14 August 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
14 August 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (14 ऑगस्ट 2018)
स्वातंत्र्य दिनी प्लास्टिकचे झेंडे वापरू नका:
- स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभुमीवर नागरिकांनी प्लास्टिकचे झेंडे वापरु नयेत असे आवाहन गृहमंत्रालयातर्फे करण्यात आले आहे. प्लास्टिकच्या झेंड्यांवर अधिकृत बंदी घालण्यात आलेली नसली तरी त्याऐवजी कागदी ध्वज वापरावे असा सल्ला गृहमंत्रालयाने दिला आहे.
- याबाबत एक पत्र पाठवून राष्ट्रध्वजाचा अपमान होणार नाही याची काळजी घ्या असे आवाहन करण्यात आले आहे. मुख्य सचिव, सर्व शासकीय खात्यांचे व्यवस्थापक, मंत्रालयांचे सचिव, भारत सरकारचे विभाग यांना हे पत्र पाठवण्यात आले आहे.
- गेल्या वर्षीही स्वातंत्र्यदिनानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने पुढील वर्षीपासून प्लास्टिकचे झेंडे न वापरण्याचे आवाहन केले होते. कार्यक्रम झाल्यानंतर हेच झेंडे रस्त्यावर, गटारीसह इतस्तत: फेकले जातात. यामुळे राष्ट्रध्वजाचा अपमान होतो. देशाच्या राष्ट्रधवज नष्ट करण्यासाठी एक नियमावली आहे. मात्र, अशाप्रकारे राष्ट्रध्वज रस्त्यावर फेकल्याने तो लोकांच्या पायाखाली येतो.
- प्लास्टिकच्या ध्वजांची योग्य विल्हेवाट लावणे कठीण काम असते. याचबरोबर प्लास्टिक हे पर्यावरणालाही घातक आहे. या प्लास्टिकमुळे प्राण्यांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. यामुळे कागदी किंवा प्लास्टिकचे झेंडे वापरण्याचे आवाहन मंत्रालयाने राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांना केले होते.
Must Read (नक्की वाचा):
राज्यात 28 ऑगस्टपासून पायाभूत चाचणी:
- राज्यातील दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची अध्यायननिश्चिती करण्यासाठी मागील दोन-तीन वर्षांपासून पायाभूत चाचणी घेतली जात आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्याशी संलग्नित असलेल्या राज्यातील शाळांमध्ये 28 ते 31 ऑगस्ट या कालावधीत पायाभूत चाचणी घेतली जाणार आहे.
- राज्याच्या शिक्षण विभागाने मागील दोन-तीन वर्षांपासून प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र हा कार्यक्रम सुरू केला आहे. यामध्ये विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून त्याच्या अध्यापनामध्ये प्रगती व्हावी, हा हेतू डोळ्यांसमोर ठेवला आहे. या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात देशामध्ये आपल्या राज्याचा पहिला क्रमांक यावा, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठेवली आहे.
- तसेच या अनुषंगाने राज्यभर पायाभूत चाचणीचा कार्यक्रम राबविला जातो. विद्यार्थ्यांची किती शैक्षणिक प्रगती झाली आहे, कोणत्या अध्ययन निष्पत्तीमध्ये तो कमी पडतो हे निश्चित करणे हा या चाचणीचा उद्देश आहे.
माजी लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जींचे निधन:
- लोकसभेचे माजी अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी (वय 89) यांचे 13 ऑगस्ट रोजी निधन झाले. तब्बल दहा वेळा लोकसभेवर निवडून आलेले चॅटर्जी हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय समितीचेदेखील सदस्य होते.
- चॅटर्जी यांनी 1968 मध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले. 1971 मध्ये पहिल्यांदा ते लोकसभेवर निवडून गेले होते. सोमनाथ चॅटर्जी यांचे वडिल निर्मल चंद्र चॅटर्जी हे प्रसिद्ध वकील होते.
- अणु कराराच्या मुद्द्यावरून माजी पंतप्रधान मनमोहनसिंह यांचा सरकारचा डाव्या पक्षांनी पाठिंबा काढून घेतल्यानंतर चॅटर्जी यांनाही लोकसभा अध्यक्षपद सोडण्यास सांगण्यात आले होते. मात्र, त्यांनी पद न सोडल्याने पक्षातून त्यांना निलंबित करण्यात आले होते.
स्वच्छ रेल्वे स्थानकांच्या यादीत राज्यातील स्थानके:
- देशातील स्वच्छ रेल्वे स्थानकांमध्ये राज्यातील 36 स्थानकांचा समावेश असून रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी स्वच्छ रेल्वे स्थानकांचा अहवाल जाहीर केला. ‘अ-1’ श्रेणीमध्ये वांद्रे स्थानकाचा समावेश असून ते सातव्या क्रमांकावर असून देशातील अव्वल दहा स्थानकांत त्याला स्थान मिळाले आहे. या श्रेणीत मुंबई-सीएसएमटी आणि दादर स्थानकांनी सुधारणा केली असून या स्थानकांनी अनुक्रमे 9व्या आणि 10व्या क्रमांकावर झेप घेतली आहे.
- ‘स्वच्छ रेल्वे स्वच्छ भारत‘ अहवालांतर्गत ही नावे जाहीर करण्यात आली आहेत. या अहवालात देशातील 407 रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. ‘अ-1’ श्रेणीमधील 75 रेल्वे स्थानकांत राज्यातील 10 रेल्वे स्थानकांचा समावेश आहे.
- 50 कोटींपेक्षा जास्त प्रवासी ज्या रेल्वे स्थानकांतून प्रवास करतात अशी रेल्वे स्थानके ‘अ-1’ श्रेणीत आहेत. ‘अ’ श्रेणीमध्ये 332 रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. ‘अ-1’ या श्रेणीत पुणे, नागपूर, लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई सेंट्रल, सोलापूर, ठाणे आणि कल्याण या रेल्वे स्थानकांनाही स्थान मिळाले आहे.
- देशातील 332 रेल्वे स्थानकांमध्ये राज्यातील 26 रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. अकोला, नाशिक रोड, दौंड, बल्लारशाह, अमरावती, वर्धा, भुसावळ, शेगाव, कोल्हापूर, चाळीसगाव, मनमाड, अहमदनगर, नांदेड, कुर्डुवाडी, जालना, जळगाव, पनवेल, लोणावळा, परभणी, कोपरगांव, औरंगाबाद रेल्वे स्थानकांचा समावेश झाला आहे.
मुक्त विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात बदल नाही:
- मुक्त विद्यापीठांचे कोणतेही अभ्यासक्रम रद्द झालेले नाहीत, असे स्पष्टीकरण विद्यापीठ अनुदान आयोगाकडून देण्यात आले आहे. विद्यापीठाच्या ज्या अभ्यासक्रमांमध्ये त्रुटी आढळतील, त्या दूर करण्यासाठी एक महिन्यांचा कालावधी संबंधित विद्यापीठांना देण्यात येतीव, असे विद्यापीठ अनुदान आयोगाने म्हणजेच यूजीसीने म्हटले आहे.
- मुक्त विद्यापीठांचे अभ्यासक्रम रद्द झाल्याचे वृत्त प्रसारित होताच यूजीसीकडून मुक्त विद्यापीठांना पत्र पाठवण्यात आले. याबद्दलची अधिक माहिती 16 ऑगस्टला यूजीसीच्या संकेतस्थळावर देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी काळजी करु नये, असे आवाहनदेखील यूजीसीकडून करण्यात आले आहे.
- यूजीसीने 2018-19 साठी मुक्त विद्यापीठांची यादी जाहीर केली आहे. मात्र यात मुंबई दूर आणि मुक्त अध्ययन केंद्रासह (आयडॉल) 35 संस्थांची नावेच नाहीत. त्यामुळे या संस्थांची मान्यता रद्द होण्याची शक्यता असल्याचे वृत्त समोर आले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण होते. या पार्श्वभूमीवर यूजीसीने स्पष्टीकरण देत विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे.
दिनविशेष:
- 14 ऑगस्ट हा ‘संस्कृत दिन‘ म्हणून पाळला जातो.
- सन 1862 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना झाली.
- नागपूर विद्यापीठाने स्वातंत्र्यवीर सावरकर यांना सन 1943 मध्ये सन्माननीय डी.लिट. पदवी दिली.
- लॉर्ड माउंट बॅटन यांची स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून 14 ऑगस्ट 1947 रोजी नेमणूक झाली होती.
- सन 1958 मध्ये एअर इंडियाची दिल्ली-मॉस्को विमानसेवा सुरू झाली.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा
V v v v v v v v gooooooood