13 October 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

गाईच्या शेणापासून अँटी रेडिएशन चिप बनवल्याचा दावा:
गाईच्या शेणापासून अँटी रेडिएशन चिप बनवल्याचा दावा

13 October 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (13 ऑक्टोबर 2020)

जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सननं करोना लशीच्या चाचण्या थांबवल्या:

 • अमेरिकेतील जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सननंही करोनावर लस निर्माण केली आहे. मात्र, या लशीच्या चाचण्या अचानक काही काळासाठी थांबवण्यात आल्या आहेत.
 • स्वयंसेवकांच्या शरीरावर दुष्परिणाम दिसून आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
 • अमेरिकेत मॉर्डना, पीफायझर या कंपन्यांप्रमाणे जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सनने करोनावर लस शोधून काढली आहे.
 • या लशीच्या चाचण्या सध्या सुरू आहेत. प्रायोगिक लशीचा सिंगल डोस दिल्यानंतर स्वयंसेवकांमध्ये करोना व्हायरस विरोधात लढण्यासाठी मजबूत रोगप्रतिकारक शक्ती निर्माण झाली.
 • जॉन्सन अँड जॉन्सनच्या Ad26.COV2.S लशीचे दोन डोस घेतल्यानंतरही स्वयंसेवकांच्या शरीरावर कुठलेही दुष्परिणाम दिसले नव्हते. त्यामुळे ही लस करोनावर अत्यंत प्रभावी समजली जात आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (12 ऑक्टोबर 2020)

गाईच्या शेणापासून अँटी रेडिएशन चिप बनवल्याचा दावा:

 • गौमूत्र आणि शेणाचे अनेक फायदे अनेकांना माहितीच आहे. पण, गाईच्या शेणापासून आता चक्क अँटी रेडिएशन चिप तयार करण्यात आली आहे.
 • ही चिप मोबाईलसाठी वापरता येणार आहे. हे आजारांविरोधात ढाल असल्याचा दावा कामधेनू आयोगानं केला आहे.
 • कामधेनू आयोगानं गाईच्या शेणापासून अँटी रेडिएशन चिप बनवल्याचा दावा केला आहे.
 • गाईचं शेण सगळ्यांना सुरक्षित ठेवेल. गाईचं शेण हे रेडिएशन विरोधी असल्याचं वैज्ञानिकरित्या सिद्ध झालेलं आहे.
 • गाईच्या शेणापासून बनवलेली अँटी रेडिएशन चिप रेडिएशन कमी करण्यासाठी मोबाईलमध्येही वापरता येऊ शकते.
 • आजारांविरोधात हे एक प्रकारे सुरक्षा कवच आहे,” असा दावा कामधेनू आयोगाचे अध्यक्ष वल्लभभाई कठीरिया यांनी केला आहे.

2020चा अर्थशास्त्रातला नोबेल पुरस्कार पॉल मिलग्रोम आणि रॉबर्ट विल्सन यांना जाहीर:

 • गेल्या आठवडा भरापासून नोबेल पुरस्कारांची घोषणा केली जात आहे. नोबेल समितीकडून आज शेवटच्या नोबेल पुरस्काराची घोषणा करण्यात आली.
 • त्यानुसार, सन २०२०चा अर्थशास्त्रातला नोबेल पुरस्कार पॉल मिलग्रोम आणि रॉबर्ट विल्सन यांना जाहीर झाला आहे.
 • मिलग्रोम आणि विल्सन यांना हा पुरस्कार लिलावाचा सिद्धांतात सुधारणा आणि नव्या पद्धतींच्या शोधांसाठी देण्यात आला आहे.
 • हे दोघेही अमेरिकेच्या स्टॅनफोर्ड विद्यापीठात कार्यरत आहेत. त्यांनी अशा वस्तू आणि सेवांसाठी लिलावाची नवी प्रक्रिया तयारी केली ज्या पारंपारिक पद्धतीने विकणे कठीण आहे.
 • या पद्धतीच्या शोधामुळे जगभरातील विक्रेते, खरेदीदार आणि करदात्यांना त्याचा मोठा फायदा झाला आहे.

भारताचे माजी फुटबॉलपटू कार्लटन चॅपमन यांचे निधन:

 • भारताच्या फुटबॉल संघाचे माजी कर्णधार कार्लटन चॅपमन यांचे हृदयविकाराच्या झटक्याने बेंगळूरु येथे सोमवारी पहाटे निधन झाले.
 • ते 49 वर्षांचे होते. बायचुंग भूतिया, आय. एम. विजयन आणि चॅपमन असे त्रिकूट 1990च्या दशकात प्रसिद्ध होते.
 • 1990च्या सुरुवातीला टाटा फुटबॉल अकादमीकडून त्यांची कारकीर्द सुरू झाली. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने 1997 मध्ये सॅफ चषक पटकावला होता.
 • 1996-97 मध्ये झालेली पहिलीवहिली नेशन्स फुटबॉल लीग जेसीटीने जिंकण्यात चॅपमन, भूतिया आणि विजयन या त्रिकुटाचे योगदान मोलाचे राहिले.

दिनविशेष:

 • 13 ऑक्टोबर हा दिवस आंतरराष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती निवारण दिन आहे.
 • स्वातंत्र्यसेनानी होमरुल चळवळीतील कार्यकर्ते ‘भुलाभाई देसाई‘ यांचा जन्म 13 ऑक्टोबर 1877 मध्ये झाला.
 • सन 1773 मध्ये चार्ल्स मेसियर यांनी व्हर्लपूल गॅलेक्सीचा शोध लावला.
 • सन 1929 या वर्षी पुण्यातील पर्वती देवस्थान दलितांना खुले झाले.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (14 ऑक्टोबर 2020)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.