13 May 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
13 May 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (13 मे 2020)
लॉकडाउन 4 ची घोषणा :
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना संबोधित करत लॉकडाउन वाढवला जाणार असून चौथा टप्पा सुरु होईल अशी घोषणा केली आहे. यावेळी त्यांनी हा लॉकडाउन वेगळा असेल असंही सांगितलं आहे.
- नरेंद्र मोदींनी यावेळी करोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी 20 लाख कोटींचं आर्थिक पॅकेजही जाहीर केलं.
तर हे पॅकेज भारताच्या जीडीपीच्या 10 टक्के असेल, पॅकेजद्वारे आर्थिक व्यवस्था मजबूत करण्यात येईल. - तसेच कुटीर, गृह, लघू उद्योगांना चालना देण्यासाठी हे पॅकेज आहे. देशांसाठी दिवसरात्र झटणाऱ्या शेतकरी, मजुरांसाठी तसेच प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या मध्यमवर्गीयांसाठी पॅकेज आहे. अर्थमंत्री यांच्याकडून आत्मनिर्भर भारत अभियानाची विस्तृत माहिती दिली जाईल.
- सुधारणा राबवणं हे महत्वाचं आहे. सुधारणा राबवल्यामुळेच संकटात टिकलो आहोत. कोणी विचार केला होता शेतकऱ्यांना थेट पैसे मिळतील, हेदेखील त्यावेळेस झालं आहे ज्यावेळेस सगळं बंद होतं. सुधारणा आता आणखी वाढवाव्या लागतील.
Must Read (नक्की वाचा):
करोनावर प्रभावी ठरणाऱ्या ‘त्या’औषधाच्या भारतात सुरु झाल्या चाचण्या :
- अॅंटीव्हायरल ड्रग फॅव्हीपीरावीर या औषधाच्या क्लिनिकल चाचण्या भारतात सुरु झाल्या आहेत अशी माहिती ग्लेनमार्क फार्मास्यूटिकल्स लिमिटेडने मंगळवारी दिली.
- तर फॅव्हीपीरावीर हे करोना व्हायरसवर प्रभावी ठरणाऱ्या औषधांपैकी एक आहे.
- एप्रिल महिन्यात भारतातील औषध नियमन करणाऱ्या संस्थेकडून फॅव्हीपीरावीर औषधाच्या क्लिनिकल चाचण्यांना परवानगी मिळाली होती.
- ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने दिलेल्या परवानगीमुळे Covid-19 च्या रुग्णांवर औषधाची चाचणी घेण्याची परवानगी मिळालेली आपण पहिली कंपनी ठरल्याचे ग्लेनमार्ककडून सांगण्यात आले.
- जपानमधील फुजीफिल्म होल्डींग कॉर्पोरेशन एविगन या ब्रॅण्डनेमखाली फॅव्हीपीरावीर या औषधाची निर्मिती करते.
- जपानमध्ये ताप, सर्दीवर असलेल्या फॅव्हीपीरावीर या औषधाचा वापर करण्याची 2014 मध्ये परवानगी देण्यात आली.
रेशन कार्डाच्या नियमामध्ये बदल :
- केंद्र सरकारनं रेशन कार्डसंबंधी एका नियमात बदल केला आहे. सरकारच्या या निर्णयाचा फायदा कोट्यवधी लाभार्थ्यांना मिळण्याची शक्यता आहे.
- रेशन कार्डाला आधार क्रमांकाशी जोडण्याची अंतिम तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. आता सप्टेंबरपर्यंत रेशन कार्डाला आधार क्रमांकाला जोण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. सोमवारी सरकारनं यासंदर्भातील निर्णय जाहीर केला.
- तसंच आधार क्रमांक जोडला नसेल तरी रेशन कार्डधारकाला धान्य मिळत राहणार असल्याचंही सरकारनं सांगितलं. रेशन कार्डाला आधार क्रमांक न जोडल्यास रेशन कार्ड रद्द करण्यात येण्याच्या वृत्तावर स्पष्टीकरण देताना सरकारनं ही माहिती दिली.
- सरकारनं आता आधार क्रमांक रेशन कार्डाला जोडण्याची मुदत 30 सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे.
विद्यार्थ्यांच्या परीक्षेसंदर्भातील शंका निरसनासाठी विद्यापीठाची हेल्पलाईन :
- मुंबई विद्यापीठाकडून कोविड – 19 च्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या परीक्षा व पुढील वर्गातील प्रवेशासंदर्भात विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाईन क्रमांक व ईमेल सुविधा सुरु केली आहे.
- विद्यार्थी या हेल्पलाईन क्रमांकावर व ईमेलवर संपर्क साधून परीक्षा व पुढील वर्गातील प्रवेशासंदर्भात मार्गदर्शन घेऊ शकणार आहेत.
- विद्यापीठ अनुदान आयोग (युजीसी ) व राज्य शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या निर्देशानुसार मुंबई विद्यापीठाने ही हेल्पलाईन आणि ई मेल सेवा सुरु केली आहे.
17 वर्षांखालील फुटबॉल विश्वचषक भारतातच :
- कोरोनामुळे स्थगित करण्यात आलेले 17 वर्षांखालील महिला फुटबॉल विश्वचषकाचे आयोजन पुढीलवर्षी 17 फेब्रुवारी ते 7 मार्च या कालावधीत भारतातच होईल, असे फिफाने मंगळवारी स्पष्ट केले.
- तर कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर हा निर्णय घेतला.
- तसेच आधी या स्पर्धेचे आयोजन 2 ते 21 नोव्हेंबर या कालावधीत होणार होते.
- जगभरात कोरोनामुळे लॉकडाऊन होताच मागच्या महिन्यात स्पर्धा स्थगित करण्यात आली होती.
- तर या स्पर्धेचे मूळ पात्रता नियम कायम राहणार असून एक जानेवारी 2003 किंवा त्यानंतर ते 31 डिसेंबर 2005 पूर्वी जन्मलेले खेळाडू विश्वचषकात सहभागी होऊ शकतील.
दिनविशेष :
- 13 मे 1880 मध्ये थॉमस अल्वा एडिसनने मेन्लो पार्क, न्यू जर्सी येथे विजेवर चालणाऱ्या रेल्वेची चाचणी केली.
- अमेरिकेतील पहिले व्यावसायिक एफएम रेडियो स्टेशन 13 मे 1939 मध्ये सुरु झाले.
- फॉर्म्युला वन वर्ल्ड चॅम्पियनशीपची पहिला रेस 13 मे 1950 मध्ये सिल्व्हरस्टोन येथे झाली.
- 13 मे 1952 मध्ये भारतातील राज्यसभेचे पहिले अधिवेशन भरले.
- ऑक्सिजन किंवा शेर्पा यांच्या मदतीशिवाय माउंट एव्हरेस्ट सर करणारी एलिसन हरग्रिव्हज ही पहिली महिला 13 मे 1995 मध्ये बनली.
- भारताने दोन परमाणु शास्त्रांची तपासणी पोखरण येथे 13 मे 1998 मध्ये केली.