13 March 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

भारतीय स्टेट बँक
भारतीय स्टेट बँक

13 March 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (13 मार्च 2020)

‘मिनिमम बॅलन्स’बद्दल स्टेट बँकेचा मोठा निर्णय :

  • भारतीय स्टेट बँकेने मोठा निर्णय घेतला आहे. एसबीआयनं सर्व बचत खात्यांसाठी दरमहा किमान शिल्लक रकमेची अट काढून टाकली आहे.
  • तर त्यामुळे बँकेच्या 44 कोटींहून अधिक ग्राहकांना याचा फायदा पोहोचणार आहे. यासंदर्भात स्टेट बँकेनं निवेदन जारी केले आहे.
  • तसेच आता बचत खात्यात किमान शिल्लक रक्कम ठेवण्याचे कोणतेही बंधन ग्राहकांवर नसेल. बँकेने ही जाचक अट आता काढून टाकल्यानं त्याचा ग्राहकांना फायदा पोहोचणार आहे.
  • गेल्या काही दिवसांपूर्वीच भारतीय स्टेट बँकेत तिच्या पाच संलग्न बँका तसेच भारतीय महिला बँक विलीन करण्यात आल्या आहेत. त्या बँकांनाही हे नियम लागू झाले आहेत.
  • तसेच एसबीआयच्या या निर्णयामुळे खातेदारांना बचत खात्यात किमान सरासरी शिल्लक रक्कम ठेवण्याची आवश्यकता नाही. तसेच बचत खात्यात दरमहा किमान शिल्लक रक्कम नसल्यावरही बँक कोणताही दंड वसूल करणार नसून याचा 44 कोटी 51 लाख बचत खातेदारांना फायदा पोहोचणार आहे.
  • सध्या ‘एसबीआय’मध्ये ग्राहकांना ठरावीक नेमून दिलेली रक्कम बचत खात्यात ठेवावी लागते. खात्यात किमान शिल्लकीच्या कमी रक्कम झाल्यास त्यावर बँक 5 ते 15 रुपये दंड कराच्या स्वरूपात वसूल केले जातात. या निर्णयापूर्वी शहरांसाठी 3000 रुपये, निमशहरी भागातील खातेदारांसाठी 2000 रुपये आणि ग्रामीण भागात दरमहा सरासरी 1000 रुपयांची शिल्लक ठेवण्याची अट होती. मात्र आता ती अट आता शिथिल करण्यात आली आहे.
  • विशेष म्हणजे ‘एसबीआय’ने बचत खात्याचे व्याजदरही कमी केलेले आहेत. बचत खात्याच्या व्याजदरात 0.25 टक्क्यांची कपात करण्यात आली असून, तो 3 टक्क्यावर आला आहे. 1 लाख किंवा त्याहून कमी रक्कम असलेल्या बचत खात्यावर आता ग्राहकांना 3 टक्क्यांच्या दरानं व्याज मिळणार आहे. यापूर्वी बचत खात्यावर 3.25 टक्के व्याजदर होता.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (12 मार्च 2020)

मुंबई सेंट्रलचे नामकरण आता जगन्नाथ शंकरशेट स्थानक :

  • मुंबईचे आद्य शिल्पकार आणि भारतीय रेल्वेचे जनक जगन्नाथ शंकरशेट यांचे नाव पश्चिम रेल्वेवरील मुंबई सेंट्रल स्थानकास देण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. गुरुवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. आता हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे मान्यतेसाठी जाईल.
  • भारतीय रेल्वेच्या जनकांपैकी एक असलेले जगन्नाथ शंकरशेट यांचे नाव मुंबई सेंट्रल टर्मिनसला देण्यात यावे, ही मागणी अनेक वर्षांपासून केली जात होती. त्यांच्या पुढाकाराने आशियातील पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे यादरम्यान सुरू झाली.
  • तर त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून मध्य रेल्वेच्या मुख्यालयाच्या इमारतीमध्ये त्यांचा अर्धपुतळा उभारण्यात आला. मुंबईतील रेल्वे स्थानकांची ब्रिटिशकालीन नावे बदलण्याची मागणी वारंवार होत असते.
  • तसेच त्यातूनच जुलै- 2018 मध्ये ‘एलफिन्स्टन रोड’चे नामकरण ‘प्रभादेवी’ असे केले होते. चर्नी रोड, ग्रँट रोड, करी रोड, दादर याही स्थानकांच्या नामबदलाची मागणी केली जात आहे.

रजनीकांत यांनी राजकीय पक्ष स्थापन करण्याची केली घोषणा :

  • दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी राजकारणातील आपलं पुढील प्रवास कसा असेल याबाबत माहिती दिली आहे. ते एक नवा पक्ष स्थापन करणार आहेत. तसंच त्यांचा पक्ष आणि सरकार हे वेगवेगळं काम पाहणार आहेत.
  • तर ते स्वत: पक्षाचे अध्यक्ष म्हणून काम पाहणार असून ते मुख्यमंत्रीपदाच्या शर्यती नसतील. तसंच जो पक्षाचा नेता असेल तो कधीच सरकारचा भाग नसेल. हा पक्ष तामिळनाडून बदल घडवेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
  • तसेच गेल्या काही दिवसांपासून तामिळनाडूच्या राजकारणाची माहिती घेत असल्याचं रजनीकांत यांनी सांगितलं.
  • रजनीकांत यांच्या ड्युअल प्लॅननुसार त्यांच्या पक्षात दोन विभाग असतील. एक विभाग पक्षाचं कामकाज पाहिल, तर दुसरा सरकारमधील कामकाज पाहणार आहे.

भालाफेकपटू शिवपाल सिंह टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र :

  • भारताचा भालाफेकपटू शिवपाल सिंह आगामी टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे.
  • नीरज चोप्रानंतर टोकियो ऑलिम्पिकचं तिकीट मिळवलेला शिवपाल हा दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे.
  • तर पात्रता फेरीत ऑलिम्पिक तिकीट मिळवण्यासाठी 85 मी. चं अंतर पार करण्याची अट होती. शिवपालने 85.47 मी. लांब भाला फेकत टोकियोचं तिकीट मिळवलं.
  • टसेच गेल्या वर्षी दोहा येथे पार पडलेल्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतही शिवपालने 86.23 मी. अशी सर्वोत्तम कामगिरी केली होती.

दिनविशेष :

  • 13 मार्च 1781 मध्ये विल्यम हर्षेल यांनी युरेनसचा शोध लावला.
  • सॅन डीयेगो विद्यापीठाची स्थापना 13 मार्च 1897 मध्ये झाली.
  • पॅरिसहुन लंडनला येताच स्वातंत्र्यवीर सावरकर यांना 13 मार्च 1910 मध्ये अटक झाली.
  • 13 मार्च 1930 मध्ये क्लाईड डब्ल्यू. टॉमबॉग यांनी प्लुटो ग्रह शोधल्याचे हार्वर्ड विद्यापीठातील वेधशाळेला कळवले.
  • अमृतसर येथील जालियनवाला बाग हत्याकांडाचे समर्थन करणारे पंजाबचे गव्हर्नर मायकेल ओडवायर यांची 13 मार्च 1940 मध्ये उधमसिंग यांनी गोळया घालून हत्या केली.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (14 मार्च 2020)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.