13 सप्टेंबर 2021 चालू घडामोडी – Current Affairs
13 September 2021 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (13 सप्टेंबर 2021)
गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी भूपेंद्र पटेल :
- भाजपने गुजरातच्या मुख्यमंत्रिपदासाठी भूपेंद्र पटेल यांचे नाव रविवारी जाहीर केले. त्यांचा शपथविधी आज दुपारी होईल.
- विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर पटेल यांनी राज्यपाल आचार्य देवव्रत यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला.
- मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत अध्यक्षपदासाठी पटेल यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला.
- भूपेंद्र पटेल हे 2017च्या विधानसभा निवडणुकीत घाटलोडिया मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार शशिकांत पटेल यांचा एक लाखाहून अधिक मतांनी पराभव करून निवडून आले होते.
Must Read (नक्की वाचा):
नव्या शिक्षण धोरणानुसार बदल :
- नवीन शिक्षण धोरण 2020 अंतर्गत मध्य प्रदेशमधील महाविद्यालयांच्या अभ्यासक्रमामध्ये बदल करण्यात आला आहे.
- नवीन अभ्यासक्रमाअंतर्गत बीएच्या पहिल्याव वर्षाच्या विद्यार्थ्यांना महाभारत, रामचरितमानस, योग आणि ध्यान यासंदर्भात शिकवलं जाणार आहे.
- तर नवीन अभ्यासक्रमानुसरा ‘श्री रामचरितमानस अप्लाइड फिलॉसफी’हा पर्यायी विषय म्हणून ठेवण्यात आलाय.
- इंग्रजीच्या फाउंडेशन कोर्समध्ये पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्यांना सी. राजगोपालचारी यांनी लिहिलेली महाभारताची प्रस्तावना शिकवली जाणार आहे.
- तसेच राज्याच्या शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी इंग्रजी आणि हिंदीबरोबरच योग आणि ध्यान या दोन विषयांना तिसऱ्या फाउंडेशन कोर्सच्या रुपामध्ये शिकवलं जाणार आहे.
- यामध्ये ‘अमो ध्यान’ आणि मंत्रांसंदर्भातील अभ्यासाचा समावेश आहे.
- श्री रामचरितमानसअंतर्गत असणाऱ्या धड्यांमध्ये भारतीय संस्कृतीचे मूळ या क्षेत्राशी संबंधित विषयांमध्ये अध्यात्मिकता आणि धर्म यासारख्या विषयांचा समावेश असणार आहे.
- ‘वेद, उपनिषदं आणि पुराणांचे चार युग’, ‘रामायण आणि श्री रामचरितमानसमधील फरक’ आणि ‘दिव्य अस्तित्वाचा अवतार’ हे विषयही शिकवले जाणार आहेत.
- नवीन अभ्यासक्रमानुसार हे विषय व्यक्तिमत्व विचार आणि चारित्र्य अधिक सक्षम बनवण्यासाठी शिवकण्यात येणार आहेत.
डॅनिल मेदवेदेवने पटकावले पहिले ग्रँडस्लॅम :
- सर्बियाचा अग्रमानांकित खेळाडू नोव्हाक जोकोव्हिचचे सर्वाधिक 21वे ग्रँडस्लॅम जेतेपद आणि ‘कॅलेंडर स्लॅम’ हे दोन विक्रम पूर्ण होण्याचे स्वप्न पूर्ण होता होता राहिले.
- रशियाच्या दुसऱ्या मानांकित डॅनिल मेदवेदेवने जोकोविचचा पराभव करत आपले पहिले ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावले.
- जोकोविचने यावर्षी ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन आणि विम्बल्डनचे विजेतेपद पटकावले होते.
- जर जोकोविचने अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धा जिंकली असते तर त्याने आपल्या कारकिर्दीतील विक्रमी 21 वे ग्रँड स्लॅम जेतेपद पटकावले असते.
ब्रिटिश महिला खेळाडूला मिळाले जेतेपद :
- ब्रिटनच्या एमा राडुकानूने कॅनडाच्या लेला फर्नांडीसचा पराभव करत यूएस ओपनमध्ये महिला एकेरीचे जेतेपद पटकावले.
- तर एमा राडुकानूने लेला फर्नांडिसचा 6-4, 6-3 असा पराभव केला.
- महिला एकेरीच्या ऐतिहासिक अंतिम फेरीत, यावेळी यापूर्वी कधीही ग्रँड स्लॅम फायनल खेळले नव्हते असे दोन तरुण खेळाडू समोरासमोर आले होते.
- राडुकानूने प्रथमच ग्रँड स्लॅमच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आणि हे तिच्या कारकिर्दीतील पहिले विजेतेपद देखील आहे.
दिनविशेष:
- मोनाको ग्रांप्री चे संस्थापक अँटोनी नोगेस यांचा जन्म 13 सप्टेंबर 1890 मध्ये झाला.
- सन 1948 मध्ये ऑपरेशन पोलो – विलीनीकरणासाठी भारतीय सैन्याने हैदराबादवर चढाई केली.
- सन 1996 मध्ये श्रीमती जानकीदेवी बजाज पुरस्कार ज्येष्ठ समाजसेविका श्रीमती इंदुमती पारिख यांना दिला.
- सन 2003 मध्ये ज्येष्ठ गायक पं. दिनकर कैकिणी आणि मेंडोलिन वादक यू. श्रीनिवास यांना राष्ट्रीय कुमार गंधर्व पुरस्कार जाहीर झाला.