12 October 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

12 October 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (12 ऑक्टोबर 2020)

विजया राजे शिंदे यांना मोदी सरकारचं अनोखं अभिवादन :

 • राजमाता विजयाराजे शिंदे (Rajmata Vijaya Raje Scindia) यांना केंद्र सरकार अनोख्या पद्धतीनं अभिवादन करणार आहे. विजयाराजे शिंदे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने 100 रुपयांच्या नाण्याचं अनावरण करण्यात येणार आहे.
 • तर 12 ऑक्टोबर रोजी प्रधानमंत्री मोदी (PM Narendra Modi) या नाण्याचं अनावरण करणार आहेत.
 • तसेच 100 रुपयांचं हे नाणं चार धातूंपासून तयार करण्यात आलं आहे. या नाण्याच वजन 35 ग्रॅम आहे.
 • या नाण्यामध्ये चांदीचा वापर 50 टक्के करण्यात आला आहे. तर इतर धातूचं प्रमाण 50 टक्के आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (11 ऑक्टोबर 2020)

‘स्वामित्व’ योजनेंतर्गत मालमत्तापत्रिका :

 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी स्वामित्व योजनेअंतर्गत मालमत्ता कार्डाचे वितरण करण्याच्या योजनेचे दूरचित्रसंवादाद्वारे उद्घाटन केले आणि या ऐतिहासिक पावलामुळे ग्रामीण भारताचे रूप बदलेल असे स्पष्ट केले.
 • तसेच या योजनेमुळे ग्रामस्थांना कर्ज अथवा अन्य वित्तीय लाभ घेण्यासाठी मालमत्तेचा आर्थिक संपत्ती म्हणून वापर करता येईल आणि जमिनीच्या मालकीवरून गावकऱ्यांमधील वाद संपुष्टात येईल, असेही मोदी म्हणाले.
 • तर या वेळी मोदी यांनी ‘सव्‍‌र्हे ऑफ व्हिलेजीस अ‍ॅण्ड मॅपिंग विथ इम्प्रूव्हाइज्ड टेक्नॉलॉजी इन व्हिलेज एरियाज’ (स्वामित्व) योजनेतील काही लाभार्थ्यांशी संवाद साधला. देश आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टिकोनातून उचललेले हे मोठे पाऊल आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.

भारतातील आठ स्वच्छ समुद्रकिनाऱ्यांना ब्लू फ्लॅगचा दर्जा :

 • जगातील अत्यंत स्वच्छ, पर्यावरणस्नेही व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पर्यटन सुविधा असलेल्या समुद्रकिनायांना देण्यात येणारा ब्लू फ्लॅग हा दर्जा आता भारतातील आठ समुद्रकिनायांना मिळाला आहे. त्यामध्ये कर्नाटकच्या दोन समुद्रकिनायांचा समावेश आहे.
 • फाऊंडेशन ऑफ एन्व्हॉयरमेन्ट एज्युकेशन (एफइई) या संस्थेने ब्लू फ्लॅगचा दर्जा दिलेल्या आठ भारतीय समुद्रकिनायांमध्ये शिवराजपूर (गुजरात), घोघला (दीव), कासरकोड आणि पदुबिद्री (दोन्ही कर्नाटकातील), कप्पड (केरळ), ऋषिकोंडा (आंध्र प्रदेश), गोल्डन (ओदिशा), राधानगर (अंदमान) या समुद्रकिनायांचा समावेश आहे.
 • तर जगातील 4664 समुद्रकिनायांना ब्लू फ्लॅग हा दर्जा मिळाला आहे. त्यामध्ये स्पेनमधील समुद्रकिनायांची संख्या सर्वात जास्त आहे.
 • भारताने आपले समुद्रकिनारे स्वच्छ राखण्यासाठी, तिथे पर्यटनाच्या अधिकाधिक सुविधा उपलब्ध करण्यासाठी काही योजना आखल्या होत्या. त्याच्या यशस्वी अंमलबजावणीमुळेच देशातील आठ समुद्रकिनायांना हा दर्जा मिळाला आहे.
 • तसेच ब्लू फ्लॅगचा दर्जा मिळालेले समुद्रकिनारे प्लास्टिक तसेच कचरामुक्त असतात. तिथे पर्यटकांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा तसेच पिण्याचे शुद्ध पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध असते. या सर्व गोष्टींची नीट पडताळणी करून मगच एखाद्या समुद्रकिनायाला ब्लू फ्लॅगचा दर्जा देण्यात येतो.

राफेल नदालचा विक्रमी विजय :

 • फ्रेंच खुल्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात राफेल नदालने नोव्हाक जोकोव्हिचला नमवत जेतेपदावर नाव कोरलं आहे. या विजयासह राफेल नदालने आपलं क्ले कोर्टवरचं वर्चस्व अबाधित राखलं आहे.
 • 6-0,6-2,7-5 अशा सरळ सेटमध्ये नदालने जोकोव्हिचवर विजय मिळवला आहे.
 • फ्रेंच ओपन स्पर्धेतील तेरावं तर एकूण 20 वं ग्रँडस्लॅम जेतेपद आहे.
 • तर या जेतेपदासह नदालने रॉजर फेडररच्या 20 ग्रँडस्लॅम जेतेपदांच्या विक्रमाचीही बरोबरी केली आहे.

दिनविशेष:

 • भारतात ब्रिटिश सरकारने सन 1871 मध्ये क्रिमिनल ट्राइब्स अॅक्ट या कायद्याद्वारे 161 जाती व जमातींना गुन्हेगारी जमाती ठरविले.
 • क्रिकेटपटू, क्रिकेट समालोचक व समाजसेवक विजय मर्चंट यांचा जन्म 12 ऑक्टोबर 1911 मध्ये झाला.
 • क्रिकेट प्रशासक, बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया (BCCI) चे अध्यक्ष मुथ्थय्या अन्नामलाई तथा एम.ए. चिदंबरम यांचा जन्म 12 ऑक्टोबर 1918 मध्ये झाला.
 • सन 2001 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघ आणि राष्ट्रसंघाचे सरचिटणीस कोफी अन्‍नान यांना शांततेसाठीचे नोबेल पारितोषिक जाहीर झाले.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (13 ऑक्टोबर 2020)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.