13 February 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

जागतिक रेडीओ दिन
जागतिक रेडीओ दिन

13 February 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (13 फेब्रुवरी 2020)

गगनयान मोहिमेतील चौघांचे रशियात प्रशिक्षण सुरू :

  • भारताच्या गगनयान या मानवी अवकाश मोहिमेत प्राथमिक निवड करण्यात आलेल्या चार उमेदवारांचे प्रशिक्षण रशियातील मॉस्को येथे असलेल्या गागारिन संशोधन व अवकाशवीर प्रशिक्षण केंद्रात (जीसीटीसी) सुरू झाले आहे.
  • भारतीय हवाई दलाच्या चार वैमानिकांची निवड यात अवकाशवारीसाठी करण्यात आली आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे इस्रो ही संस्था 2022 मध्ये गगनयान मोहिमेअंतर्गत भारतीयांना अवकाशात पाठवणार आहे.
  • तर या मोहिमेत एकूण तीनजणांना सात दिवस अवकाशवारीची संधी मिळणार असून गगनयान मोहिमेचा खर्च 10 हजार कोटींच्या घरात आहे. पृथ्वीपासून 300-400 कि.मी.च्या कक्षेत हे अवकाशवीर यानातून फिरणार आहेत.
  • तसेच या प्रशिक्षणासाठी ग्लावकॉसमॉस, जेएससी व इस्रोचे मानवी अवकाशमोहीम केंद्र यांच्यात करार झाला आहे. हे प्रशिक्षण बारा महिन्यांचे असून त्यात र्सवकष बाबींचा समावेश आहे. जैववैद्यकीय प्रशिक्षण यात महत्त्वाचे असून त्याबरोबरच अवकाशातील शारीरिक हालचालींचे प्रशिक्षणही देण्यात येणार आहे.
  • तसेच सोयूझ या माणसाला अवकाशात घेऊन जाणाऱ्या अवकाशयानातील यंत्रणांची माहिती त्यांना करून देण्यात येईल. वजनरहित अवस्थेत राहण्यासाठी त्यांना खास विमानाने नेऊन प्रशिक्षण दिले जाणार आहे. अवकाशयानाचे अवतरण दुर्दैवाने चुकीच्या पद्धतीने झाले तर काय कृती करायची हेही संभाव्य अवकाशवीरांना शिकवले जाणार आहे.
  • मानवी अवकाश मोहिमेच्या प्रशिक्षणासाठी इस्रोचे मानवी अवकाशमोहीम केंद्र व ग्लावकॉसमॉस यांच्यात 27 जून 2018 रोजी करार झाला होता.

अरविंद केजरीवाल यांचा शपथविधी 16 फेब्रुवारीला :

  • दिल्लीत भाजपला धूळ चारून दणदणीत विजय मिळविलेल्या आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांचा शपथविधी रविवारी रामलीला मैदानावर होणार आहे. आप आमदारांच्या बैठकीत विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून केजरीवाल यांची एकमताने निवड करण्यात आली.
  • तर केजरीवाल तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होत असून, त्याचा भव्य सोहळा करण्याचे आपने ठरविले आहे. राजधानीत राहणारा आम आदमी म्हणजे सर्वसामान्यांना या सोहळ्यात सहभागी करून घेतले जाणार आहे.
  • तसेच यशानंतर आपमध्ये उत्साह आहे. भ्रष्टाचाराच्या विरोधातील आंदोलन केजरीवाल यांनी याच मैदानावर केले होते. त्यामुळे तिथे शपथविधी सोहळा आहे.

इतर मागासवर्ग विभागाचे नाव बदलले, सरकारकडून नवीन नामकरण :

  • राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या निर्णयात महत्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यामध्ये, 5 दिवसांचा आठवडा, बालकांच्या कल्याणासाठी न्याय निधी आणि इतर मागास वर्गाचे नामकरण या निर्णयांचा समावेश आहे.
  • सरकारने इतर मागासवर्ग विभागाच्या नावात बदल केला आहे. इतर मागासवर्ग, सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागाचे नाव बदलून आता बहुजन कल्याण विभाग असे करण्यात आले आहे.
  • विभागाचे सध्याचे नाव खूप मोठे आणि विस्तारीत स्वरुपाचे आहे. सरकारने या विभागाकडे सोपविलेल्या योजना, विभागाने नव्याने सुरू केलेल्या योजना आणि उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून या विभागाकडे हस्तांतरीत केलेल्या योजनांचे स्वरुप पाहता विभागाचे नाव संक्षिप्त असावे, यावर एकमत झाले आहे.

अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत ‘सर जाडेजाचा’ क्रमवारीत सुधारणा :

  • सलामीवीर मार्टीन गप्टील आणि हेन्री निकोल्स यांच्या झुंजार फलंदाजीच्या जोरावर न्यूझीलंडने अखेरच्या वन-डे सामन्यातही बाजी मारली आहे. भारताने विजयासाठी दिेलेलं 297 धावांचं आव्हान न्यूझीलंडने 5 गडी राखत पूर्ण केलं.
  • तर या विजयासह न्यूझीलंडने वन-डे मालिकेत भारताला व्हाईटवॉश दिला असून, टी-20 मालिकेत झालेल्या पराभवाचा वचपा काढला आहे.
  • तसेच अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत भारतीय संघ तरुण खेळाडूंना घेऊन मैदानात उतरला होता. मात्र या खेळाडूंना संधीचं सोनं करता आलेलं नाही. भारताकडून लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, रविंद्र जाडेजा हे खेळाडू या मालिकेत चमकले. जाडेजाने फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातही आपली चमक दाखवत भारतीय संघाला विजय मिळवून देण्यात पुरेपूर प्रयत्न केले.
  • दरम्यान अफगाणिस्तानच्या मोहम्मद नाबीने या क्रमवारीत पहिल्या स्थानावर झेप घेतली असून, इंग्लंडचा बेन स्टोक्स दुसऱ्या स्थानी घसरला आहे. दरम्यान, वन-डे मालिकेनंतर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे.

15 दिवस देशभर मोफत मिळणार फास्टॅग :

  • महामार्गांवरील टोलवसुली इलेक्ट्रॉनिक पद्धतीने करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी 15 ते 29 फेब्रुवारी या 15 दिवसांसाठी वाहनधारकांना देशभर मोफत फास्टॅग उपलब्ध करून देण्याचा निर्णय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घेतला आहे.
  • तर एरवी फास्टॅगसाठी 100 रुपये शुल्क आकारले जाते. या 15 दिवसांत हे शुल्क आकारले जाणार नाही.
  • तसेच मात्र फास्टॅगसाठी ठेवावी लागणारी अनामत रक्कम व वॅलेटमध्ये ठेवावी लागणारी किमान शिल्लक याविषयीचे नियम पूर्वीप्रमाणेच लागू असतील, असे प्राधिकरणाने स्पष्ट केले. महामार्गांवरील टोकनाके, आरटीओ कार्यालये, सामायिक सेवाकेंद्रे, पेट्रोल पंप अशा ठिकाणी नि:शुल्क फास्टॅग मिळू शकतील.

अतिवृष्टी, पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पीककर्ज माफ :

  • राज्यात जुलै ते ऑगस्ट 2019 दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून मदत जाहीर करण्यात आली आहे.
  • मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. यामध्ये अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत राज्य सरकारने आज जीआर काढला आहे.
  • तर मागील वर्षी पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या पुराने लोकांचे जनजीवन विस्कळीत झालं होतं. कोल्हापूर, सातारा, सांगली याठिकाणी हजारो लोकांना सुरक्षितस्थळी हलविलं होतं.
  • तसेच राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे 13 जिल्ह्यातील तब्बल 2 लाख 1 हजार 496 हेक्टरवर क्षेत्रावरील पिके बाधित झाली असून, कोल्हापूर आणि सांगलीला सर्वाधिक फटका बसला होता. सव्वा लाख शेतकऱ्यांनी 3 लाख 77 हजार 119 हेक्टर पेरण्या केल्या होत्या; त्यापैकी 65 हजार 267 हेक्टर शेतीचे कंबरडे पावसाने मोडले होते.

EPFOनं खात्यातून पैसे काढणं अन् वळते करण्याचे नियम बदलले :

  • कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटने(EPFO-Employees Provident Fund Organization,)नं नोकरदारांना दिलासा देत मोठे नियम शिथिल केले आहेत.
  • ईपीएफओद्वारे ट्विटरवर देण्यात आलेल्या माहितीनुसार, ईपीएफओनं नियमावली आणखी सोपी केली आहे.
  • तसेच पहिल्यांदा नोकरी सोडण्याची तारीख (Now Employee’s can also update their Date of exit) ठरलेली नसल्यानं पैसे काढणे आणि वळते करण्यास अडचणी येत होत्या. आता EPFOनं नोकरदारांना त्रासापासून मुक्त होण्यासाठी युनिफाइड पोर्टल (UAN Portal)वर नवी सुविधा सुरू केली आहे.
  • तसेच या सुविधेंतर्गत कर्मचारी मागची कंपनी सोडण्याची तारीख स्वतः अपडेट करू शकणार आहेत. जेव्हा कोणतीही व्यक्ती नोकरी करण्यास सुरुवात करते, त्यावेळी संबंधित व्यक्तीच्या बेसिक पगारातून 12 टक्के पैसे कापले जातात. एवढंच योगदान कंपनीकडून दिलं जातं.
  • व्यक्तीच्या पगारातून 12 टक्के निधी कंपनीद्वारे ईपीएफमध्ये जमा केला जातो. कंपनीकडून 3.67 टक्के योगदान दिलं जातं आणि 8.33 टक्के योगदान हे कर्मचारी पेन्शन योजना म्हणजेच ईपीएसमध्ये जमा केले जातात.
  • तर आता स्वतःला नमूद करता येणार नोकरी सोडण्याची तारीख- EPFOनं नोकरदारांची त्रासापासून मुक्तता करण्यासाठी युनिफाइड पोर्टल (UAN Portal)वर नवी ऑनलाइन सुविधा सुरू केली आहे. या सुविधेंतर्गत कर्मचारी मागच्या कंपनीला सोडण्याची तारीख स्वतः अपडेट करू शकणार आहेत. म्हणजेच ईपीएफओच्या रेकॉर्डला त्यानं कंपनीला केव्हा सोडलं हे तात्काळ अपडेट होणार आहे.

जसप्रीत बुमराहने अव्वल स्थान गमावलं :

  • न्यूझीलंडविरुद्ध वन-डे मालिकेत भारताला स्विकाराव्या लागलेल्या पराभवामागचं प्रमुख कारण हे जसप्रीत बुमराहला एकही विकेट न मिळणं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.
  • तर त्याच्या याच कामगिरीचा फटका आयसीसी क्रमवारीत बसलेला आहे, ट्रेंट बोल्टने बुमराहला मागे टाकत अव्वल स्थान पटकावलं आहे, तर बुमराह दुसऱ्या स्थानावर घसरलेला आहे.
  • न्यूझीलंडविरुद्ध मालिकेत बुमराहच्या शैलीचा अभ्यास करुन प्रतिस्पर्धी फलंदाज मैदानात उतरले होते असं वाटत होतं. चेंडू हातातून सोडताना त्याची ठेवण, टप्पा कुठे पडणार याचा अंदाज या सर्व गोष्टींचा अभ्यास करुन न्यूझीलंडच्या फलंदाजांनी बुमराहची गोलंदाजी खेळून काढली. या मालिकेत बुमराहने भलेही धावा कमी दिल्या असल्या तरीही त्याला विकेट न मिळणं हे भारतासाठी धोकादायक ठरलेलं आहे.

अमेरिकेच्या नावावर लाजिरवाण्या विक्रमाची नोंद :

  • आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अमेरिकेच्या नावावर लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झालेली आहे.
  • नेपाळच्या किर्तीपूर शहरात सुरु असलेल्या ICC Men’s Cricket World Cup League 2 स्पर्धेत अमेरिकेचा संघ 35 धावांत गारद झाला.
  • तर आंतरराष्ट्रीय वन-डे क्रिकेटमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर बाद होण्याचा नकोसा विक्रम आता अमेरिकेच्या संघावर जमा झालेला आहे.
  • नेपाळने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. झेविअर मार्शल या फलंदाजाचा अपवाद वगळता एकही अमेरिकन फलंदाज दोन आकडी धावसंख्या गाठू शकला नाही.

आशिया सांघिक बॅडमिंटन स्पर्धात भारताची विजयी सलामी :

  • किदम्बी श्रीकांत, लक्ष्य सेन, शुभांकर डे यांनी एकेरीत विजयाची नोंद केल्याने भारताला आशिया सांघिक बॅडमिंटन स्पर्धेत कझाकस्तानवर 4-1 असा मोठा विजय नोंदवता आला. याबरोबरच भारताच्या उपांत्यपूर्व फेरी गाठण्याच्या आशा उंचावल्या आहेत.
  • तर माजी अव्वल मानांकित श्रीकांतकडून या स्पर्धेत मोठय़ा अपेक्षा आहेत. कारण ऑलिम्पिकसाठी लागणारी जागतिक क्रमवारीदेखील उंचावण्यासाठी या स्पर्धेचा उपयोग होणार आहे.
  • तसेच श्रीकांतने अपेक्षेप्रमाणे कझाकस्तानच्या डिमित्रिय पेनारिनला 21-10, 21-7 असे अवघ्या 23 मिनिटांत नमवले.
    युवा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन याने आर्टर नियाझोव्हचा 21-13, 21-8 असा अवघ्या 21 मिनिटांत पराभव केला.

लोणावळ्यातील ‘आयएनएस शिवाजी’ संस्था होणार ‘राष्ट्रपती निशाण’ ने सन्मानित :

  • नौदल अभियांत्रिकी प्रशिक्षण सेवेत महत्त्वपूर्ण कामगिरी बजावणाऱ्या लोणावळा येथील ‘आयएनएस शिवाजी’ या संस्थेला ‘प्रेसिडेंट कलर’ म्हणजेच राष्ट्रपती ध्वज (राष्ट्रपती निशाण) या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.
  • तर उद्या राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सन्मानपूर्वक हा ध्वज संस्थेला प्रदान केला जाणार आहे.
  • लोणावळा येथे 1945 मध्ये स्थापन झालेली ‘आयएनएस शिवाजी’ संस्था १५ फेब्रुवारी रोजी आपल्या स्थापनेची 75 वर्षे पूर्ण करत आहे. या 75 वर्षांत संस्थेतून दोन लाखांहून अधिक सैन्याधिकारी प्रशिक्षण घेऊन बाहेर पडले आहेत.
  • भारतीय नौदल, तटरक्षक दल, मित्रराष्ट्रांच्या नौदलाचे अधिकारी, तसेच इतर दलांतील सैन्य अधिकारी यांना आवश्यक प्रशिक्षण देण्याचे काम ‘आयएनएस शिवाजी’ येथे होते. विशेषत: नौदल अभियांत्रिकी क्षेत्राचे प्रशिक्षण याठिकाणी देण्यात येते. संस्थेच्या या कामगिरीसाठी ‘आयएनएस शिवाजी’ला राष्ट्रपतींच्या हस्ते हा ध्वज प्रदान केला जाणार आहे.

दिनविशेष:

  • 13 फेब्रुवारी हा दिवस ‘जागतिक रेडीओ दिन‘ आहे.
  • स्पेनने सन 1668 या वर्षी पोर्तुगालच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली.
  • प्रभावी वक्त्या, कवयित्री व स्वातंत्र्यसेनानी सरोजिनी नायडू यांचा जन्म 13 फेब्रुवारी 1879 मध्ये झाला होता.
  • इतिहासकार वासुदेव सीताराम तथा वा. सी. बेन्द्रे यांचा जन्म 13 फेब्रुवारी 1894 मध्ये झाला.
  • लेनिन शांतता पुरस्कार विजेते ऊर्दू शायर फैज अहमद फैज यांचा जन्म 13 फेब्रुवारी 1911 रोजी झाला होता.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.