12 मार्च 2022 चालू घडामोडी – Current Affairs
12 March 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (12 मार्च 2022)
नियमित कर्ज फेडणाऱ्यांना 50 हजारांचे अनुदान :
- उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आर्थिक वर्ष 2022-23 साठीचा तसेच महाविकास आघाडीचा तिसरा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर केला.
- यावेळी अजित पवार यांनी नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून 50 हजार रुपये अनुदान, शेततळ्याच्या अनुदान रकमेत वाढ अशा प्रकारच्या मोठ्या घोषणा केल्या.
- अजित पवार यांनी शेती, आरोग्य, मनुष्यबळ विकास, दळणवळण, उद्योग यांच्यातील विकास अशी पंचसूत्री मांडली.
- तसेच या अनुदानाचा लाभ जवळपास 20 लाख शेतकऱ्यांना होईल.
- भूविकास बँकेच्या 34 हजार 788 कर्जादार शेतकऱ्यांची 964 कोटी 15 लाख रुपयांची कर्जमाफी करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे.
Must Read (नक्की वाचा):
पहिली व्हीलचेअर प्रीमियर बास्केटबॉल लीग आजपासून मुंबईत :
- भारतात प्रथमच 60 व्हीलचेअर खेळाडूंचा समावेश असलेल्या प्रीमियर बास्केटबॉल लीगचे शनिवारपासून आयोजन करण्यात येणार आहे.
- ‘प्रोजेक्ट मुंबई’ उपक्रमांतर्गत सामान्य जनतेच्या मनात अपंगांविषयी जिव्हाळा निर्माण करण्याच्या हेतूने 12 आणि 13 मार्च रोजी मुंबईत ही स्पर्धा खेळवण्यात येईल.
- स्टेट बँक ऑफ इंडियाने या उपक्रमासाठी 93 लाखांची मदत केली आहे.
- शनिवारी नागपाडा आणि रविवारी मुंबई सेंट्रल येथील वायएमसीए केंद्रात दुपारी चार वाजल्यापासून या लीगचे सामने होतील.
- या लीगमध्ये 20 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील व्हीलचेअर खेळाडू सहभागी होणार आहेत.
गतिमान वाहतुकीसाठी पायाभूत सुविधांना झुकते माप :
- गतिमान वाहतूक व दळणवळण हा राज्याच्या वेगवान विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा घटक असल्याने विकासाच्या पंचसूत्रीमध्ये दळणवळणाला अधिक महत्त्व देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे.
- त्यानुसार पायाभूत सुविधा आणि दळणवळणासाठी 15 हजार 673 कोटींची भरीव तरतूद केल्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी विधानसभेत जाहीर केले.
- राज्यातील रस्त्यांचे जाळे अधिक विस्तृत आणि मजबूत करण्यासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा-2 या अंतर्गत सुमारे 7 हजार 500 कोटी रुपये खर्चाच्या सुमारे 10 हजार किलोमीटर लांबीच्या ग्रामीण रस्त्यांच्या कामांना मंजुरी देण्यात आली असून येत्या दोन वर्षांत ही कामे पूर्ण होतील.
- तसेच पंतप्रधान ग्रामसडक योजना टप्पा-3 अंतर्गत एकूण 6 हजार 550 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या कामाना यंदा सुरुवात करण्यात येणार आहे.
- त्याचप्रमाणे नाबार्डच्या साहाय्याने राबिवण्यात येत असलेल्या हायब्रीड अॅन्युईटी योजनेतून 65 रस्ते विकासांची व 165 पुलांची कामे यंदा सुरू करण्यात येणार आहेत.
- आशियाई विकास बँकेच्या अर्थसहाय्यातून 5 हजार 689 कोटी रुपये खर्चून 990 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे मजबुतीकरण व दजरेन्नती करण्यात येत आहे.
स्मारके, गडकिल्ले, तीर्थक्षेत्रे, पर्यटनस्थळांसाठी भरीव तरतूद :
- विविध स्मारके, गडकिल्ले, पर्यटनस्थळे, तीर्थक्षेत्रे यांच्यासाठी अर्थसंकल्पात भरीव आर्थिक तरतूद करण्यात आली अष्टविनायक मंदिरे तसेच पंढरपूर देवस्थानच्या विकासासाठी निधी देण्यात येणार आहे.
- पर्यटन विकासावर 1700 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
- मुंबईत मराठी भाषा भवनाचे भूमिपूजन गुढीपाडव्याला होत असून त्यासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून ऐरोली येथील मराठी भाषा संशोधन उपकेंद्रासाठी 25 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
- भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर यांचे स्मारक म्हणून त्यांच्या नावाने सुूरू करण्यात येणाऱ्या कलिनातील आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
- नागपूरमधील बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानात उभारण्यात येणाऱ्या आफ्रिकन सफारीसाठी 100 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
दिनविशेष:
- भारताचे संरक्षणमंत्री आणि महाराष्ट्राचे पहिले मुखमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा जन्म 12 मार्च 1913 रोजी झाला होता.
- रशियाची राजधानी सेंट पीट्सबर्ग येथून मास्को येथे सन 1918 मध्ये हलविण्यात आली.
- सन 1930 मध्ये महात्मा गांधी यांनी मिठाच्या सत्याग्रहासाठी 200 मैलाच्या दांडीयात्रेला सुरवात केली.
- चेक प्रजासत्ताक, हंगेरी व पोलंड नाटो (NATO) मध्ये 1999 यावर्षी सामील झाले.