13 January 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

13 January 2019 Current Affairs In Marathi

13 January 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (13 जानेवारी 2019)

आर्थिक मागास आरक्षण विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी :

  • आर्थिक मागास आरक्षण विधेयकाला राष्ट्रपतींनी मंजुरी दिली आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये म्हणजेच लोकसभेत आणि राज्यसभेत या विधेयकाला मंजुरी मिळाली.
  • तसेच आता राष्ट्रपतींनीही मंजुरी दिल्याने या विधेयकाचं रुपांतर कायद्यात होणार आहे.
  • आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्यांना 10 टक्के आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

आर्थिक मागास आरक्षणासाठी निकष:

  • आठ लाख रुपयांपेक्षा कमी वार्षिक कौटुंबिक उत्पन्न
  • 1 हजार चौरस फूटांपेक्षा कमी जागेचं घर
  • महापालिका क्षेत्रात 100 गज म्हणजेच 900 चौरस फूटांपेक्षा कमी जागा
  • पाच एकरांपेक्षा जास्त शेतजमीन नसावी
  • अधिसूचित नसलेल्या नगरपालिका क्षेत्रात 200 गज म्हणजेच 1800 चौरस फुटांपेक्षा कमी जागेचं घर

ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड दौऱ्यासाठी शुभमन गिल-विजय शंकरची संघात निवड :

  • बीसीसीआयकडून निलंबनाची कारवाई भोगत असलेल्या हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल यांच्या जागी निवड समितीने विजय शंकर आणि युवा शुभमन गिलची भारतीय संघात निवड केली आहे.
  • ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमात हार्दिक पांड्याने महिलांविषयी आक्षेपार्ह विधानं केली होती, ज्यामुळे बीसीसीआयने दोन्ही खेळाडूंवर कारवाई करुन त्यांना ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून मायदेशी बोलावून घेतलं. या दोन्ही खेळाडूंच्या जागी गिल आणि विजय शंकरची संघात निवड करण्यात आलेली आहे.
  • 15 जानेवारी रोजी होणाऱ्या दुसऱ्या वन-डे सामन्याआधी विजय शंकर ऑस्ट्रेलियात दाखल होणार आहे. तर शुभमन गिल हा न्यूझीलंड दौऱ्याआधी भारतीय संघासोबत जोडला जाईल. भारतीय संघात निवड होण्याची शुभमन गिलची ही पहिलीच वेळ ठरली आहे.
  • तर यंदाच्या प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये शुभमन गिलने धडाकेबाज कामगिरी केली आहे. केवळ 9 सामन्यांमध्ये गिलने 1 हजार धावा केल्या आहेत.

खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धात महाराष्ट्राचे पदकांचे शतक:

  • बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडानगरीत सुरू असलेल्या ‘खेलो इंडिया’ युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी जलतरण, जिम्नॅस्टिक्स या क्रीडाप्रकारात छाप पाडली.
  • तर महाराष्ट्राच्या 17 आणि 21 वर्षांखालील मुला-मुलींनी चमकदार कामगिरी करत पदकांची लयलूट केली.
  • तसेच 41 सुवर्ण, 32 रौप्य आणि 41 कांस्यपदकांची कमाई करत महाराष्ट्राने शनिवारी 144 पदकांसह अग्रस्थान कायम राखले आहे.
  • महाराष्ट्राच्या खेळाडूंनी शनिवारी जलतरण आणि जिम्नॅस्टिक्समध्ये घवघवीत यश संपादन करत विविध खेळांमध्ये 9 सुवर्ण, 8 रौप्य, 6 कांस्यपदकांसह एकूण 23 पदकांची कमाई केली.

सीबीआयवर तीन राज्यांनी घातली बंदी, इतरही बंदीच्या तयारीत :

  • सीबीआयचे माजी प्रमुख आलोक वर्मा आणि विशेष संचालक राकेश अस्थाना यांच्यातील वादाच्या पार्श्वभूमीवर सीबीआय संकटात सापडल्याचे चित्र आहे. कारण, देशातील सर्वश्रेष्ठ तपास पथक म्हणून ओळख असलेल्या या संस्थेच्या विश्वसनीयतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत तीन राज्यांनी बंदी घातली आहे. तसेच इतर काही राज्येही बंदीच्या तयारीत आहेत.
  • गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सर्वात आधी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आपल्या राज्यात सीबीआयला छापे टाकण्यास तसेच एखाद्या प्रकरणाचा तपास करण्यावर बंदी घातली होती. त्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही सीबीआयवर बंदी घालताना या संस्थेचा आता केवळ राजकारणासाठी वापर केला जात असल्याचे म्हटले होते. त्यामुळे आता इतरही राज्ये आगामी काळात सीबीआयवर बंदी टाकण्याबाबत पावले उचलण्याची शक्यता आहे.
  • यात आता छत्तीसगड सरकारची नव्याने भर पडली असून सीबीआयने तपास करावा तसेच छापा टाकावा यासाठीची आधीपासूनच असलेली परवानगी पुन्हा मागे घेतली आहे.

समृद्धी महामार्गाला जिजाऊंचे नाव द्यावे अशी संभाजी राजेंची मागणी :

  • मुंबई आणि नागपूरला जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाला राजमाता जिजाऊंचे नाव देण्यात यावे, अशी मागणी खासदार संभाजीराजे भोसले यांनी केली आहे.
  • जिजाऊंच्या जन्मदिनानिमित्त सिंदखेड राजा येथे आयोजित कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना संभाजी राजे यांनी ही मागणी केली.
  • मुंबई आणि नागपूरला जोडणारा 800 किमी लांबीचा समृद्धी महामार्ग हा जिजाऊंच्या नावाने ओळखला गेला पाहिजे, असे ते म्हणाले.

ज्येष्ठ अभिनेते किशोर प्रधान यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार

  • मराठी रंगभूमी आणि चित्रपटात आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते किशोर प्रधान यांचे शनिवारी निधन झाले. ते 83 वर्षांचे होते.
  • मराठी व्यावसायिक रंगभूमी, इंग्रजी रंगभूमी, चित्रपट, दूरदर्शन आणि जाहिरातींमध्ये किशोर प्रधान यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमठवला आहे.
  • किशोर प्रधान यांनी नागपूरच्या मॉरिस महाविद्यालयातून पदवी मिळविली. पुढे अर्थशास्त्रात एम.ए. केले व नंतर मुंबईत येऊन त्यांनी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (टीस)मध्ये दोन वर्षांची रिसर्च स्कॉलरशिप मिळविली व मास्टर ऑफ सोशल सायन्सेस ही पदवी मिळवली होती.

दिनविशेष:

  • 13 जानेवारी 1610 मध्ये गॅलिलियो यांनी गुरूचा चौथा उपग्रह कॅलीस्टोचा शोध लावला.
  • मिकी माऊसची चित्रकथा 13 जानेवारी 1930 मध्ये प्रथम प्रकाशित.
  • 13 जानेवारी 1953 मध्ये मार्शल टिटो युगोस्लाव्हियाचे अध्यक्ष झाले.
  • हिराकुंड धरणाचे उद्घाटन 13 जानेवारी 1957 मध्ये झाले.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.