13 ऑक्टोबर 2022 चालू घडामोडी – Current Affairs

रॉजर बिन्नी
रॉजर बिन्नी

13 October 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (13 ऑक्टोबर 2022)

सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांच्या यादीत भारत अव्वल स्थानी :

  • आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) 2022-23 या चालू आर्थिक वर्षासाठीचा आर्थिक विकास अहवाल नुकताच प्रकाशित केला आहे.
  • या अहवालात आयएमएफने भारताच्या अर्थव्यवस्था वाढीचा अंदाज वर्तविताना तो 6.8 टक्के राहणार असल्याचे म्हटले आहे.
  • तसेच जगात सध्या मंदीचे सावट असतानाही भारत सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असल्याचे आयएमएफकडून सांगण्यात आले आहे.
  • दरम्यान, भारतीय रिझर्व्ह बँकेने 2022-23 या आर्थिक वर्षात भारताचा विकासदर 7 टक्के राहणार असल्याचा अंदाज वर्तवला होता.

‘महाकाल लोक कॉरिडॉर’चे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन :

  • उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिराभोवती उभारण्यात आलेल्या ‘महाकाल कॉरिडॉर’चे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी सायंकाळी उद्घाटन करण्यात आले.
  • 900 मीटर लांबीच्या या कॉरिडॉरच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून दुसऱ्या टप्प्याचे काम वर्षभरात पूर्ण करण्यात येणार आहे.
  • पंतप्रधानांसमवेत मध्य प्रदेशचे राज्यपाल मंगूभाई पटेल आणि मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.
  • महाकालेश्वर मंदिर कॉरिडॉर विकास प्रकल्प भगवान शिवाला समर्पित असून भारतातील 12 ज्योतिर्लिगापैकी एक असलेल्या या ज्योतिर्लिगाला भेट देणाऱ्यांसाठी चांगल्या सुविधा प्रदान करेल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
  • या कॉरिडॉरसाठी दोन भव्य प्रवेशद्वारे उभारण्यात आली आहेत. नंदी द्वार आणि पिनाकी द्वार. ही दोनही द्वारे काही अंतरावर असून मंदिराच्या प्रवेशद्वारापर्यंत या दोन्ही महाद्वारांतून जाता येईल.
  • या कॉरिडॉरमध्ये शिव पुराणमधील कथा दर्शविणारी 50 हून अधिक भित्तिचित्रे आहेत.
  • वाळूच्या दगडांनी तयार करण्यात आलेले 108 सुशोभित स्तंभ आहेत.
  • कॉरिडॉरमध्ये विविध देवतांच्या मूर्ती बसवण्यात आल्या आहेत, त्याशिवाय हिंदू धर्मातील विविध कथा सांगणाऱ्या मूर्तीही बसवण्यात आल्या आहेत.
  • कॉरिडॉरमधील 108 स्तंभांवर आनंद तांडव दाखवणारे दृश्य, भगवान शिव व देवी शक्ती यांची भित्तिचित्रे आणि 200 मूर्ती आहेत.

‘इन्फोसिस’चे अध्यक्ष रवी कुमार एस यांचा राजीनामा :

  • आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी असणाऱ्या इन्फोसिसचे अध्यक्ष रवी कुमार एस यांनी अध्यक्षपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे.
  • कंपनीकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे.
  • दुसऱ्या तिमाहीतील कंपनीच्या उत्पन्नाच्या घोषणेच्या अगोदरच अध्यक्षांचा राजीनामा आलेला आहे.
  • रवी कुमार हे अध्यक्ष या नात्याने इन्पोसिस सर्व्हिस्ड ऑर्गनायझेशनचे काम पाहत होते.
  • त्यांनी डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन, कन्सल्टिंग, पारंपारिक तंत्रज्ञान, डेटा आणि विश्लेषण, क्लाउड आणि इन्फ्रा सेवांचे काम पाहिले.

रॉजर बिन्नी ‘बीसीसीआय’चे नवे अध्यक्ष :

  • माजी अष्टपैलू आणि 1983च्या ऐतिहासिक विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचे सदस्य रॉजर बिन्नी यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदी बिनविरोध निवड होण्याची दाट शक्यता आहे.
  • 18 ऑक्टोबरला ‘बीसीसीआय’ची वार्षिक सर्वसाधारण सभा होणार असून त्याच दिवशी मंडळाची निवडणूक पार पडेल.
  • गेल्या आठवडय़ाभरात ‘बीसीसीआय’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठका झाल्या.
  • या बैठकांमध्ये विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुलीच्या कामगिरीबाबत नाराजीचा सूर होता.
  • त्यामुळे ‘बीसीसीआय’चे 36वे अध्यक्ष म्हणून बिन्नी यांच्या नावाला पसंती देण्यात आल्याची माहिती आहे.
  • केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे सुपुत्र जय शहा यांची ‘बीसीसीआय’च्या सचिवपदी फेरनिवड होणे अपेक्षित आहे.
  • तसेच ‘बीसीसीआय’मधील अन्य मुख्य पदासांठी राजीव शुक्ला (उपाध्यक्ष), देवजित सैकिया (सहसचिव) आणि आशीष शेलार (कोषाध्यक्ष) हे उमेदवार आहेत.
  • केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांचे धाकटे बंधू अरुणसिंग धुमाळ हे सध्या ‘बीसीसीआय’मध्ये कोषाध्यक्षपद भूषवत आहेत.

दिनविशेष:

  • 13 ऑक्टोबर हा दिवस आंतरराष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती निवारण दिन आहे.
  • स्वातंत्र्यसेनानी होमरुल चळवळीतील कार्यकर्ते ‘भुलाभाई देसाई‘ यांचा जन्म 13 ऑक्टोबर 1877 मध्ये झाला.
  • सन 1773 मध्ये चार्ल्स मेसियर यांनी व्हर्लपूल गॅलेक्सीचा शोध लावला.
  • सन 1929 या वर्षी पुण्यातील पर्वती देवस्थान दलितांना खुले झाले.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.