12 June 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

Johnson & Johnson ने करोना व्हायरसवर लस (व्हॅक्सिन) शोधल्याचा दावा केला
Johnson & Johnson ने करोना व्हायरसवर लस (व्हॅक्सिन) शोधल्याचा दावा केला

12 June 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (12 जून 2020)

राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारीत महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी:

  • राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारीत (एनआयआरएफ) सर्वसाधारण आणि विद्यापीठ या दोन्ही गटात महाराष्ट्राला द्वितीय स्थान मिळाले आहे.
  • क्रमवारीतील पहिल्या शंभर संस्थांमध्ये सर्वसाधारण गटात राज्यातील 12 संस्था आणि विद्यापीठ गटात 13 संस्थांचा समावेश आहे.
  • शैक्षणिक संस्थांमधील अध्ययन-अध्यापन, सोयीसुविधा, संशोधन, विद्यार्थ्यांना उपलब्ध झालेल्या रोजगारसंधी, एकूण दृष्टिकोन आदी निकषांवरील संस्थांची कामगिरी विचारात घेऊन ही क्रमवारी जाहीर करण्यात येते.
  • सर्वसाधारण गटात महाराष्ट्रातील आयआयटी बॉम्बे (4), सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (19), भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था पुणे (25), होमी भाभा नॅशनल इन्स्टिटय़ूट मुंबई (30), इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी मुंबई (34), टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सेस मुंबई (57), सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठ, पुणे (73), डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ पुणे (75), नरसी मूनजी इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई (92), मुंबई विद्यापीठ (95), दत्ता मेघे इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्सेस, वर्धा (97), भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालय, पुणे (98) या संस्थांचा समावेश आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (11 जून 2020)

Johnson & Johnson कंपनी ने करोना व्हायरसवर लस शोधल्याचा दावा केला:

  • करोना व्हायरसवर औषध शोधण्याचे जगभरातून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. अशातच प्रसिद्ध कंपनी Johnson & Johnson ने करोना व्हायरसवर लस (व्हॅक्सिन) शोधल्याचा दावा केला असून या व्हॅक्सिनच्या आतापर्यंतच्या सर्व चाचण्या यशस्वी झाल्याचं कंपनीने म्हटलं आहे.
  • या व्हॅक्सिनची आता मानवावर चाचणी घेण्यास सुरूवात करणार असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.
  • कंपनी जुलै महिन्यामध्ये माणसावर या व्हॅक्सिनच्या चाचणीला सुरूवात करणार आहे.
  • त्याआधीच अमेरिकेने Johnson & Johnson सोबत या व्हॅक्सिनसाठी करार केला आहे. या करारानुसार कंपनी अमेरिकेसाठी या व्हॅक्सिनचे 1 बिलियन डोस तयार करणार आहे.
  • कंपनी हा प्रयोग अमेरिका आणि बेल्जियममध्ये करणार आहे. यासाठी कंपनीने 18 ते 65 या वयोगटातील 1,045 जणांची निवड केली आहे. वृद्धांवर हे व्हॅक्सिन परिणामकारक आहे की नाही हे तपासण्यासाठी 1045 जणांमध्ये काही 65 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांचाही समावेश करण्यात आला आहे.

टीम इंडिया साठी 11 जून 1975 हा दिवस खास का ?

  • टीम इंडियाने आतापर्यंत क्रिकेटच्या इतिहासात एकूण तीन वेळा विश्वचषकावर नाव कोरलं आहे.
  • 1983 साली भारताने कपिल देवच्या नेतृत्वाखाली वन डे विश्वचषक उंचावला.
  • तर त्यानंतर महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली 2007 ला टी 20 विश्वचषक आणि 2011 साली दुसरा वन डे विश्वचषकावर भारताने नाव कोरले.
  • हे तीनही दिवस भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहे.पण त्याचसोबत 11 जून 1975 या दिवसाला भारतीय क्रिकेटमध्ये खास महत्त्व आहे.
  • 1975 मध्ये पहिल्यावहिल्या क्रिकेट विश्वचषकाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेआधी भारताने 1974 मध्ये इंग्लंडविरुद्द दोन वन डे सामने खेळले होते.
  • श्रीनिवासराघवन व्यंकटराघवन यांच्या नेतृत्वाखाली भारताने विश्वचषक स्पर्धेत सहभाग घेतला होता.

सरकारचे शेतकऱ्यांसाठी 4 महत्त्वाचे निर्णय – मोदी:

  • देशाचा अन्नदाता असलेल्या शेतकऱ्यांच्या  दारी समृद्धी आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने चार मोठे निर्णय घेतले आहेत.
  • हे निर्णय भविष्यात इतिहास बनतील, असे प्रतिपादन केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी केले आहे.
  • तोमर यांनी सांगितले की, या चार निर्णयांनुसार, शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या कर्जाच्या परतफेडीचा कार्यकाल वाढविण्यात आला आहे. खरीप हंगामाच्या पिकांच्या आधारभूत किमती वाढविण्यात आल्या आहेत.
  • तोमर यांनी म्हटले की, कृषी उत्पन्न व्यापार व वाणिज्य (संवर्धन व सुलभीकरण) अध्यादेश 2020 आणि शेतकरी सशक्तीकरण व संरक्षण अध्यादेश 2020 असे दोन अध्यादेश सरकारने जारी केले आहेत.
  • पहिल्या अध्यादेशामुळे शेतकरी आता आपली उत्पादने देशात कोठेही विकू शकतील.
  • दुसऱ्या अध्यादेशानुसार, शेतकरी आणि प्रायोजक यांच्यात करार करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शेतकरी उभ्या पिकाचा विक्री करार करू शकेल.
  • अल्पकालीन कृषी कर्जांची परतफेडीची कालमर्यादा 31 ओगस्ट पर्यंत वाढविण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने 1 जून रोजी घेतला.

देशातील नव्या शैक्षणिक धोरणानुसार क्रीडा विषयाचा समावेश:

  • देशातील नव्या शैक्षणिक धोरणानुसार क्रीडा विषय हा आता नियमित अभ्यासक्रमाचा भाग असेल, असे केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी गुरुवारी स्पष्ट केले.
  • आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक शिक्षणावर आयोजित करण्यात आलेल्या एका वेबसंवादामध्ये रिजिजू यांनी त्यांचे मत मांडले. ‘‘खेळाकडे पर्यायी विषय म्हणून पाहणे चुकीचे आहे.
  • देशातील नव्या शैक्षणिक धोरणानुसार आता खेळ हा विषयसुद्धा विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाचा भाग असेल,’’ असे ४८ वर्षीय रिजिजू म्हणाले.
  • देशाच्या नव्या शैक्षणिक धोरणाची अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसली तरी यासंबंधी जवळपास अंतिम निर्णय झाला आहे. क्रीडा मंत्रिमंडळातील सर्व सभासदांनी खेळाचा अभ्यासक्रमात समावेश करण्याविषयी पुढाकार घेतल्याने हे शक्य झाले,’’ असेही रिजिजू यांनी सांगितले.

दिनविशेष :

  • 12 जून हा दिवस जागतिक बालकामगार विरोधी दिन म्हणून पाळला जातो.
  • भारतीय गणिती व खगोलशास्त्रज्ञ आर्यभट्ट यांचा जन्म इ.स. 499 मध्ये 12 जून रोजी झाला.
  • गोपाळकृष्ण गोखले यांनी 12 जून 1905 रोजी भारत सेवक समाजाची (Servants of India Society) स्थापना केली.
  • 12 जून 1975 मध्ये अलाहाबाद न्यायालयाने इंदिरा गांधींची निवडणूक रद्द ठरवली त्यांना 6 वर्षे निवडणूक लढविण्यास बंदी केली.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (13 जून 2020)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.