13 September 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

13 September 2018 Current Affairs In Marathi

13 September 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (13 सप्टेंबर 2018)

भारत आणि चीनला बुलेट ट्रेनने जोडले जाणार:

  • चीनमधील कुनमिंग व कोलकाता ही शहरे बुलेट ट्रेनने जोडण्याचा आमचा विचार आहे अशी माहिती कोलकातामध्ये चीनचे महावाणिज्य दूत मा झान्वू यांनी दिली. कोलकात्यामध्ये एका कार्यक्रमात बोलताना मा झान्वू यांनी ही माहिती दिली.
  • दोन्ही देशांच्या संयुक्त प्रयत्नांनी कोलकाता आणि कुनमिंग शहरांदरम्यान हायस्पीड रेल्वे मार्ग सुरू होऊ शकतो, असे झान्वू म्हणाले. जर हा रेल्वे मार्ग प्रत्यक्षात उतरला तर कुनमिंग व कोलकाता शहरांमधील अंतर अवघ्या काही तासांवर येईल असेही ते पुढे म्हणाले. या रेल्वेमार्गाचा म्यानमार आणि बांगलादेशलाही फायदा होईल, कारण हा मार्ग म्यानमार व बांगलादेशमधून जाईल या 2800 कि.मी.च्या मार्गावर औद्योगिक प्रकल्पांचे जाळेही विणले जाऊ शकते. त्याचा प्रकल्पात सहभागी सर्वच देशांना फायदा होईल. यापूर्वी 2015 मध्ये ग्रेटर मेकांग सब्रेगियन (जीएमएस) च्या कुनमिंगमध्ये झालेल्या बैठकीतही या प्रस्तावाचा उल्लेख करण्यात आला होता, असेही झान्वू म्हणाले. Bullet Train
  • भारताने बेल्ट अँड रोड या चीनच्या प्रकल्पाला विरोध केला असला, तरी हा प्रकल्प चीनने जगजिंकण्यासाठी किंवा शेजारी देशांवर वर्चस्व गाजवण्यासाठी तयार केलेला नाही, असा खुलासा झांवू यांनी केला. ते म्हणाले, की भारत ही उदयोन्मुख अर्थव्यवस्था आहे. शेजारी देशांशी आम्हाला स्थिर संबंध हवे आहेत. भारत व रशिया हे दोन मोठे देश आहेत व ते चीनचे शेजारी आहेत. त्यांच्याशी आम्हाला चांगले संबंध ठेवायचे आहेत. भारतात रुपया घसरला असला, तरी भारतीय अर्थव्यवस्थेची प्रगती सुरू आहे, त्यात खंड पडणार नाही.

हॉकीच्या ‘सरदार’चा निवृत्तीचा निर्णय:

  • भारताचा माजी कर्णधार आणि सर्वाधिक भरवशाचा आक्रमक खेळाडू सरदार सिंगने हॉकीमधील कारकीर्दीला अलविदा करण्याचा निर्णय जाहीर केला. 12 वर्षांच्या हॉकी कारकीर्दीत मिळालेल्या अनेक मान-सन्मानानंतर निवृत्तीची हीच योग्य वेळ असल्याचे 32 वर्षीय सरदारने सांगितले.
  • आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला विजेतेपद कायम राखण्यात अपयश आल्यामुळे केवळ कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. त्यात वाढते वय आणि खेळाचा वाढता वेग यांच्यात ताळमेळ जुळवण्यात फरक पडत असल्याचे लक्षात आल्यामुळेच हा निर्णय त्याने घेतला. Sardar
  • “12 वर्षे हा कारकीर्दीच्या दृष्टीने खूप मोठा काळ आहे. त्यामुळे मी समाधानी असून आता नवीन पिढीने सूत्रे हातात घेण्याची वेळ आली आहे. मी माझ्या कुटुंबासह मित्रांशी चर्चा करूनच हा निर्णय घेतला आहे,” असे सरदारने नमूद केले.
  • तसेच सरदार दिल्लीत अधिकृतरीत्या निवृत्ती जाहीर करणार आहे. राष्ट्रीय संघातून निवृत्ती घेतली तरी स्थानिक स्पर्धामधून तो खेळत राहणार असून त्याबाबत प्रशिक्षक हरेंद्र सिंग यांना कल्पना देण्यात आली असल्याचे त्याने सांगितले.

केंद्र सरकारने 327 औषधांवर बंदी घातली:

  • ड्रग टेक्नॉलॉजी अॅडव्हायजरी बोर्ड अर्थात डीटीएबीने दिलेल्या शिफारसींनुसार केंद्र सरकारने डिकोल्ड टोटल आणि सॅरिडॉनसारख्या 327 औषधांवर बंदी घातली आहे. ही औषधे फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन (FDC) औषधे आहेत असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
  • सरकारच्या या निर्णयामुळे एबॉट जशा आंतरराष्ट्रीय कंपन्यांसोबत पिरामल, मॅक्सिऑड्स, सिप्ला आणि ल्यूपिन सारख्या घरगुती औषध निर्मात्या कंपनीच्या औषधांवर प्रभाव होणार आहे. तर, सरकारच्या या निर्णयाविरोधात औषध कंपन्या न्यायालयाचे दार ठोठावण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. Medicine
  • औषधनियंत्रक विभागाकडे आलेल्या या तक्रारींची दखल घेत दोन वर्षांपूर्वी अशा 343 फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन असलेल्या औषधांवर अखेर बंदी जाहीर केली, मात्र या निर्णयाविरोधात औषध कंपन्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली. त्यानुसार दीड वर्षापूर्वी पहिल्या टप्प्यात घातलेली ही बंदी उठवण्यात आली.
  • अमेरिका, जापान, फ्रान्स, जर्मनी आणि इंग्लंडसारख्या अनेक देशांमध्ये एफडीसीवर बंदी आहे. भारतासह अन्य काही देशांमध्ये ही औषधे विकली जात आहे. भारतातील पडुचेरी असे एकमेव राज्य आहे, ज्या राज्याने या औषधावर बंदी घातली आहे.

अॅपल कंपनीकडून तीन नवे फोन लाँच:

  • टेक्नोलॉजीच्या आजच्या जगात ‘अ‍ॅपल‘चा इव्हेंट म्हटलं की जोरदार चर्चा सुरू होतेच. एखादा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी जेवढा गाजावाजा सुरू असतो तसंच काहीसे अॅपलच्या इव्हेंटबाबत अससे. असाच एक खास इव्हेंट अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये पार पडला.
  • आयफोन X च्या प्रचंड यशानंतर अॅपलने आयफोन Xs, आयफोन Xs Max आणि आयफोन Xr असे तीन आयफोन अॅपल कंपनीने लाँच केले आहेत.
  • अॅपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टीम कूक यांनी या फोनचे लाँन्चिग केले. कॅलिफॉर्नियातील अ‍ॅपल पार्कमधील स्टीव्ह जॉब्स सभागृहामध्ये नवीन आयफोनचे अनावरण करण्यात आले.
  • तसेच तीन नव्या आयफोनसह अॅपलची वॉच सीरिज 4 ही लाँच करण्यात आली आहे. नव्या अॅपल वॉच 4 मध्ये तीन नवे ‘हार्ट फिचर’ दिले गेले आहेत. लो हार्ट रेट, हार्ट रिदम आणि ईसीजी अशी ही तीन वैशिष्ट्ये आहेत.
  • आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अॅपल कंपनीने यावर्षी नवे फिचर आणि बरेच काही दिले आहे. यामध्ये ड्युल सिमची सुविधाही देण्यात आली आहे. त्यामुळे आता भारतात अॅपल वापरणाऱ्यांच्या संख्येत साधारण 2 टक्क्यांनी वाढ होईल असे कंपनीचे मत आहे.

‘एसटी’च्या निवृत्त कर्मचाऱ्यांना मोफत प्रवास:

  • राज्य परिवहन महामंडळातील (एसटी) निवृत्त कर्मचाऱ्यांना अखेर मोफत प्रवासाचा पास देण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. यामुळे राज्यातील 25 हजार निवृत्तांना वर्षातून सहा महिने सपत्नीक मोफत प्रवासाची संधी उपलब्ध झाली आहे. ST Mahamandal
  • एसटीच्या दरवर्षी निवृत्त होणाऱ्या चार हजार कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे. निवृत्तीनंतर कुटुंबासह धार्मिक पर्यटन करण्याची कर्मचाऱ्यांची इच्छा असते. त्यांची ही मागणी परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी मान्य केली आहे.
  • ऐन उमेदीच्या काळात एसटीची सेवा करणाऱ्यांचा निवृत्तीचा काळ वर्षातून सहा महिने सपत्नीक मोफत प्रवासाने आनंदात जावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

दिनविशेष:

  • मोनाको ग्रांप्री चे संस्थापक अँटोनी नोगेस यांचा जन्म 13 सप्टेंबर 1890 मध्ये झाला.
  • सन 1948 मध्ये ऑपरेशन पोलोविलीनीकरणासाठी भारतीय सैन्याने हैदराबादवर चढाई केली.
  • सन 1996 मध्ये श्रीमती जानकीदेवी बजाज पुरस्कार ज्येष्ठ समाजसेविका श्रीमती इंदुमती पारिख यांना दिला.
  • सन 2003 मध्ये ज्येष्ठ गायक पं. दिनकर कैकिणी आणि मेंडोलिन वादक यू. श्रीनिवास यांना राष्ट्रीय कुमार गंधर्व पुरस्कार जाहीर झाला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
1 Comment
  1. Anil Sherkar says

    Welcome

Leave A Reply

Your email address will not be published.