12 May 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

12 May 2019 Current Affairs In Marathi

12 May 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (12 मे 2019)

‘अपाची’ हेलिकॉप्टर हवाई दलाच्या ताफ्यात दाखल :

  • भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात ‘अपाची’ हे अत्याधुनिक लढाऊ हेलिकॉप्टर दाखल झाले आहे.
  • अमेरिकेतील अरीझोना येथील उत्पादन तळावर भारतीय हवाई दलाच्या अधिकाऱ्यांकडे अपाची हेलिकॉप्टर सुपूर्द करण्यात आले.
  • भारताने अमेरिकेबरोबर 22 अपाची हेलिकॉप्टर खरेदीचा करार केला आहे.
  • अरीझोनामध्ये अपाची हेलिकॉप्टरचे उत्पादन केंद्र आहे. अपाची हेलिकॉप्टरची जगातील सर्वोत्तम लढाऊ हेलिकॉप्टर्समध्ये गणना होते. या हेलिकॉप्टरमुळे भारतीय हवाई दलाची क्षमता कैकपटीने वाढणार आहे. हवाई दलाच्या पठाणकोट तसेच आसामच्या जोरहाटमध्ये या हेलिकॉप्टर्सचा तळ असेल.
  • भारत आणि अमेरिकेत सप्टेंबर 2015 मध्ये 13,952 कोटी रुपयांचा अपाची हेलिकॉप्टर खरेदीचा करार झाला होता.
    तसेच भारताला मार्च 2020 पर्यंत 22 अपाची हेलिकॉप्टर मिळणार आहेत.
  • तर या हेलिकॉप्टरची पहिली बॅच जुलैमध्ये भारतीय हवाई दलाला मिळेल.
  • अलबामामधील अमेरिकन लष्कराच्या तळावर सध्या वैमानिक आणि अन्य क्रू मेंबर्सचा प्रशिक्षण कार्यक्रम सुरु आहे.
  • 22 पैकी अकरा अपाची अत्याधुनिक एएनय/एपीजी-78 लाँगबो फायर कंट्रोल रडार सिस्टिमने सुसज्ज असतील. ठराविक अंतरावरुन लक्ष्यावर अचूक प्रहार करण्याची तसेच शत्रूच्या प्रदेशात जमिनीवरुन धोका असतानाही लढण्याची क्षमता या हेलिकॉप्टरमध्ये आहे.
  • तसेच अपाची दीर्घकाळापासून सेवेत असलेल्या एमआय-35 ची जागा घेतील.
  • भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात अमेरिकन बनावटीच्या अत्याधुनिक चिनूक हेलिकॉप्टर्सचा समावेश झाला. हे हेलिकॉप्टर हॉवित्झर तोफा वाहून नेण्यास सक्षम आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (11 मे 2019)

सॅटेलाइटमार्फत होत आहे दुष्काळाच्या तीव्रतेचे मोजमाप :

  • दुष्काळाच्या तीव्रतेचे मोजमाप करण्यासाठी असलेल्या पैसेवारी पद्धतीचा अवलंब न करता, सॅटेलाइटद्वारे दुष्काळ, जमिनीचा पोत, हवामान बदल, पिकांवर पडणाऱ्या रोगांचे अचूक निदान डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील जिओस्पॉटियल प्रयोगशाळेत करण्यात आले.
  • तसेच या प्रयोगाची पीकविमा वाटप व दुष्काळाच्या तीव्रतेवर तत्काळ उपाययोजना करण्यासाठी मोठी मदत होईल, अशी माहिती प्रयोगशाळेचे संचालक डॉ. के. व्ही. काळे यांनी दिली.
  • केंद्र सरकारच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागातर्फे नॅशनल नेटवर्क प्रोग्राम ऑन इमेजिंग स्पेक्ट्रोस्कोपी अँड अ‍ॅप्लिकेशन (निसा) प्रकल्प हाती घेतला आहे.
  • तर यात शेतीसाठी महत्त्वाचे असलेले माती परीक्षण, जंगल, पीक, हवामान, दुष्काळ आदींची माहिती रिमोट सेन्सिंग, सॅटेलाइट आणि ड्रोनद्वारे केली जात आहे. या माहितीचे विश्लेषण विद्यापीठाच्या संगणकशास्त्र विभागातील जिओस्पॉटियल प्रयोगशाळेत होत आहे.

कुस्तीमध्ये आता नवीन नियम :

  • जर एखादा खेळाडू डोपिंगमध्ये दोषी सापडला तर त्याच्यावर कारवाई करण्यात येते. काही वेळेला बंदी आणि दंड भरावा लागतो, तर काही वेळा दोषी खेळाडूवर आजीवन बंदीही घालण्यात येते. पण आता मात्र यामध्ये मोठा बदल करण्यात
    येणार आहे. कारण यापुढे जर एखादा कुस्तीपटू डोपिंगमध्ये दोषी आढळला तर त्याच्या प्रशिक्षकांवरही कारवाई करण्यात येणार आहे.
  • गेल्या काही वर्षांमध्ये भारतीयकुस्तीपटू डोपिंगमध्ये आढळल्याचे पाहायला मिळाले. या खेळाडूंवर बंदीही घालण्यात आली. पण या प्रकरणांमुळे भारताच्या नावावर आंतरराष्ट्रीय स्तरावर एक ठपका बसल्याचे म्हटले गेले. त्यामुळे यापुढे जर कुस्तीपटू दोषी आढळला तर त्यासाठी प्रशिक्षकांनाही दोषी ठरवण्याचा निर्णय भारतीय कुस्ती महासंघाने घेतला आहे.

दिनविशेष :

  • 12 मे : आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन.
  • पोलंड देशातील सर्वात जुने विद्यापीठ जगीलीनियन विद्यापीठाची सुरवात 12 मे 1364 मध्ये झाली.
  • अमेरिकेतील सर्वात जुने विद्यापीठ सान मार्कोस राष्ट्रीय विद्यापीठाची सुरवात 12 मे 1551 मध्ये झाली.
  • आग्रा येथे शिवाजी महाराज व औरंगजेब यांची पहिली व शेवटची भेट 12 मे 1666 मध्ये झाली.
  • 12 मे 1797 मध्ये नेपोलिअनने व्हेनिस जिंकले.
  • बर्लिनमधील कोनराड झुझ यांनी जगातील पहिले पूर्णतः स्वयंचलित संगणक Z3 12 मे 1941 मध्ये सादर केले.
  • प्रजासत्ताक भारताच्या संसदेचे पहिले अधिवेशन 12 मे 1952 मध्ये सुरू झाले.
  • 12 मे 1955 मध्ये दुसरे महायुद्ध – संपल्यावर ऑस्ट्रियाने दोस्त राष्ट्रांकडून स्वातंत्र्य मिळवले.
  • सोव्हिएट अंतराळ स्थानक लूना 5 12 मे 1965 मध्ये चंद्रावर कोसळले.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (13 मे 2019)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.