13 November 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
13 November 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (13 नोव्हेंबर 2020)
भारत ‘या’ देशाला विकणार घातक ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्र :
- ‘ब्रह्मोस’ हे भारताच्या ताफ्यातील सर्वात घातक क्रूझ क्षेपणास्त्र आहे. भारत लवकरच हे क्षेपणास्त्र निर्यात करु शकतो. पुढच्यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फिलिपिन्सचे राष्ट्राध्यक्ष रॉड्रिगो ड्युटर्ट यांच्यात एक परिषद होणार आहे. त्यावेळी दोन्ही देशांमध्ये ‘ब्रह्मोस’च्या निर्याती संदर्भात महत्त्वाचा करार होऊ शकतो.
- तर हा करार प्रत्यक्षात आल्यास फिलिपिन्स हा ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्र विकत घेणारा भारताचा पहिला ग्राहक ठरेल.
- ‘ब्रह्मोस’ हे भारत आणि रशियाने मिळून विकसित केलेले क्षेपणास् आहे. ब्रह्मोस एरोस्पेसची एक टीम पुढच्या महिन्यात डिसेंबरमध्ये या करारासंदर्भात मनिलाला जाऊ शकते.
- तसेच दोन्ही देशांमध्ये हा करार होण्याआधी काही मुद्दे आहे, त्यावर तोडगा काढण्यासाठी ही टीम मनिलाला जाणार आहे. फिलिपिन्सच्या लष्कराला जमिनीवरुन जमिनीवर हल्ला करणाऱ्या ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्राच्या आवृत्तीचा पुरवठा करण्यात येईल.
- हवेतून जमिनीवर मारा करणारे ब्रह्मोस हे भारताचे सर्वात घातक क्रूझ क्षेपणास्त्र आहे. 300 किलो वॉरहेड वाहून नेण्याची क्षमता असलेले हे क्षेपणास्त्र हिंदी महासागरातील चिनी युद्धनौका तसेच तिबेट आणि शिनजियांगमधील चीनच्या धावपट्टया उद्धवस्त करु शकते.
- तर या क्षेपणास्त्राचे वैशिष्टय म्हणजे सुखोई Su-30 MKI या फायटर जेटमधूनही हे क्षेपणास्त्र डागता येते. त्यामुळे ब्रह्मोसमधून होणारा हल्ला अधिका घातक असेल. चीन बरोबर सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने लडाखमध्येही हे क्षेपणास्त्र तैनात केले आहे. “भारत आणि रशिया मिळून या क्षेपणास्त्राचा पल्ला वाढवण्यावर काम करत
Must Read (नक्की वाचा):
भारतीय नौदलाच्या ताफ्यात शक्तिशाली आयएनएस वागीर पाणबुडी दाखल :
- केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे वागीर या पाणबुडीचे उद्घाटन केले. मुंबईतील माझगाव डॉकयार्डने शिपबिल्डर्सने ही पाणबुडी भारतीय नौदलाला सुपूर्द केली.
- भारतीय नौदलाने आपल्या ताफ्यात पाचव्या श्रेणीची पाणबुडी ‘आयएनएस वजीर’ सामील झाली. गुरुवारी दक्षिण मुंबईतील माझगाव डॉक येथे आयएनएसवजीर समुद्रात सोडण्यात आली. ही पाणबुडी शत्रूच्या रडारपासून बचाव करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज आहे.
- केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या पत्नी विजया यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पाणबुडीचा शुभारंभ केला.
- गोवा येथून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे नाईक या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
- वजीर पाणबुडी ही भारतात तयार होणार्या सहा काळवेरी-वर्ग पाणबुडींचा एक भाग आहे. या पाणबुडीची रचना फ्रेंच सागरी संरक्षण व ऊर्जा कंपनी डीसीएनएस यांनी केली असून भारतीय नौदलाच्या प्रकल्प 75 अंतर्गत हे काम सुरू आहे.
- पाणबुडीचे नाव हिंद महासागरातील शिकारी मासा ‘वजीर’ यावरून ठेवले आहे. पहिली वजीर पाणबुडी रशियाकडून खरेदी करण्यात आली जी 3 डिसेंबर 1973 रोजी भारतीय नौदलात दाखल झाली आणि तीन दशकांच्या सेवेनंतर 7 जून 2001 रोजी तिला सेवेतून मुक्त करण्यात आली.
राष्ट्रीय जल पुरस्कारात महाराष्ट्राची सरशी :
- जलसंधारण क्षेत्रामध्ये महाराष्ट्राने चमकदार कामगिरी करत राष्ट्रीय जल पुरस्कारावर आपली मोहर उमटवली आहे. विविध क्षेत्रात एकूण 6 पुरस्कार पटकाविले आहेत.
- तर सांगली जिल्ह्याला नदी पुनरुज्जीवनासाठी तर अमरावती जिल्ह्यातील शरद पाणी वापर ठिंबक सिंचन सहकारी सोसायटीला पहिला पुरस्कार मिळाला. याशिवाय नाशिक, जळगाव आणि बीड जिल्हयांनीही या पुरस्कारावर आपले नाव कोरले आहे.
- केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या वतीने जलसंधारण क्षेत्रात वैविध्यपूर्ण व उल्लेखनिय कार्य करणाºया व्यक्ती व संस्थाच्या कार्याचा गौरव म्हणून ‘राष्ट्रीय जल पुरस्कार 2019’ चे वितरण करण्यात आले.
2 लाख 65 हजार कोटींच्या अर्थसाह्य़ाची घोषणा :
- करोनामुळे मंदावलेली अर्थव्यवस्था गतिमान करण्यासाठी ‘आत्मनिर्भर भारत’ योजने अंतर्गत 2 लाख 65 हजार कोटींच्या तिसऱ्या आर्थिक साह्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी केली.
- तर त्यात 26 क्षेत्रांतील रोजगारनिर्मितीला प्रोत्साहन देणाऱ्या नव्या योजनेचा समावेश असून, गृहखरेदी करणाऱ्या मध्यमवर्गाला तसेच बांधकाम क्षेत्राला सवलतीची दिवाळीभेट देण्यात आली आहे.
- आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेची घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली. भविष्य निर्वाह निधी संघटनेशी (ईपीएफओ) संलग्न आस्थापनांमध्ये 15 हजारांपर्यंत मासिक वेतन असलेल्या नव्या कर्मचाऱ्यांना योजनेचा लाभ मिळेल.
- 1 मार्च ते 30 सप्टेंबर 2020 या कालावधीत रोजगार गमावलेल्या आणि 1 ऑक्टोबर 2020 वा त्यानंतर पुन्हा रोजगार मिळवलेल्या कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार आहे.
- एक हजार कर्मचारी असलेल्या कंपनीतील कर्मचारी व कंपनीमालकाकडून दिला जाणारा भविष्य निर्वाह निधीतील प्रत्येकी 12 टक्क्यांचा मासिक हप्ता पुढील दोन वर्षांसाठी केंद्र सरकार भरेल. एक हजारपेक्षा जास्त कर्मचारी असतील तर फक्त कर्मचाऱ्यांचा 12 टक्क्यांचा हप्ता सरकार भरेल.
- तसेच ही योजना 30 जून 2021 पर्यंत सुरू राहणार असून, 50 पर्यंत कर्मचारी असलेल्या कंपनीने किमान दोन अतिरिक्त रोजगार, तर 50 पेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या कंपनीने किमान 5 अतिरिक्त रोजगार निर्माण करणे गरजेचे आहे.
दिनविशेष:
- 13 नोव्हेंबर हा दिवस ‘जागतिक दयाळूपणा दिन‘ म्हणून पाळला जातो.
- शिख साम्राज्याचे संस्थापक महाराजा रणजितसिंग यांचा जन्म 13 नोव्हेंबर 1780 मध्ये झाला होता.
- रवीन्द्रनाथ टागोर यांना स्वीडिश अॅकॅडमीने गीतांजली या साहित्यासाठी सन 1913 मध्ये नोबेल पारितोषिक जाहीर केले.
- महाराष्ट्राचे 5 वे व 9 वे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा जन्म 13 नोव्हेंबर 1917 मध्ये झाला होता.
- वामनराव पटवर्धनांनी पुढाकार घेऊन सन 1921 मध्ये पुण्यास अखिल भोर संस्थान प्रजा सभा स्थापन केली.
- सन 1931 मध्ये शंकर रामचंद्र तथा मामाराव दाते यांनी मोनोटाईप मशीनवर देवनागरी लिपीची यांत्रिक जुळणी यशस्वी केली.