14 August 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या चष्मांचा ब्रिटनमध्ये लिलाव करण्यात येणार:
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या चष्मांचा ब्रिटनमध्ये लिलाव करण्यात येणार:

14 August 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (14 ऑगस्ट 2020)

‘नया श्रीनगर’ आणि ‘नया जम्मू’ या प्रकल्पांची घोषणा करण्याची शक्यता:

  • जम्मू व काश्मीर राज्याचा विशेष दर्जा काढून घेतल्याच्या एका वर्षांनंतरही या ठिकाणी वास्तविक विकास नजरेला पडत नसल्याची टीका होत असताना, ‘नया श्रीनगर’ आणि ‘नया जम्मू’ या हायटेक आणि पर्यावरणपूरक शहरांसह महत्त्वाच्या प्रकल्पांची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे करण्याची शक्यता आहे.
  • या प्रकल्पांच्या अंतिम आराखडय़ावर केंद्रीय नगरविकास मंत्रालय आणि जम्मू- काश्मीर प्रशासन हे संयुक्तपणे काम करत असून, पंतप्रधान वैयक्तिकरीत्या त्यावर देखरेख करत आहेत.
  • एका आठवडय़ापूर्वीच केंद्र सरकारने माजी केंद्रीय मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते मनोज सिन्हा यांची जम्मू- काश्मीरचे नायब राज्यपाल म्हणून नेमणूक केली आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (13 ऑगस्ट 2020)

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या चष्मांचा ब्रिटनमध्ये लिलाव करण्यात येणार:

  • राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या दोन चष्मांचा ब्रिटनमध्ये लिलाव करण्यात येणार आहे.
  • शंभर वर्षे जुने असलेले हे चष्मे गांधीजींनी वापरले असल्याने त्याला ऐतिहासिक महत्व असून या चष्म्यांची लिलावातील किंमत ही थक्क करणारी आहे.
  • या चष्म्यांची किंमत 10,000 ते 15,000 पौंड म्हणजे भारतीय रुपयांमध्ये 9 ते 14 लाख रुपये होईल असे सांगण्यात येत आहे.
  • हे चष्मे सन 1900 मध्ये महात्मा गांधींनी वापरले होते. काही काळ वापरल्यानंतर त्यांनी आपले हे चष्मे आपल्या एका सहकार्याला भेट म्हणून दिले होते.
  • सध्या ऑनलाइन लिलावात या चष्म्यांना 6000 पौंडांची बोली लागली आहे. ही बोली 10,000 ते 15,000 पौंडांपर्यंत जाऊ शकते.

थायलंडमध्ये संशोधक वटवाघुळ पकडण्यासाठी ट्रेकिंग करत आहेत:

  • थायलंडमध्ये संशोधक वटवाघुळ पकडण्यासाठी खेड्यापाड्यांमधून ट्रेकिंग करत आहेत.
  • संपूर्ण जगाला त्रस्त करुन सोडणाऱ्या करोना व्हायरस या आजाराच मूळ शोधून काढणं हा थायलंडमधल्या संशोधकांचा ट्रेकिंगमागचा मूळ उद्देश आहे.
  • जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या डाटानुसार, आतापर्यंत जगभरात अडीच कोटी लोकांना करोना व्हायरसची बाधा झाली आहे.
  • थायलंडमध्ये हॉर्सशू वटवाघुळाच्या 19 प्रजाती आहेत. पण करोना व्हायरसंबंधी अजून त्यांची चाचणी झालेली नाही असे संशोधकांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकारणीसंदर्भातील महत्वाच्या घोषणा केल्या:

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कर आकारणीसंदर्भातील पद्धतीमध्ये बदल करण्यासंदर्भातील महत्वाच्या घोषणा केल्या आहेत.
  • प्रामाणिक करदात्यांसाठी कर जमा करण्याची पद्धत अधिक सोयिस्कर करण्याच्या दृष्टीने सरकारने ‘पारदर्शी कर आकारणी’ पद्धतीची घोषणा केली आहे.
  • मात्र ही घोषणा करतानाच पंतप्रधानांनी या पुढे आयकर कार्यालयाचे स्वरुप पुर्णपणे बदलणार असल्याचे संकेत दिले आहेत.
  • या नवीन बदलांमुळे करदात्यांना फायदा होणार असल्याचेही पंतप्रधानांनी म्हटलं आहे.

पॅरिस सेंट जर्मेनची उपांत्य फेरीत धडक- लीग फुटबॉल :

  • अखेरच्या क्षणी तीन मिनिटांत दोन गोल केल्यामुळे पॅरिस सेंट जर्मेनने अ‍ॅटलांटावर 2-1 असा थरारक विजय मिळवत चॅम्पियन्स लीग फुटबॉलच्या उपांत्य फेरीत मजल मारली आहे.
  • लिस्बन येथे बुधवारी रात्री झालेल्या उपांत्यपूर्व फे रीच्या या सामन्यात मारियो पलासिकने 26व्या मिनिटालाच गोल करत अ‍ॅटलांटाला आघाडी मिळवून दिली.
  • मार्किन्होस याने 90व्या मिनिटाला गोल करत पॅरिस सेंट जर्मेनला बरोबरी साधून दिली.
  • त्यानंतर तीन मिनिटांनी एरिक मॅक्सिम चोउपो-मोटिंग याने शानदार गोल झळकावत पॅरिस सेंट जर्मेनच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

दिनविशेष :

  • 14 ऑगस्ट हा ‘संस्कृत दिन‘ म्हणून पाळला जातो.
  • सन 1862 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना झाली.
  • नागपूर विद्यापीठाने स्वातंत्र्यवीर सावरकर यांना सन 1943 मध्ये सन्माननीय डी.लिट. पदवी दिली.
  • लॉर्ड माउंट बॅटन यांची स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून 14 ऑगस्ट 1947 रोजी नेमणूक झाली होती.
  • सन 1958 मध्ये एअर इंडियाची दिल्ली-मॉस्को विमानसेवा सुरू झाली.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (15 ऑगस्ट 2020)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.