12 डिसेंबर 2020 चालू घडामोडी – Current Affairs

12 December 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (12 डिसेंबर 2020)

भारतीय वंशाचे राजा जॉन ‘नासा’च्या चांद्रवीर चमूत :

  • अमेरिकेच्या नासा या अवकाश संशोधन संस्थेने चंद्रावरील ‘आर्टेमिस’ मानवी अवकाश मोहिमेसाठी संभाव्य चांद्रवीरांची नावे निश्चित केली असून त्या अठरा जणांमध्ये भारतीय वंशाचे अमेरिकी राजा जॉन वुरुपतूर चारी यांचा समावेश करण्यात आला आहे.
  • या चमूत निम्म्या महिला आहेत. चारी हे अमेरिकेच्या हवाई दलातील माजी अधिकारी आहेत. नासाने त्यांची निवड चांद्रमोहिमेतील संभाव्य चांद्रवीरात केली आहे.
  • दशक अखेरीस चंद्रावर शाश्वत मानवी अस्तित्व निर्माण करण्याचा हेतू या मोहिमेत असून त्याची पहिली पायरी म्हणून 2024 मध्ये पहिली महिला चंद्रावर उतरणार आहे.
  • यापूर्वी अमेरिकेच्या अपोलो मोहिमांनी चंद्रावर मानवी मोहिमा राबवल्या होत्या.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (11 डिसेंबर 2020)

जो बायडेन, कमला हॅरिस टाईम ‘पर्सन ऑफ द ईयर’:

  • टाईम मॅगझीननं अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि उप-राष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांना वर्ष 2020 साठी ‘पर्सन ऑफ द इयर’ घोषित केलं आहे.
  • काही दिवसांपूर्वीच अमेरिकेत बहुप्रतिक्षित अशा राष्ट्राध्यक्षपदाचा निवडणुका पार पडल्या.
  • निवडणुकांच्या निकालानंतर जो बायडेन आणि कमला हॅरिस यांचा विजय झाल्याचं घोषित करण्यात आलं होतं.
  • गेल्या वर्षी पर्यावरणाच्या चळवळीत सहभागी असलेल्या ग्रेटा थनबर्गला पर्सन ऑफ द इयर नं सन्मानित करण्यात आलं होतं. तर 2016 मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना हा सन्मान मिळाला होता.

गगनयानाच्या बूस्टरची गुणवत्ता वालचंदनगरमध्ये होणार सिद्ध :

  • गगनयानाच्या उड्डाणासाठी लागणारे बूस्टर पुण्यातील वालचंदनगर कंपनीत तयार होणार आहे.
  • बूस्टर उभारणीबरोबरच आता बूस्टरच्या गुणवत्ता चाचणीचाही प्रकल्प कंपनीने उभारल्याने अंतिम प्रक्षेपणापूर्वीच्या सर्व चाचण्या या कंपनीतच करता येणार आहेत.
  • केवळ दीड वर्षात हा प्रकल्प कंपनीने उभारला असून, अशी क्षमता असणारी वालचंदनगर कंपनी ही देशातील पहिली कंपनी ठरली आहे.
  • गगनयान ही भारताची पहिली मानवरहित अंतराळ मोहीम आहे. 2020 मध्ये ही मोहीम राबविली जाणार होती. मात्र, कोरोनामुळे गगनयानाचे प्रक्षेपण लांबले.
  • मुख्य यानाबरोबर हे यान अंतराळात पाठविण्यासाठी जीएसएलव्ही मार्क 3 या भारताच्या बाहुबली प्रक्षेपकाचा वापर केला जाणार आहे. बूस्टर बनविण्याबरोबरच बूस्टरची क्षमता तपासण्याचा प्रकल्पही कंपनीत उभारला आहे.
  • गगनयान मोहिमेच्या प्रक्षेपणादरम्यान एखादा अपघात झाल्यास अंतराळवीरांचा जीव वाचविण्यासाठी क्र्यू एस्केप सिस्टिमही कंपनीत तयार करण्यात येत आहे.
  • यानाचा स्फोट झाल्यास आपोआप या यंत्रणेमुळे यानाचा अंतराळवीर असलेला भाग हा यानापासून दूर होईल.

सरकारी कर्मचाऱ्यांना ड्रेसकोड :

  • राज्य सरकारच्या सेवेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठीही आता ड्रेसकोड लागू करण्यात आला असून कार्यालयात येताना जीन्स, टी-शर्ट तसेच रंगीबेरंगी, नक्षीकाम केलेले, गडद रंगाचे कपडे घालण्यास मनाई केली आहे.
  • अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नीटनेटका स्वच्छ पेहराव करूनच ड्युटीवर यावे, असा आदेश सामान्य प्रशासन विभागाने काढला आहे.
  • हा आदेश राज्यातील सर्व शासकीय कायार्लयातील कर्मचारी, कंत्राटी तत्त्वावरील कर्मचारी, तसेच सल्लागार म्हणून शासकीय कामासाठी येणाऱ्या व्यक्तींनाही लागू असेल.
  • राज्य शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी कार्यालयात भेट देणाऱ्या संबंधितांशी शासनाचे प्रतिनिधी म्हणून संवाद साधतात.
  • अशा वेळी अधिकारी-कर्मचाऱ्यांची वेशभूषा हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा महत्त्वाचा भाग म्हणून ओळखला जातो.

दिनविशेष:

  • सन 1882 मध्ये आनंदमठ या बंकिमचंद्र यांच्या कादंबरीचे प्रकाशन, याच कादंबरीमध्ये वंदे मातरम् हे गीत आहे.
  • गुजराथी कथाकार व कादंबरीकार गौरीशंकर गोवर्धनराम जोशी तथा धूमकेतू यांचा जन्म 12 डिसेंबर 1892 मध्ये झाला होता.
  • जी. मार्कोनी याला सन 1901 मध्ये प्रथमच बिनतारी संदेशाचे अटलांटिक महासागर पार प्रक्षेपण करण्यात यश मिळाले.
  • 12 डिसेंबर 1911 रोजी दिल्ली ही भारताची राजधानी करण्यात आली. या आधी कोलकाता ही भारताची राजधानी होती.
  • राष्टवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा जन्म 12 डिसेंबर 1940 मध्ये झाला.
  • प्रसिध्द अभिनेते शिवाजी गायकवाड उर्फ रजनीकांत यांचा जन्म 12 डिसेंबर 1950 मध्ये झाला.
  • प्रियांका चोप्रा यांना सन 2016 मध्ये युनिसेफ (UNICEF) सदिच्छा दूत म्हणून नेमण्यात आले होते.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (13 डिसेंबर 2020)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.