12 जानेवारी 2023 चालू घडामोडी – Current Affairs

12 January 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (12 जानेवारी 2023)

‘आरआरआर’च्या ‘नाटू नाटू’ला गोल्डन ग्लोब:

  • एस. एस. राजामौली यांच्या ‘आरआरआर’ चित्रपटातील ‘नाटू नाटू’ या गाण्याने गोल्डन ग्लोब पुरस्कार पटकावत इतिहास रचला.
  • टेलर स्विफ्ट, रिहाना, लेडी गागा यांच्यासारखे दिग्गजांची गाणी स्पर्धेत असताना ‘सर्वोत्तम चित्रपट संगीत’ या प्रकारात ‘आरआरआर’ने बाजी मारली.
  • सर्वोत्तम बिगर-इंग्रजी चित्रपट पुरस्काराने मात्र आरआरआला हुलकावणी दिली.
  • हॉलिवूड फॉरेन प्रेस असोसिएशनने आयोजित केलेला गोल्डन ग्लोब पुरस्कार पार पडला.
  • यामध्ये आरआरआरला दोन नामांकने मिळाली होती.
  • ज्येष्ठ संगीतकार एम. एम. कीरावानी यांनी संगीतबद्ध केलेले, कालभैरव आणि राहुल सिप्लिगुंज यांच्या आवाजातील या गीताला पुरस्कार मिळाल्याची घोषणा जेना ओर्टेगा हिने व्यासपीठावरून केली.
  • असे असले तरी एका भारतीय चित्रपटाने गोल्डन ग्लोब पुरस्कार पटकाविण्याची ही पहिलीच वेळ आहे.

नदीतील सर्वाधिक लांब क्रूझचे उद्या उद्घाटन:

  • ‘एमव्ही गंगा विलास’ या जगातील सर्वात लांब अंतराच्या नदीतील क्रूझचे, तसेच वाराणसीतील गंगा नदीच्या किनाऱ्यावरील ‘टेंट सिटी’चे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या शुक्रवारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन करणार आहेत.
  • याच कार्यक्रमात पंतप्रधान 1 हजार कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या इतर अनेक अंतर्गत जलवाहतूक प्रकल्पांचे उद्घाटन करणार असून, काहींचा शिलान्यासही करणार असल्याचे त्यांच्या कार्यालयाने एका निवेदनात म्हटले आहे.
  • 51 दिवसांची ही जलयात्रा देशाच्या सांस्कृतिक मुळांशी जोडण्याची व त्याच्या विविधतेच्या सुंदर पैलूंचा शोध लावण्याची अद्वितीय संधी देईल, असे मोदी यांनी म्हटले आहे.

वनडे क्रमवारीत विराट कोहलीची मोठी झेप:

  • आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) बुधवारी खेळाडूंची ताजी क्रमवारी जाहीर केली.
  • यामध्ये भारतीय कर्णधार रोहित शर्मा, माजी कर्णधार विराट कोहली आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज यांना फायदा झाला आहे.
  • एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीत विराट कोहलीला दोन स्थानांचा फायदा झाला आहे.
  • तो सहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे.
  • कोहलीशिवाय टॉप-10 मध्ये भारताचा दुसरा फलंदाज रोहित शर्मा आहे, त्याला एका स्थानाचा फायदा झाला आहे.
  • रोहित आता आठव्या क्रमांकावर पोहोचला आहे.
  • पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम 891 गुणांसह अव्वल स्थानावर कायम आहे.

रणजी ट्रॉफीत पहिल्यांदाच महिलांना मिळाली अंपायरिंग संधी:

  • मंगळवारी रणजी ट्रॉफीमध्ये नवा इतिहास रचला गेला.
  • पहिल्यांदाच महिलांना कामकाजाची संधी मिळाली.
  • माजी स्कोअरर वृंदा राठी, माजी सॉफ्टवेअर अभियंता जननी नारायणन आणि माजी खेळाडू गायत्री वेणुगोपालन यांनी रणजी ट्रॉफीमध्ये अंपायर म्हणून पदार्पण केले.
  • जमशेदपूरमध्ये सुरू असलेल्या झारखंड-छत्तीसगड सामन्यात वेणुगापालन हे अंपायर आहेत.
  • नारायणन हे सुरतमध्ये रेल्वे आणि त्रिपुरा यांच्यातील सामन्यात संचालन करत आहेत, तर राठी पोरव्होरिममध्ये गोवा आणि पाँडेचेरी यांच्यातील सामन्यात संचालन करत आहेत.

दिनविशेष:

  • 12 जानेवारी हा दिवस ‘राष्ट्रीय युवा दिन‘ म्हणून साजरा केला जातो.
  • नरेन्द्रनाथ दत्त उर्फ स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त 12 जानेवारी रोजी भारतात राष्ट्रीय युवा दिन साजरा केला जातो. स्वामीजींचे तत्त्वज्ञान आणि ज्या आदर्शांमुळे ते जगले व कार्य केले ते भारतीय युवकांसाठी प्रेरणास्थान बनले आणि 1984 मध्ये भारत सरकारने राष्ट्रीय युवा दिन म्हणून घोषित केला.
  • राजमाता ‘जिजाऊ‘ यांचा जन्म 12 जानेवारी सन 1598 रोजी झाला होता.
  • भारतीय तत्त्वज्ञानाची महती जगभर पसरवणारे नरेन्द्रनाथ दत्त उर्फ ‘स्वामी विवेकानंद‘ यांचा जन्म 12 जानेवारी 1863 मध्ये झाला होता.
  • सन 1936 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची धर्मांतराची त्रिवार घोषणा केली.
  • सामाजिक कार्यकर्त्या गंगुताई पटवर्धन यांना सन 1997 मध्ये महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेतर्फे दिला जाणारा पहिला बाया कर्वे पुरस्कार प्रदान.
  • 12 जानेवारी 2005 रोजी राष्ट्रीय ज्ञान आयोगाची स्थापना झाली.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.