॉर्म स्क्रीन डोअर, डिटेक्शन सिस्टीमसारखी आधुनिक सुविधा असणार आहे.

आसामच्या नागरिकत्वाबाबतची माहिती संकेतस्थळावरून नाहीशी :

  • आसामच्या नागरिकत्वाबाबतची अद्ययावत माहिती (डेटा) संबंधित संकेतस्थळावरून नाहीशी झाल्यानंतर, राष्ट्रीय नागरिक नोंदणीच्या (एनआरसी) एका माजी अधिकाऱ्याविरुद्ध प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) नोंदवण्यात आला.
  • तर नोकरी सोडताना या संवेदनशील दस्ताऐवजाचा पासवर्ड सादर करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप या महिला अधिकाऱ्यावर ठेवण्यात आला आहे.
  • एनआरसीच्या माजी महिला अधिकाऱ्याला लेखी स्मरणपत्रे दिल्यानंतरही तिने या दस्ताऐवजाचा पासवर्ड न दिल्यामुळे तिच्याविरुद्ध ‘ऑफिशियल सिक्रेट्स अ‍ॅक्ट’ अन्वये पलटण बझार पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे, असे एनआरसीचे राज्य समन्वयक हितेश देव शर्मा यांनी पीटीआयला सांगितले.
  • आसाम एनआरसीचे माजी समन्वयक प्रतीक हजेला यांनी 31 ऑगस्ट 2019 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या एनआरसीच्या अंतिम यादीत फेरफार केल्याचा आरोप आसाम पब्लिक वर्क्‍स (एपीडब्ल्यू) या स्वयंसेवी संस्थेने बुधवारी राज्याच्या गुन्हे अन्वेषण विभागात नोंदवलेल्या आणखी एका एफआयआरमध्ये केला आहे.

नारायण मूर्तींचे जावई बनले ब्रिटनचे अर्थमंत्री :

  • देशातील अग्रगण्य कंपनी असलेल्या इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांचे जावई ऋषी सुनाक यांची युनायटेड किंगडमच्या अर्थमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
  • तर त्यांना ‘ब्रिटन चान्सलर ऑफ द एक्सचेकर’ ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. हे पद अर्थमंत्रीपदाच्या समकक्ष मानले जाते.
  • तसेच साजिद जावीद यांनी अर्थमंत्रीपदाचा राजीनामा दिलेला आहे. त्यामुळे ऋषी यांना ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सध्या त्यांच्याकडे ट्रेजरी मुख्य सचिव पदाची जबाबदारी आहे.
  • ऋषी यांच्या निवडीची बातमी ब्रिटनच्या पंतप्रधान कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून देण्यात आलेली आहे.

नोबेल पारितोषिक विजेते आर. के. पचौरी यांचे निधन :

  • पर्यावरण तज्ज्ञ, दी एनर्जी अँड रिसोर्सेस इन्स्टिटय़ूटचे (टेरी) संस्थापक संचालक आणि नोबेल पारितोषिक विजेते आर. के. पचौरी यांचे रात्री दिर्घ आजाराने निधन झाले. ते 79 वर्षांचे होते.
  • तसेक मंगळवारपासून पचौरी यांना लाइफ सपोर्ट सिस्टमवर ठेवण्यात आले होते.

मनप्रीत जगातील सर्वोत्तम हॉकीपटू :

  • भारतीय संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग याला आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचा सर्वोत्तम पुरुष हॉकीपटूचा पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार पटकावणारा मनप्रीत हा भारताचा पहिला हॉकीपटू ठरला आहे.
  • भारताला टोक्यो ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळवून देताना कर्णधार म्हणून मनप्रीतने मोलाची भूमिका बजावली होती.
  • तर या पुरस्कारांच्या शर्यतीत असलेला बेल्जियमचा आर्थर व्ॉन डोरेन आणि अर्जेटिनाचा लुकास व्हिया यांच्यावर मनप्रीतने मात केली. व्ॉन डोरेनला दुसऱ्या तर व्हिया याला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
  • मनप्रीतला एकूण 35.2 टक्के मते मिळाली. त्यात राष्ट्रीय संघटना, प्रसारमाध्यमे, चाहते आणि खेळाडूंच्या मतांचा समावश आहे.
  • तसेच व्हॅन डोरेनला 197 तर व्हियाला 16.5 टक्के मते मिळाली. या पुरस्कारासाठी बेल्जियमचा विक्टर वेगनेझ, ऑस्ट्रेलियाचे अरान झालेवस्की आणि ईडी ओकेनडेन यांना नामांकन मिळाले होते.

जागतिक बॉक्सिंग क्रमवारीत अमित पांघल अग्रस्थानी :

  • जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई करणारा भारताचा अव्वल बॉक्सर अमित पांघल (52 किलो) याने पुढील महिन्यात होणाऱ्या ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या (आयओसी) बॉक्सिंग टास्क फोर्सच्या क्रमवारीत अग्रस्थान पटकावले आहे. आपल्या गटात जागतिक अग्रस्थान पटकावणारा अमित हा भारताचा पहिला बॉक्सर ठरला आहे.
  • तर 2009 मध्ये ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या विजेंदर सिंगने 75 किलो वजनी गटात अग्रस्थान पटकावण्याची किमया केली होती.
  • तसेच 24 वर्षीय अमित 420 गुणांसह अव्वल स्थानी विराजमान झाला आहे. पैशांची अफरातफर आणि गैरप्रशासनामुळे आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघावर सध्या ‘आयओसी’ने निलंबनाची कारवाई केल्यामुळे आयओसीच्या बॉक्सिंग टास्क फोर्सने क्रमवारी जाहीर केली आहे.

प्राग मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धात विदितची विजयी सलामी :

  • भारताचा युवा ग्रँडमास्टर विदित गुजराथी याने अमेरिकेच्या सॅम शँकलँड याचा पराभव करत प्राग मास्टर्स बुद्धिबळ महोत्सवात विजयी सलामी नोंदवली.
  • पेंटाल्या हरिकृष्ण (2713 एलो रेटिंग गुण) याला मात्र 36 चालींपर्यंत रंगलेल्या स्वीडनच्या निल्स ग्रँडेलियसविरुद्धच्या सामन्यात बरोबरीवर समाधान मानावे लागले.
  • तर विदित आणि हरिकृष्ण हे नुकत्याच जाहीर झालेल्या जागतिक बुद्धिबळ महासंघाच्या (फिडे) क्रमवारीत भारतीयांमध्ये अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी आहेत.
  • तसेच शँकलँडने केलेल्या एकमेव चुकीचा फायदा उठवत विदितने प्रतिस्पध्र्यावर अधिक दबाव आणला. त्यानंतर या लढतीवर पूर्णपणे वर्चस्व गाजवत विदितने अवघ्या 32 चालींमध्ये विजय साकारला.

केजरीवालांच्या नव्या कॅबिनेटमध्ये बदल नाही :

  • राजधानी दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वात लवकरच आम आदमी पक्षाचे सरकार अस्तित्वात येणार आहे.
  • लवकरच केजरीवाल यांचे मंत्रीमंडळ स्थापन होणार असून नव्या मंत्रीमंडळात जुनेच मंत्री शपथ घेणार असल्याचे समजते.
  • अर्थात आधीच्या मंत्रीमंडळात बदल होणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. केजरीवाल तिसऱ्यांना मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्यासाठी सज्ज झाले आहे.
  • तर दिल्ली विधानसभेतील जुने सर्व मंत्री पुन्हा एकदा मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. मात्र कोणत्या मंत्र्याला कोणतं खातं देण्यात येणार याचा निर्णय नंतर घेण्यात येणार आहे.

दिनविशेष:

  • 14 फेब्रुवारी हा दिवस ‘व्हॅलेंटाईन डे‘ म्हणून साजरा केला जातो.
  • पहिला मुघल सम्राट, हिन्दुस्थानातील मुघल सत्तेचा संस्थापक बाबर यांचा जन्म 14 फेब्रुवारी 1483 मध्ये झाला.
  • सन 1881 मध्ये भारतातील पहिल्या होमिओपाथिक कॉलेजची कोलकाता येथे स्थापना झाली.
  • सन 1924 मध्ये संगणक तयार करणारी कंपनी आय.बी.एम ची स्थापना झाली.
  • सन 1946 यावर्षी बँक ऑफ इंग्लंडचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.