12 September 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

त्रिंबागो नाईट रायडर्सला विजेतेपद मिळाल:
त्रिंबागो नाईट रायडर्सला विजेतेपद मिळाल

12 September 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (12 सप्टेंबर 2020)

नवीन शैक्षणिक धोरण 2022 पासून लागू होत आहे:

 • नव्या शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांच्या डोक्यावरचे गुणपत्रिकेचे ओझे काढून टाकण्यात आले असून नवीन अभ्यासक्रम पद्धती देश स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण करीत असताना, 2022 पासून लागू होत आहे.
 • त्यामुळे विद्यार्थी नवीन भविष्याकडे वाटचाल करतील, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
 • नवीन धोरणातील अभ्यासक्रम व तरतुदी भविष्यवेधी, वैज्ञानिक पद्धतीच्या आहेत असेही ते म्हणाले.
 • नवीन धोरणातील तरतुदीनुसार 2022 पासून प्रत्येक विद्यार्थी शिक्षण घेईल. गणिती विचार, वैज्ञानिक विचार, गमतीदार पद्धतीतून शिक्षण यावर भर दिला आहे.
 • अभ्यासक्रम कमी करून मूलभूत तत्त्वांवर भर दिला आहे.
 • विद्यार्थ्यांची शिक्षणातून गळती ही त्यांना विषय निवडण्याचे स्वातंत्र्य नसण्याशी काही प्रमाणात निगडित होती. आता त्यांना हे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. विविध ज्ञानशाखातील बंदिस्तता काढली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

 मॉस्कोमध्ये महत्त्वाची बैठक- परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि चीनचे परराष्ट्रमंत्री वँग यी:

 • पूर्व लडाखमधील नियंत्रण रेषेवरील स्थिती संदर्भात संरक्षण मंत्र्यांच्या नेतृत्वाखाली एक उच्चस्तरीय बैठक सुरु आहे.
 • या बैठकीला लष्कर, नौदल आणि हवाई दलाचे प्रमुख तसेच चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपीन रावत आणि एनएसए अजित डोवालही उपस्थित आहेत.
 • मॉस्कोमध्ये परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि चीनचे परराष्ट्रमंत्री वँग यी यांच्यात अत्यंत महत्त्वाची बैठक झाली. यात तणाव कमी करण्यासाठी पाच कलमी कार्यक्रम ठरवण्यात आला.

त्रिंबागो नाईट रायडर्सला विजेतेपद मिळाल:

 • कायरन पोलार्डच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या कॅरेबिअन प्रमिअर लिग स्पर्धेत त्रिंबागो नाईट रायडर्स संघाने CPL चं विजेतेपद मिळवलं आहे.
 • अंतिम सामन्यात नाईट रायडर्सने सेंट लुशिया झौक्सवर 8 गडी राखून मात केली.
 • विजयासाठी मिळालेलं 155 धावांचं आव्हान नाईट रायडर्सने लेंडल सिमन्सच्या नाबाद 84 धावांच्या खेळीच्या जोरावर पूर्ण केलं.
 • त्रिंबागो नाईट रायडर्सने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

दिनविशेष:

 • गॅटलिंग गन चे संशोधक रिचर्ड जॉर्डन गॅटलिंग यांचा जन्म 12 सप्टेंबर 1818 मध्ये झाला.
 • सुविख्यात क्रांतिकारक व थोर तपस्वी पांडुरंग महादेव उर्फ सेनापती बापट यांचा पारनेर अहमदनगर येथे 12 सप्टेंबर 1880 मध्ये जन्म झाला.
 • इंदिरा गांधी यांचे पती, पत्रकार व राजकारणी फिरोझ गांधी यांचा जन्म 12 सप्टेंबर 1912 मध्ये झाला.
 • सन 1998 मध्ये डॉ. जयंत नारळीकर यांना पुण्यभूषण पुरस्कार प्रदान झाला.
 • सन 2002 मध्ये मेटसॅट या भारताच्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.
You might also like
1 Comment
 1. Devanand jondhale says

  I have study material
  Nice thought

Leave A Reply

Your email address will not be published.