12 April 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

भारतीय जीवन विमा महामंडळाने (एलआयसी)
भारतीय जीवन विमा महामंडळाने (एलआयसी)

12 April 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (12 एप्रिल 2020)

‘एलआयसी’चा हप्ता भरण्यास 30 दिवसांची मुदतवाढ :

 • करोना साथीच्या पाश्र्वभूमीवर भारतीय जीवन विमा महामंडळाने (एलआयसी) विम्याचे मार्च आणि एप्रिलमधील हप्ते भरण्यासाठी 30 दिवसांची मुदतवाढ दिली आहे.
 • महत्त्वाचे म्हणजे करोनामुळे विमाधारकाचा मृत्यू ओढवल्यास अन्य प्रकरणांप्रमाणेच भरपाईचा दावा प्राधान्याने स्वीकारून वारसाला भरपाईची रक्कम तातडीने दिली जाईल, असे शनिवारी जाहीर करण्यात आले.
 • तसेच करोनामुळे झालेल्या मृत्यूमुळे आतापर्यंत 16 विमाधारकांच्या कुटुंबांना भरपाई देण्यात आली आहे.
 • तर विम्याचे हप्ते फेब्रुवारीत देय असलेल्यांसाठीचा वाढीव मुदतीचा काळ 22 मार्चनंतर संपुष्टात येत होता. त्यांना 15 एप्रिलपर्यंत हप्ते भरता येतील, असे महामंडळाने स्पष्ट केले आहे.
 • ज्या विमाधारकांच्या विम्याला आरोग्य तपासणीशिवाय फेरमुदत देता येणे शक्य आहे, त्या प्रकरणांत ऑनलाइन कार्यवाही केली जाईल. विम्याचे हप्ते भरताना एलआयसीच्या डिजिटल पेमेंट सुविधेसाठी कोणतेही सेवा शुल्क आकारले जाणार नाही.
 • तसेच आवश्यक माहिती संकेतस्थळावर दिल्यास विम्याचा हप्ता भरता येईल. एलआयसी पे डायरेक्ट हे मोबाइल अ‍ॅप डाऊनलोड करूनही हप्ता भरता येईल.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (11 एप्रिल 2020)

अन्न वाटपाच्या सेल्फी आणि फोटोवर बंदी :

 • कोरोनाला आळा घालण्यासाठी संपूर्ण देशभरात लॉकडाऊन सुरु झाला. त्यानंतर अनेक गरजूंना मदत करण्यासाठी अनेक हात मदतीला सरसावले.
 • मात्र, काहींनी मदत करतानाचे फोटो काढले आणि ते सोशल मीडियावर टाकले. अशांवर आता गुन्हे दाखल होणार आहेत. अन्न पदार्थ आणि जेवण वाटणाऱ्यांनी जर त्याचा फोटो काढला तर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचा निर्णय अजमेरच्या जिल्ह्याधिकाऱ्यांनी घेतला आहे.
 • तर अशा व्यक्तींवर कडक कारवाई करत त्यांच्यावर भा. दं. वि. कलम 188 अन्वये गुन्हा दाखल करणार असल्याचे अजमेरच्या जिल्हाधिकारी विश्व मोहन शर्मा यांनी दिली.

केंद्रानं 30 कोटी जनतेच्या खात्यात 28 हजार 256 कोटी केले जमाब:

 • कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मोदी सरकारनं गरिबांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.
 • पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत (पीएमजीकेवाय) 30 कोटी गरिबांना एकूण 28,256 कोटी रुपये देण्यात आले आहेत. अर्थ मंत्रालयाने आज याबाबत माहिती दिली.
 • तर 21 दिवसांच्या लॉकडाऊनदरम्यान केंद्र सरकारने 1.7 लाख कोटी रुपयांचे मदत पॅकेज जाहीर केले आहे.
 • केंद्र सरकारने जाहीर केलेल्या या दिलासादायक पॅकेजमध्ये गरीब कुटुंबांना धान्य घेण्यासाठी आणि गोरगरीब महिला व ज्येष्ठ नागरिकांना रोख रक्कम देण्याची घोषणा करण्यात आली.
 • ‘प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत 28,256 कोटी रुपये थेट लाभ हस्तांतरण म्हणून 30 कोटी लाभार्थ्यांना देण्यात आले आहेत.
 • तसेच या एकूण रकमेपैकी 13,855 कोटी रुपये पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत प्रथम हप्ता म्हणून देण्यात आला आहे. त्याअंतर्गत एकूण 8 कोटी शेतकरी लाभार्थ्यांपैकी 6.93 कोटी शेतकर्‍यांच्या खात्यात दोन हजार रुपयांचा पहिला हप्ता पाठविला गेला आहे.

पॅरासिटेमॉलच्या 30 लाख गोळ्यांचा आज ब्रिटनला पुरवठा :

 • भारताने ब्रिटनला 30 लाख पॅरासिटेमॉलच्या गोळ्या पाठवल्या असून त्या रविवारी त्यांना मिळणार आहेत. या मदतीसाठी ब्रिटनने भारताचे आभार मानले आहेत.
 • ब्रिटनचे दक्षिण आशियाविषयक मंत्री लॉर्ड तारिक अहमद यांनी सांगितले की, ही मदत दोन्ही देशांतील संबंधांसाठी महत्त्वाची असून सहकार्याचे प्रतीक आहे.
 • जागतिक पेचप्रसंगाच्या काळात दोन देश एकमेकांना मदत करू शकतात हे यातून स्पष्ट झाले आहे. भारत व ब्रिटन हे दोन देश करोनाच्या प्रतिबंधासाठी एकमेकांना मदत करतील यात शंका नाही. ब्रिटनच्या वतीने आपण भारत सरकारचे आभार मानतो.
 • ब्रिटनचे जे लोक भारतात आहेत त्यांना परत नेण्यासाठी सरकारने ज्या विमानांची व्यवस्था केली आहे त्याच विमानांमधून या गोळ्या व इतर वैद्यकीय मदत पाठवण्यात येत आहे ती रविवारी त्यांना मिळेल.

‘इबोला’चा रुग्ण सापडल्याने वीस महिन्यांची मोहीम अपयशी :

 • ‘इबोला’ या घातक विषाणूला पायबंद घालण्यात 20 महिन्यांच्या मोहिमेनंतर अपयश आले असून काँगोमध्ये या विषाणूचा एक रुग्ण सापडला आहे.
 • तर 52 दिवसांतच ‘इबोला’चा रुग्ण सापडल्याने या विषाणूचे निर्मूलन करण्यात अपयश आल्याचे मानले जाते.
 • जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख ट्रेडॉस अधनोम घेब्रेसस यांनी सांगितले की, याचा अर्थ आता काँगोचे सरकार ‘इबोला’चे उच्चाटन झाल्याचे अपेक्षेप्रमाणे सोमवारी जाहीर करू शकणार नाही.
 • 1970च्या दशकात ‘इबोला’चा पहिला रुग्ण सापडला होता. ‘इबोला’मुळे अंतर्गत रक्तस्राव होऊन ताप येत असतो.
 • बेल्जियन वैज्ञानिकांनी काँगोतील झैरेत अनेक लोक मृत्युमखी पडल्याचा शोध घेतला असता त्यांना त्यांच्यात ‘इबोला’चे अस्तित्व सापडले होते. त्या भागातील नदीवरून या विषाणूला ‘इबोला’ हे नाव देण्यात आले होते.
 • तसेच हा विषाणू वटवाघळात सापडतो. पण वटवाघळांना त्यामुळे काही होत नाही ज्या लोकांना संसर्ग होतो ते मात्र तापाने आजारी पडतात.
 • माकडे, काळविटे त्याने संसर्गित होतात. त्यांच्यातूनही हा विषाणू माणसात येतो. विषाणूचे झैरे, सुदान, बुंडीबुग्यो, रेस्टन व ताइ फॉरेस्ट असे प्रकार आहेत. ताप, स्नायूदुखी, उलटय़ा, अतिसार, मूत्रपिंड व यकृत निकामी होणे, अंतर्गत व बा रक्तस्राव अशी लक्षणे असतात.

दिनविशेष:

 • मेवाडचा महापराक्रमी राजा संग्रामसिंग ऊर्फ राणा सांगा यांचा जन्म 12 एप्रिल 1382 मध्ये झाला होता.
 • 12 एप्रिल 1720 हा दिवस पहिला पेशवा बाळाजी विश्वनाथ भट यांचा स्मृतीदिन आहे.
 • सन 1967 मध्ये कैलाशनाथ वांछू भारताचे 10वे सरन्यायाधीश झाले होते.
 • भारताचे पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांनी सन 1997 मध्ये राजीनामा दिला होता.
 • सन 1998 मध्ये सी. सुब्रमण्यम यांना भारतरत्न प्रदान करण्यात आला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (13 एप्रिल 2020)

You might also like
1 Comment
 1. daulat shankar padvi says

  Aamca gavat dany borbor vatp karte naahi

Leave A Reply

Your email address will not be published.