13 December 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

13 December 2019 Current Affairs
13 December 2019 Current Affairs

13 December 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (13 डिसेंबर 2019)

कायदा अस्तित्वात; विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी :

 • नागरिकत्व दुरूस्ती विधेयकावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे आता याचं कायद्यात रूपांतर झालं आहे. गुरूवारी रात्री राष्ट्रपतींनी या विधेयकावर स्वाक्षरी केली. लोकसभेनंतर राज्यसभेतही या विधेकाला मंजुरी देण्यात आली आहे.
 • नागरिकत्व दुरुस्ती विधेयक बुधवारी राज्यसभेतही आठ तासांच्या चर्चेनंतर मंजूर करण्यात आलं. विधेयकाच्या बाजूनं 125 तर, विरोधात 105 मतं पडली. त्यानंतर गुरूवारी रात्री राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या विधेयकावर स्वाक्षरी केली.
 • तर धार्मिक छळाला कंटाळून पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या देशांतून 31 डिसेंबर 2014 पर्यंत भारतात आलेल्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी व ख्रिस्ती समुदायाच्या लोकांना बेकायदा स्थलांतरित मानले जाणार नाही आणि त्यांना भारतीय नागरिकत्व दिले जाईल, अशी तरतूद नागरिकत्व (दुरुस्ती) विधेयक 2019 मध्ये करण्यात आली आहे.
 • तसेच ही दुरुस्ती घटनेच्या सहाव्या अनुसूचित समाविष्ट केलेल्या आसाम, मेघालय, मिझोराम आणि त्रिपुरा या राज्यांतील आदिवासी भागांना, तसेच बंगाल ईस्टर्न फ्रंटियर रेग्युलेशन, 1873 मध्ये अधिसूचित केलेल्या भागांना लागू असणार नाही.
 • सध्या कोणत्याही परदेशी व्यक्तीला भारताचं नागरिकत्व मिळवण्यासाठी भारतामध्ये कमीत कमी 11 वर्ष राहणं आवश्यक आहे. नागरिकत्व दुरुस्ती विधेयकामध्ये ही अट शिथिल करून ती सहा वर्ष करण्यात आली आहे.
 • तर यासाठी भारतीय नागरिकत्व कायदा, 1955 मध्ये काही बदल करण्यात आलेत. ज्यामुळे भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज करणाऱ्यांना कायदेशीररीत्या सोयीचं पडेल.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (12 डिसेंबर 2019)

वेस्टर्न इंडिया स्क्वॉश स्पर्धात ऐश्वर्या, यशला विजेतेपद :

 • महाराष्ट्राच्या ऐश्वर्या खूबचंदानीने समांथा चाईला 3-0 अशा फरकाने पराभूत करत ‘सीसीआय’ वेस्टर्न इंडिया स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेतील महिला एकेरीचे जेतेपद मिळवले.
 • तर मुलींच्या 19 वर्षांखालील गटाचे विजेतेपद पटकावणाऱ्या ऐश्वर्याने महिलांच्या अंतिम सामन्यात समांथाला 11-8, 11-6, 11-3 असे नामोहरम केले.
 • गोव्याच्या यश फडतेने पुरुषांच्या अंतिम सामन्यात द्वितीय मानांकित दिल्लीच्या गौरव नंद्रजोगला 11-8, 10-12, 11-6, 11-6 असे पराभूत केले.
 • मुलांच्या 17 वर्षांखालील गटाचे जेतेपद पटकावताना तमिळनाडूच्या अभिषेका श्ॉननने महाराष्ट्राच्या युवना गुप्ताला 11-8, 13-11, 4-11, 11-7 असे नमवले.

विराट कोहली TOP 10 मध्ये दाखल :

 • विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्ध टी-20 मालिकेत 2-1 ने विजय मिळवला. मुंबईतल्या अखेरच्या टी-20 सामन्यात विराट कोहलीने विंडीजच्या गोलंदाजांची पिसं काढली.
 • पहिल्या आणि अखेरच्या सामन्यात अर्धशतकी खेळी करणाऱ्या विराटला मालिकावीराच्या किताबाने गौरवण्यात आलं. या कामगिरीचा ICC क्रमवारीत विराटला चांगलाच फायदा झालेला आहे.
 • तर विराट आपल्या 15 व्या स्थानावरुन थेट दहाव्या स्थानावर आला आहे.
 • तसेच याव्यतिरीक्त लोकेश राहुलच्या स्थानातही सुधारणा झाली आहे. नवव्या स्थानावरुन राहुल आता सहाव्या स्थानावर पोहचला आहे. मात्र रोहित शर्माची एका स्थानाने घसरण झाली असून तो नवव्या स्थानावर पोहचला आहे.
 • विंडीजविरुद्ध टी-20 मालिकेनंतर आयसीसीने आपली अधिकृत क्रमवारी जाहीर केली आहे.

महाआघाडीचे खातेवाटप जाहीर :

 • महाआघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर 15 दिवसानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खाते वाटप केले आहे.
 • तर सहा मंत्र्यांकडे 54 खात्यांची तात्पुरती जबाबदारी देण्यात आली आहे. काँग्रेसकडे महसूल, राष्ट्रवादी काँग्रेसकडे जलसंपदा तर शिवसेनेकडे गृह आणि नगरविकास ही महत्वाची खाती आली आहेत.
 • शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांच्याकडे सध्या गृह खाते देण्यात आले असले तरी विस्तारानंतर हे खाते राष्ट्रवादीला देण्यात येणार असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी स्वत:कडे कोणतेही खाते ठेवलेले नसले तरी कोणत्याही मंत्र्यांकडे न देण्यात आलेली सामान्य प्रशासन, माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय ही खाती ठाकरे यांच्याकडे असतील.
 • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे : कोणत्याही मंत्र्यांना नेमून न दिलेले विभाग किंवा त्यांचे भाग.
 • एकनाथ शिंदे : गृह, नगर विकास, वने, पर्यावरण, पाणी पुरवठा व स्वच्छता, मृद व जलसंधारण, पर्यटन, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), संसदीय कार्य, माजी सैनिक कल्याण.
 • सुभाष देसाई : उद्योग आणि खनिकर्म, उच्च व तंत्रशिक्षण, क्रीडा व युवक कल्याण, कृषी, रोजगार हमी योजना, फलोत्पादन, परिवहन, मराठी भाषा, सांस्कृतिक कार्ये, राजशिष्टाचार, भूकंप पुनर्वसन, बंदरे आणि खारभूमी विकास.
 • छगन भुजबळ : ग्रामविकास, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, अन्न व औषध प्रशासन.
 • बाळासाहेब थोरात : महसूल, ऊर्जा व अपारंपरिक ऊर्जा, वैद्यकीय शिक्षण, शालेय शिक्षण, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय.
 • डॉ.नितीन राऊत : सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), आदिवासी विकास, महिला व बाल विकास, वस्त्रोद्योग, मदत व पुनर्वसन, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण.
 • जयंत पाटील : वित्त आणि नियोजन, गृहनिर्माण, सार्वजनिक आरोग्य, सहकार व पणन, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, कामगार, अल्पसंख्याक विकास.

रोहितची स्पेनच्या फुटबॉल स्पर्धेचा ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर म्हणून नियुक्त :

 • रोहितला स्पेनच्या ला लीगा फुटबॉल स्पर्धेचा ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर म्हणून नियुक्त करण्यात आले. गुरुवारी मुंबईत ला लीगाच्या वतीने ही घोषणा करण्यात आली.
 • तर दखल घेण्याची बाब म्हणजे या स्पर्धेच्या 90 वर्षांच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच फुटबॉलव्यतिरिक्त इतर खेळाडूची ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडरपदी निवड झाली.
 • त्यात हा मान रोहितने मिळवला असल्याने भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला.

निता मेहताकडे नँशनल चँम्पियनशिप आणि 2020 च्या विश्वस्तरीय स्पर्धेचे नेतृत्व :

 • चूल आणि मूल या नियमांची चौकट मोडून राज्यातील लाखो महिलांनी विविध क्षेत्रात नावलौकिक प्राप्त करीत समाजात आत्मसन्मान मिळाला आहे. या महिला समाजातील अन्य महिलांसाठी पथदर्शी ठरत आहेत. यामधीलच एक नाव निता मेहता.एक गृहिणी ते नँशनल चँम्पियनशिप आणि 2020 च्या विश्वस्तरीय स्पर्धेमध्ये भारताचे नेतृत्व हा प्रवास सर्वसामान्य गृहिणींना निश्चितच प्रेरणादायी आहे.
 • तर एशियन गेम्स् वुमन्स पाँवरलिफ्टींग चँम्पियनशिप स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई करीत 2020 मध्ये होणाऱ्या विश्वस्तरीय स्पर्धेसाठी भारतीय संघाचे नेतृत्व करण्याचा मान मिळविला आहे.
 • निता यांनी आपल्या गटामध्ये स्काटमध्ये शंभर किलो वजन उचलून सुवर्णपदक मिळविले, बेंचप्रेस मध्ये 47.5 किलो वजन उचलत सिल्व्हर पदक मिळविले तर डेटलेफ्ट मध्ये 115 किलो वजन उचलून सुवर्णपदकावर नाव कोरले.

दिनविशेष:

 • भारतीय अर्थशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक ‘संजय लोळ‘ यांचा जन्म 13 डिसेंबर 1940 मध्ये झाला होता.
 • गोव्याचे मुख्यमंत्री ‘मनोहर पर्रीकर‘ यांचा जन्म 13 डिसेंबर 1955 मध्ये झाला.
 • सन 1991 मध्ये मधुकर हिरालाल कनिया यांनी भारताचे 23वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला होता.
 • सायरस मिस्त्री यांना 2016 मध्ये टी.सी.एस. च्या संचालक मंडळ आणि अध्यक्ष पदावरून काढण्यात आले.
 • अँडी मरे आणि अँजेलीक्यू केरबर यांना आयटीएफ (इंटरनॅशनल टेनिस फेडेरेशन) ने 2016 जागतिक विजेते घोषित केले.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (14 डिसेंबर 2019)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.