13 April 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

गुगल इंडियाचे कोरोनाविषयक मराठी भाषेतील विशेष संकेतस्थळ
गुगल इंडियाचे कोरोनाविषयक मराठी भाषेतील विशेष संकेतस्थळ

13 April 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (13 एप्रिल 2020)

पीपीएफ, सुकन्या समृद्धीसाठी सरकारने दिली मुदतवाढ :

  • आर्थिक वर्ष 2019-20 साठी अल्पबचत योजनांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी केंद्र सरकारने तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे.
  • कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी सध्या देशामध्ये सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे ही मुदतवाढ देण्यात आली आहे. आता 30 जूनपर्यंत अल्पबचत योजनांमध्ये केलेली गुंतवणूक ही करबचतीसाठी पात्र राहणार आहे.
  • तर केंद्रीय अर्थमंत्रालयाने नुकताच याबाबतचा आदेश जारी केला आहे. यामुळे पीपीएफ, सुकन्या समृद्धी योजना आदींमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तीन महिन्यांचा अतिरिक्त कालावधी मिळणार आहे.
  • तसेच या योजनांमधील गुंतवणुकीला आयकरामधून सूट मिळत असते. लॉकडाउनमुळे ज्यांना ही गुंतवणूक करता आलेली नाही, त्यांच्यासाठी ही एक मोठी संधी आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (12 एप्रिल 2020)

आता गुगल इंडियाचे कोरोनाविषयक मराठी भाषेतील विशेष संकेतस्थळ :

  • गुगल इंडियाने आता कोरोना विषाणू संदर्भात आता मराठीत इत्थंभूत माहिती देणारे संकेतस्थळ नेटिझन्सच्या भेटीला आणले आहे.
  • तर सध्या सोशल मीडीयावर विविध मेसेज, पोस्ट सर्रास शेअर होताना दिसतात. मात्र बऱ्याचदा त्याची विश्वासार्हता पडताळली जात नाही, त्यामुळे आता गुगल इंडियाने मराठी भाषेत कोरोना विषाणूला समर्पित असणारे नवे संकेतस्थळ आणले असून या माध्यमातून जागतिक पातळीपासून स्थानिक पातळीपर्यंतची माहिती सर्वसामान्यांना मिळणे सुलभ होणार आहे.
  • तसेच या संकेतस्थळावर कोरोनाची लक्षणे, हेल्पलाईन क्रमांक, उपचार पद्धती, प्रतिबंधात्मक उपाय, सांख्यिक माहिती असा सर्व तपशील असणार आहे.
  • गुगल इंडियाचे www.google.com/covid19हे संकेतस्थळ मराठीसह इंग्रजी आणि हिंदी भाषेतही उपलब्ध आहे. या संकेतस्थळाचे वर्गीकरण तीन टप्प्यांत केले असून त्यात आरोग्यविषयक माहिती, सुरक्षा व प्रतिबंधात्मक उपाय, सांख्यिक माहिती व स्त्रोत यांचा समावेश आहे.

भारताचा आर्थिक विकास दर करोनामुळे घटणार :

  • भारताची अर्थव्यवस्था आता 2020-21 मध्ये 1.5 टक्के ते 2.8 टक्के विकास दर राखू शकेल.
  • तर जागतिक बँकेच्या दक्षिण आशियाविषयक आर्थिक अहवालात म्हटले आहे की, 2019-20 मध्ये भारताचा आर्थिक विकास दर हा 31 मार्चअखेर 4.8 ते 5 टक्के राहील पण नंतर करोना प्रसार रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या
    टाळेबंदीमुळे तो कमी होणार आहे.
  • तसेच आर्थिक क्षेत्रातील कमकुवत कामगिरीने आधीच आर्थिक विकास दर खालावलेला असताना आता भारताला करोनाचा फटका बसला आहे.
  • आर्थिक वर्ष 21 मध्ये देशांतर्गत पुरवठा व मागणी या दोन्हीवर परिणाम झाला असून त्यामुळे आर्थिक विकासाला फटका बसणार आहे. जागतिक पातळीवर करोनाचा प्रसार असल्याने देशांतर्गत गुंतवणूकही कमी होणार आहे.
  • 2021-22 मध्ये विकास दर पुन्हा पाच टक्के होऊ शकतो पण त्यातही आर्थिक शिस्त व पत धोरणात बदल करावे लागणार आहेत.

अमेरिकेसह या 13 देशांसाठी भारत बनला ‘संजिवनी’:

  • हायड्रॉक्सीक्लोरोक्विन औषधे 13 देशांसाठी पाठवण्याची परवानगी भारत सरकारने दिली आहे. विशेष म्हणजे त्यात अमेरिकेचाही समावेश आहे.
  • हायड्रॉक्सीक्लोरोक्विन पाठवण्यात येणाऱ्या देशांमध्ये अमेरिका, स्पेन, जर्मनी, बहरिन, ब्राझिल, नेपाळ, भूतान, श्रीलंका, अफगाणिस्तान, मालदिव आणि बांगला देश या 13 देशांचा समावेश आहे.
  • अमेरिकेने भारताकडे हायड्रॉक्सीक्लोरोक्विनच्या 48 लाख गोळ्या मागितल्या होत्या. भारताने 35.82 लाख गोळ्या पाठवण्यास मंजुरी दिली आहे.
  • हायड्रॉक्सीक्लोरोक्विन या तोंडावाटे घेण्याच्या गोळ्या आहेत त्यांचा वापर स्वप्रतिकारशक्ती कमी झाल्याने होणाऱ्या रोगात केला जातो. मलेरियाविरोधात वापरल्या जाणाऱ्या क्लोकोक्विन या गोळीच्याच प्रजातीचे हे औषध आहे. पण त्याचा वापर हृदयाच्या संधीवातावर केला जातो.

खासगी प्रयोगशाळांत विनामूल्य चाचणीला विरोध:

  • मान्यताप्राप्त सरकारी आणि खासगी प्रयोगशाळांमध्ये कोविड-19ची विनामूल्य चाचणी करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने 8 एप्रिल रोजी दिले होते त्यामध्ये सुधारणा करण्याची मागणी करणारी याचिका शनिवारी एका शल्यविशारदाने सर्वोच्च न्यायालयात केली आहे.
  • तर या शल्यविशारदाचे नाव कौशल कान्त मिश्रा असे असून त्यांनी याचिकेत म्हटले आहे की, कोविड-19 चाचणी सर्वासाठी विनामूल्य केल्यास खासगी प्रयोगशाळांवर आर्थिक ताण पडेल.
  • आयसीएमआरने 17 मार्च रोजी जे दर निश्चित केले आहेत त्यानुसार दर आकारून खासगी प्रयोगशाळांना कोविड-19 चाचणी करण्याची मुभा द्यावी, असे मिश्रा यांनी याचिकेत म्हटले आहे.

फॉम्र्युला-वनमधील महान खेळाडू स्टिर्लिग मॉस यांचे निधन :

  • मोटारस्पोर्ट्स या खेळातील महान खेळाडू स्टिर्लिग मॉस यांचे प्रदीर्घ आजारामुळे वयाच्या 90व्या वर्षी रविवारी निधन झाले.
  • तसेच मॉस यांना एकदाही फॉम्र्युला-वनचे जगज्जेतेपद पटकावता आले नसले तरी त्यांनी चार वेळा उपविजेतेपद आणि तीन वेळा तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली होती.
  • तर त्यांनी लढलेल्या 529 शर्यतींपैकी 212 विजेतेपदे त्यांनी मिळवली. एक हजार मैल शर्यतीमध्ये त्यांनी नवा विक्रम प्रस्थापित केला होता.
  • फॉम्र्युला-वनमध्ये मॉस यांनी 16 शर्यती जिंकल्या. लिव्हरपूलमधील ब्रिटिश ग्रां. प्रि.चे विजेतेपद मिळवल्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही.

दिनविशेष:

  • गुरु गोविंद सिंग यांनी सन 1699 मध्ये खालसा हे गुरु पंथ तयार केले.
  • भारतातील वैद्यकीय संशोधनाचा पाया घालणारे वसंत रामजी खानोलकर यांचा जन्म 13 एप्रिल 1895 मध्ये झाला होता.
  • सन 1919 मध्ये जालियनवाला बाग हत्याकांड झाला, यात 379 लोक ठार तर 1200 जखमी झाले होते.
  • व्ही. शांताराम प्रभात हे सन 1942 मध्ये फिल्म कंपनीतून बाहेर पडले.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (14 एप्रिल 2020)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.