13 जानेवारी 2022 चालू घडामोडी – Current Affairs

13 January 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (13 जानेवारी 2022)

सर्व दुकानांना मराठीत नामफलक बंधनकारक :

  • राज्यातील सर्व दुकाने व आस्थापनांचे नामफलक मराठी भाषेमध्ये असावेत, असा निर्णय मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला.
  • तर अन्य भाषांमध्ये नामफलक लावता येईल, पण अक्षरांचा आकार हा मराठीपेक्षा मोठा असता कामा नये, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
  • तसेच कामगार संख्या दहापेक्षा कमी किंवा अधिक असलेल्या सर्व आस्थापने किंवा दुकानांसाठी देवनागरी लिपीत मराठी भाषेमध्ये नामफलक प्रदर्शित करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
  • आस्थापनेचा नामफलक हा मराठीबरोबरच इतर भाषेतही लिहिता येईल. परंतु, मराठी भाषेतील नामफलक प्रारंभी लिहिणे आवश्यक आहे आणि मराठी भाषेतील नामफलकावरील अक्षरांचा आकार इतर भाषेतील अक्षरांच्या आकारापेक्षा लहान असू नये.
  • तसेच ज्या आस्थापनेत कोणत्याही प्रकारे मद्य विक्री किंवा मद्यपान सेवा दिली जात असेल, अशा दुकानास, बार, रेस्टॉरंटला महापुरुष किंवा आदरणीय महिलांची किंवा गड किल्ल्यांची नावे देण्यात येऊ नयेत, असाही निर्णय घेण्यात आला आहे.

वैयक्तिक प्रायोजकांची बोधचिन्हे वापरल्यास शुल्क आकारणी :

  • बुद्धिबळ स्पर्धामध्ये वैयक्तिक प्रायोजकांचे बोधचिन्ह (लोगो) प्रदर्शित करायचे असल्यास खेळाडूंकडून शुल्क आकारण्यात येईल अथवा आयोजकांच्या अन्य प्रायोजकांचा स्वीकार करावा, असे नवे आदेश जागतिक बुद्धिबळ महासंघाने (वल्र्ड चेस) दिले.
  • 2023 मध्ये होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ लढतीच्या पात्रता स्पर्धा 2022 मध्ये होईल.
  • तर या पात्रता स्पर्धेची पात्रता मिळवण्यासाठी बुद्धिबळपटूंकडे अखेरची संधी आहे.
  • 3 फेब्रुवारीपासून बर्लिन आणि बेलग्रेड येथे सुरू होणाऱ्या फिडे ग्रँड प्रिक्स बुद्धिबळ स्पर्धेद्वारे आणखी दोन बुद्धिबळपटू मुख्य पात्रता स्पर्धेतील स्थान पक्के करतील.
  • तसेच या स्पर्धेत सहभागी होणाऱ्यांना मंगळवारी ‘फिडे’कडून मेल पाठवण्यात आला.

दिनविशेष:

  • 13 जानेवारी 1610 मध्ये गॅलिलियो यांनी गुरूचा चौथा उपग्रह कॅलीस्टोचा शोध लावला.
  • मिकी माऊसची चित्रकथा 13 जानेवारी 1930 मध्ये प्रथम प्रकाशित.
  • 13 जानेवारी 1953 मध्ये मार्शल टिटो युगोस्लाव्हियाचे अध्यक्ष झाले.
  • हिराकुंड धरणाचे उद्घाटन 13 जानेवारी 1957 मध्ये झाले.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.