12 एप्रिल 2022 चालू घडामोडी – Current Affairs

12 April 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (12 एप्रिल 2022)

भारताच्या रणगाडाविरोधी हेलिना क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी :

 • भारताने सोमवारी रणगाडाविरोधी मार्गदर्शित क्षेपणास्त्र हेलिनाची पोखरण येथे यशस्वीरित्या चाचणी केली.
 • स्वदेशी बनावटीच्या आधुनिक हलक्या हेलिकॉप्टरमधून ही चाचणी करण्यात आली.
 • हेलिना हे जगातील सर्वात आधुनिक रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र असल्याची माहिती डीआरडीओतर्फे (संरक्षण संशोधन विकास संस्था) देण्यात आली.
 • हेलिनाची कमाल पल्ल्याची क्षमता ही सात किलोमीटर आहे.
 • तर त्याची रचना ही शस्त्रास्त्रयुक्त आधुनिक हलक्या हेलिकॉप्टरसाठी (एएलएच) करण्यात आली आहे.
 • सोमवारी घेण्यात आलेली ही चाचणी डीआरडीओने विकसित केलेल्या तिसऱ्या पिढीतील फायर अ‍ॅन्ड फरगेट म्हणजेच डागा आणि विसरा श्रेणीतील क्षेपणास्त्रांच्या वापरसिद्धता चाचण्यांचा भाग होती.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (11 एप्रिल 2022)

पहिला लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाहीर :

 • यंदा पहिल्यांदाच ‘लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार असून पुरस्काराचे पहिले मानकरी पंतप्रधान नरेंद्र मोदी असणार असल्याची घोषणा उषा मंगेशकरांनी केली.
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यावर्षीपासून सुरू झालेल्या लता दिनानाथ मंगेशकर पुरस्काराचे पहिले मानकरी ठरले आहेत.
 • सर्वोत्कृष्ट देशसेवा आणि जनसेवेसाठी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
 • त्याचबरोबर उत्कृष्ट संगीत कारकीर्दीसाठी गायक राहुल देशपांडे यांना पुरस्कार देण्यात आला आहे.
 • तर सिनेमातल्या कारकिर्दीसाठी अभिनेत्री आशा पारेख आणि अभिनेते जॅकी श्रॉफ यांना विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत.
 • सामाजिक कार्यासाठी आनंदमयी पुरस्कार नुतन मुंबई टिफीन चॅरिटेबल ट्रस्ट म्हणजे मुंबईच्या डब्बेवाल्यांना जाहीर झाला असून संध्याछाया या नाटकासाठी दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी आणि निर्माते श्रीपाद पद्माकर यांनाही पुरस्कार जाहीर झाले आहेत.
 • तर येत्या 24 एप्रिलला मास्टर दिनानाथ मंगेशकर यांची 80 वी पुण्यतिथी साजरी होणार असून त्यानिमित्ताने मास्टर दिनानाथ मंगेशकर पुरस्कारांची सोमवारी घोषणा करण्यात आली.

नवाझ शरीफ यांचे भाऊ शहबाझ शऱीफ झाले पाकिस्तानचे नवे पंतप्रधान :

 • पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे भाऊ शहबाझ शरीफ यांनी यांनी बिनविरोध निवडून आल्यानंतर पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली.
 • इम्रान खान यांना शनिवारी अविश्वास ठरावाद्वारे पंतप्रधानपदावरून हटवण्यात आलं.
 • त्यानंतर आता शहबाझ शरीफ पाकिस्तानचे नवे पंतप्रधान होत आहेत.
 • पंतप्रधान पदाच्या निवडणुकीआधीच इम्रान खान यांनी संसद सदस्यपदाचा राजीनामा दिला.

1 जुलैपासून प्लास्टिकबंदी :

 • एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तूंचे उत्पादन, आयात, साठवणूक, वाहतूक, वितरण, विक्री व वापरावर राज्यात 1 जुलैपासून पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.
 • तर त्यात प्रामुख्याने प्लास्टिकच्या पिशव्या, ताटे, वाटय़ा, ग्लास, काटे, चमचे, अन्नपदार्थ, मिठाई यांच्या पॅकेजिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिकचा समावेश आह़े
 • केंद्र सरकारच्या अधिसूचनेनुसार राज्यात एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक वस्तूंवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव अशोक शिनगारे यांनी दिली.
 • प्लास्टिकपासून निर्माण होणाऱ्या अविघटनशील कचऱ्याचा सागरी व वन्यजीव तसेच मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होतो़.
 • प्लास्टिक कचरा शहरांमधील नाले, गटारात अडकून राहिल्याने अनेकदा पूरपरिस्थती निर्माण झाली आह़े त्याला पायबंद घालण्यासाठी राज्य सरकारने 2006 मध्ये प्लास्टिक बंदीचा कायदा केला.
 • तर या संदर्भात केंद्रीय पर्यावरण, वने आणि वातावरणीय बदल मंत्रालयाने देशात एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक वस्तूंचे उत्पादन, साठा, वाहतूक, विक्री, आयात, वितरण व वापरावर बंदी घालण्यासंबंधी 21 ऑगस्ट 2021 रोजी एक अधिसूचना प्रसृत केली.

आयपीएलच्या RR vs LSG सामन्यामध्ये पहिल्यांदाच रिटायर्ड आऊट :

 • आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 20 वा सामन्यात चांगलीच अटीतटीची लढत झाली.
 • तर हा सामना राजस्थान रॉयल्सने तीन धावांनी जिकंला असून लखनऊ सुपर जायंट्सला पराभवाचा सामना करावा
 • दरम्यान, या सामन्यात आयपीएलच्या इतिहासात अगोदर कधीही घडला नाही असा प्रकार समोर आला.
 • आयपीएलच्या इतिहासात रविचंद्रन अश्विन हा रिटायर्ड आऊट होणारा पहिलाच खेळाडू ठरला आहे.
 • तर संघाच्या हितासाठी अश्विनने रिटायर्ड आऊट होण्याचा निर्णय घेतला होता.

दिनविशेष:

 • मेवाडचा महापराक्रमी राजा संग्रामसिंग ऊर्फ राणा सांगा यांचा जन्म 12 एप्रिल 1382 मध्ये झाला होता.
 • 12 एप्रिल 1720 हा दिवस पहिला पेशवा बाळाजी विश्वनाथ भट यांचा स्मृतीदिन आहे.
 • सन 1967 मध्ये कैलाशनाथ वांछू भारताचे 10वे सरन्यायाधीश झाले होते.
 • भारताचे पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांनी सन 1997 मध्ये राजीनामा दिला होता.
 • सन 1998 मध्ये सी. सुब्रमण्यम यांना भारतरत्न प्रदान करण्यात आला.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.