12 February 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
12 February 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (12 फेब्रुवरी 2020)
भारत अमेरिकेकडून खरेदी करणार एअर डिफेन्स सिस्टिम :
- भारत अमेरिकेकडून इंटिग्रेटेड एअर डिफेन्स वेपन सिस्टिम खरेदी करणार आहे.
- तर 1.9 बिलियन डॉलरच्या भारतासोबतच्या या व्यवहारासाठी अमेरिकेने मंजुरी दिली आहे.
- अमेरिकेच्या सुरक्षा एजन्सीने सोमवारी सांगितले की, ट्रम्प प्रशासनाने भारताला इंटिग्रेटेड एअर डिफेन्स वेपन सिस्टिम विकण्याच्या प्रस्ताव मानस अमेरिकेच्या काँग्रेससमोर मांडला आहे. या संपूर्ण सिस्टिमची किंमत 1.867 बिलियन अमेरिकन डॉलर इतकी आहे.
- तसेच अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, भारत नव्या तंत्रज्ञानाचा वापर आपल्या सशस्त्र बलांच्या आधुनिकीकरणासाठी करु इच्छित आहे. तसेच हवाई हल्ल्यांपासून वाचण्यासाठी आपल्या सध्याच्या हवाई सुरक्षा प्रणालीचा विस्तार करु इच्छितो.
- या महिन्याच्या शेवटी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत. 24 आणि 25 फेब्रुवारी रोजी ते भारतात असतील. या दौऱ्यादरम्यान दोन्ही देशांमध्ये अनेक करार होणार आहेत. यामध्ये इंटिग्रेटेड एअर डिफेन्स वेपन सिस्टिमचाही समावेश आहे.
- भारातने अमेरिकेकडे इंटिग्रेटेड एअर डिफेन्स वेपन सिस्टिम खरेदी करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. त्याशिवाय भारत अमेरिकेकडून पाच AN/MPQ-64Fl सेनटिनल रडार सिस्टम; 118 AMRAAM AIM-120C-7/C-8 मिसाइल; तीन AMRAAM गाइडन्स सेक्शन; चार AMAMAM कंट्रोल सेक्शन; और 134 स्टिंगर FIM-92L क्षेपणास्त्रांची खरेदी देखील करणार आहे.
Must Read (नक्की वाचा):
भारत लवकरच फायनल करणार ‘सीहॉक’ हेलिकॉप्टर्स डील :
- संरक्षण उत्पादन क्षेत्रातील आघाडीची अमेरिकन कंपनी लॉकहीड मार्टिनकडून लष्करी हेलिकॉप्टर्सची खरेदी करण्यात येणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर लवकरच अब्जावधी डॉलर्सच्या या व्यवहाराला मंजुरी देण्यात येईल.
- तसेच व्यापारावरुन अमेरिकेबरोबर मतभेद असले तरी, या व्यवहारामुळे रणनितीक दृष्टीने दोन्ही देशांचे संबंध अधिक बळकट होतील. 2007 पासून भारताने अमेरिकेकडून 17 अब्ज डॉलर्सची संरक्षण साहित्य खरेदी केली आहे.
- भारत शस्त्रास्त्र खरेदीसाठी आधी रशियावर मोठया प्रमाणात अवलंबून होता. पण आता अमेरिका, फ्रान्स, इस्रायलकडूनही भारत शस्त्रास्त्रे विकत घेत आहे.
- मोदी सरकारची सुरक्षा समिती पुढच्या दोन आठवडयात MH-60R सीहॉक हेलिकॉप्टरच्या खरेदी व्यवहाराला मंजुरी देण्याची शक्यता आहे.
- भारतीय नौदलासाठी 24 सीहॉक हेलिकॉप्टर विकत घेण्यात येणार आहेत. सीहॉक हेलिकॉप्टर्स भारतीय युद्धनौकांवर तैनात करण्यात येतील.
- लॉकहीडची सीहॉक हेलिकॉप्टर्स हेलफायर मिसाइल आणि टॉरपीडोसने सुसज्ज असतील. हिंदी महासागरात चिनी नौदलाचा वावर वाढला आहे. त्या पार्श्वभूमीवर सीहॉक हेलिकॉप्टर्सची पाणबुडया शोधून काढण्यासाठी नौदलाला मदत होईल. निधीअभावी भारताच्या अनेक युद्धनौकांवर हेलिकॉप्टर्स नाहीत. हेलिकॉप्टर्स शिवाय त्यांच्या मोहिमा सुरु असतात. सीहॉक हेलिकॉप्टर्सच्या खरेदीला नौदलाचे पहिले प्राधान्य आहे.
आता टाटा-अदानी चालवणार भारतीय रेल्वे :
- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात देशात तेजस एक्स्प्रेसप्रमाणे 150 खासगी ट्रेन चालवण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार रेल्वेने देशभरातून 100 मार्गांची निवड केली आहे, ज्यामध्ये मुंबई -दिल्ली तसेच हावडा -दिल्लीसारख्या व्यस्त मार्गांचाही समावेश आहे.
- तसेच दरम्यान, या खासगी ट्रेन चालविण्यासाठी देशी-विदेशी अनेक बड्या उद्योग समूहांनी रस दाखविला आहे.
खासगी ट्रेन चालवण्यासाठी मुंबई ते नवी दिल्ली, चेन्नई ते नवी दिल्ली, नवी दिल्ली ते हावड़ा, शालीमार ते पुणे, नवी दिल्ली ते पाटणा अशा काही मार्गांची निवड करण्यात आली आहे. - तर खासगी ट्रेन चालविण्यात रस दाखिणाऱ्यांमध्ये अल्स्टॉम ट्रान्सपोर्ट, बॉम्बार्डियर, सीमेंस एजी, ह्युंदाई रोटेम कंपनी आणि मॅकक्वेरी यासह अनेक जागतिक दर्जाच्या कंपन्यांचा समावेश आहे. तर देशांतर्गत कंपन्यांमध्ये टाटा रियल्टी अँड इंफ्रास्ट्रक्चर, हिताची इंडिया आणि साउथ एशिया, एस्सेल ग्रुप, अदानी पोर्ट्स आणि सेझ (एसईझेड), भारतीय रेल्वे केटरिंग अॅड टुरिझम कॉर्पोरेशन यांचा समावेश आहे.
- या प्रायव्हेट ट्रेन 16 डब्यांच्या असतील आणि त्यांचा वेग दरताशी 160 कि.मी. इतका असेल. या गाडय़ांच्या भाडेरचना आणि मेन्टेनन्सची जबाबदारी प्रायव्हेट कंपन्यांवरच असणार आहे. एका अहवालानुसार देशातील 100 भारतीय रेल्वे मार्गावर 150 खासगी गाड्या चालविण्यासाठी सुमारे 22,500 कोटी रुपयांच्या गुंतवणूकीची आवश्यकता आहे.
- खासगी कंपन्यांना थोडा दिलासा देण्यासाठी खासगी ट्रेन सुटण्याच्या निर्धारित वेळेच्या 15 मिनिटांमध्ये इतर कोणतीही नियमित धावणारी रेल्वे सुटणार नाही, याची काळजी घेतली जाणार आहे. खासगी कंपन्या भाडे व थांबे निश्चित करण्यासाठी तथा भारतीय रेल्वेच्या मानकांनुसार कोणत्याही कंपनीकडून कोच व इंजिन खरेदी करण्यास स्वतंत्र असतील.
तिसरे पंच देणार नो-बॉलचा निर्णय :
- 21 फेब्रुवारीपासून ऑस्ट्रेलियात महिलांच्या टी-20 विश्वचषकाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या स्पर्धेसाठी आयसीसीने नियमांमध्ये मोठा बदल करत, नो-बॉलचा निर्णय देण्याची जबाबदारी तिसऱ्या पंचांवर दिलेली आहे.
- तर याआधी आयसीसीने भारत विरुद्ध विंडीज मालिकेत प्रायोगिक तत्वावर या प्रणालीचा वापर केला होता, यानंतर आयसीसीच्या महत्वाच्या स्पर्धेत हे तंत्रज्ञान वापरण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे.
- तसेच 21 फेब्रुवारी ते 8 मार्चदरम्यान ही स्पर्धा रंगणार आहे.
- मैदानाबाहेरील कर्मचाऱ्यांनी सांगितल्याशिवाय मैदानावरील पंचांनी नो-बॉलचा निर्णय देऊ नये अशा सूचनाही आयसीसीने पंचांना दिलेल्या आहेत. विश्वचषकासारख्या स्पर्धेत निर्णय देताना कोणत्याही प्रकारची चूक होऊ नये याकरता तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असल्याची माहिती आयसीसीचे जनरल मॅनेजर जेफ अल्ड्राइस यांनी दिली.
श्रेयस अय्यरची धोनीच्या विक्रमाशी बरोबरी :
- मुंबईकर श्रेयस अय्यरने गेल्या काही सामन्यात केलेल्या धडाकेबाज कामगिरीच्या जोरावर भारतीय संघात चौथ्या क्रमांकाच्या जागेवर आपली दावेदारी बळकट केली आहे.
- न्यूझीलंडविरुद्धची वन-डे मालिका गमावल्यानंतर, अखेरच्या वन-डे सामन्यातही भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर मयांक अग्रवाल आणि कर्णधार विराट कोहली झटपट माघारी परतल्यामुळे भारतीय संघ अडचणीत सापडला होता.
- मात्र श्रेयस अय्यरने सर्वात आधी आपला मुंबईकर साथीदारी पृथ्वी शॉ आणि त्यानंतर लोकेश राहुलसोबत महत्वपूर्ण भागीदारी रचत संघाचा डाव सावरला. यादरम्यान श्रेयसने आपलं अर्धशतकही साजरं केलं. यासह श्रेयसने न्यूझीलंडमध्ये वन-डे सामन्यात सलग 3 सामन्यांत अर्धशतकी खेळी करण्याच्या धोनीच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.
- श्रेयस अय्यरने न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा समर्थपणे सामना करत, 63 चेंडूत 62 धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीत 9 चौकारांचा समावेश होता. श्रेयस मोठी खेळी उभी करणार असं वाटत असतानाच जिमी निशमच्या गोलंदाजीवर झेलबाद होऊन माघारी परतला.
- या कामगिरीसह श्रेयस अय्यरनं युवराज सिंगचा विक्रम मोडला. तीन सामन्यांच्या द्विदेशीय वन डे मालिकेत चौथ्या क्रमांकावर सर्वाधिक धावा करण्याचा भारतीय फलंदाजाचा विक्रम श्रेयसनं नावावर केला. श्रेयसनं या मालिकेत 103, 52 आणि 62 अशा एकून 217 धावा केल्या.
- हा भारताकडून द्विदेशीय मालिकेत चौथ्या क्रमांकावर सर्वाधिक धावांचा विक्रम आहे. यापूर्वी युवराज सिंगनं 2017 मध्ये इंग्लंडविरुद्ध 210 धावा केल्या होत्या. त्यानं 2005 सालचा ( वि. पाकिस्तान) राहुल द्रविडचा 209 धावांचा विक्रम मोडला होता.
पुण्यातील युवा संशोधकाची आंतरराष्ट्रीय पुरस्कारावर मोहोर :
- मूळ पेशींची (स्टेम सेल) कार्यक्षमता वाढण्याच्यादृष्टीने पुण्यातील डॉ. रोहन कुलकर्णी या तरुण संशोधकाने उपयुक्त संशोधन यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे. मूळ पेशी पुनरुज्जीवनासाठी केलेल्या संशोधनामुळे बोन मॅरो ट्रान्सप्लांट सुलभ होण्यास सहाय्य होणार आहे.
- तर याबद्दल त्यांना जागतिक पातळीवरील स्टेम सेल्स यंग इन्व्हेस्टिगेटर अॅवॉर्ड (तरुण संशोधक पुरस्कार) जाहीर झाला आहे.
- जागतिक पातळीवर महत्त्वाचे ठरलेले हे संशोधन डॉ. रोहन कुलकर्णी यांनी राष्ट्रीय कोशिका विज्ञान केंद्र (नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स) येथे केले आहे.
- शरीरातील मूळ पेशींवरील संशोधनकार्यासाठी वाहिलेल्या स्टेम सेल्स या नामांकित नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या डॉ. रोहन कुलकर्णी यांच्या शोधनिबंधाचे जागतिक पातळीवरील महत्त्व अधोरेखित करण्यासाठी हा पुरस्कार प्रदान केला आहे. शरीरामध्ये रक्तनिर्मितीचे महत्त्वाचे कार्य रक्ताच्या मूळ पेशी करीत असतात.
- तसेच या पेशींचा उपयोग कर्करोग व इतर दुर्धर आजारांच्या उपचारांसाठी केला जातो. वृद्ध लोकांमधील या पेशींची कार्यक्षमता कमी असल्याने उपचारांसाठी त्या निरुपयोगी ठरतात. पुनरुज्जीवनाद्वारे मूळ पेशींकरिता अधिक दाते उपलब्ध करून गरजू रुग्णांना उपचार मिळावे, असे या संशोधनाचे उद्दिष्ट होते. या मूळ पेशी पुनरुज्जीवनासाठी केलेल्या संशोधनामुळे बोन मॅरो ट्रान्सप्लांट सुलभ होण्यास सहाय्य होणार आहे.
दिनविशेष:
- उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडणारे ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ चार्ल्स डार्विन यांचा जन्म 12 फेब्रुवारी 1809 मध्ये झाला होता.
- संस्कृत विद्वान आणि आर्य समाजाचे संस्थापक मूळशंकर करसनदास तिवारी तथा स्वामी दयानंद सरस्वती यांचा जन्म 12 फेब्रुवारी 1824 मध्ये झाला.
- पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या हस्ते सन 1976 मध्ये हडेक्की (केरळ) प्रकल्प देशास अर्पण करण्यात आले होते.
- सन 1993 मध्ये एम.एन. वेंकटचलैय्या यांनी भारताचे 25वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
- सन 2003 या वर्षी आवाजापेक्षा दुप्पट वेगवान ब्राह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा
Drivers
I am driver hgv lic. Psv bacge @driver