12 April 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

12 April 2019 Current Affairs In Marathi

12 April 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (12 एप्रिल 2019)

‘सीबीएसई’च्या शाळांमध्ये कला शिक्षण बंधनकारक:

 • केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) संलग्न शाळांमध्ये पहिली ते बारावीच्या अभ्यासक्रमात कला शिक्षण बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला आहे.
 • कला शिक्षणामध्ये संगीत, नृत्य, नाटक या पारंपरिक कलांसह पाककलेचाही समावेश करण्यात आला असून या निर्णयामागे विद्यार्थ्यांचे शिक्षण आनंददायी करण्याचा सीबीएसईचा विचार आहे.
 • शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाचे घटक असलेल्या शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक राष्ट्रीय शिक्षण, संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (एनसीईआरटी) आणि कला क्षेत्रातील तज्ज्ञ यांच्याशी सीबीएसईने चर्चा केली.
 • विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासामध्ये कला महत्त्वाची ठरते. त्यामुळे त्याचा समावेश शिक्षणामध्ये करणे संयुक्तिक ठरेल असे मत या चर्चेत पुढे आल्याने सीबीएसईने कला शिक्षण अभ्यासक्रमात आणण्याचा निर्णय घेतला. कलांच्या समावेशामुळे पारंपरिक शिक्षण आंतरविद्याशाखीय होईल.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (11 एप्रिल 2019)

पॅरालिम्पिकपटू दीपा मलिकला हिलरी शिष्यवृत्ती जाहीर:

 • रिओ पॅरालिम्पिकमध्ये रौप्यपदक पटकावलेल्या दीपा मलिकला तिच्या प्रेरणादायी कामगिरीबद्दल यंदाच्या वर्षीची न्यूझीलंड पंतप्रधानांकडून सर एडमंड हिलरी शिष्यवृत्ती जाहीर करण्यात आली आहे. dipa-malik
 • 48 वर्षीय दीपाने 2016च्या रिओ पॅरालिम्पिकमधील गोळाफेक (एफ 53) प्रकारात रौप्यपदक मिळवले होते. तिला ही शिष्यवृत्ती भारत आणि न्यूझीलंडमधील नागरिकांच्या स्नेहसंबंधात सुधारणा व्हावी आणि क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन द्यावे, या उद्देशाने देण्यात येणार आहे.
 • ‘भारताच्या दीपाला ही शिष्यवृत्ती जाहीर करताना आम्हाला आनंद होत आहे. न्यूझीलंडच्या पंतप्रधान जसिंडा आर्डेर्न यांनी दोन्ही देशांचे संबंध अधिक बळकट होण्याच्या उद्देशाने ती जाहीर केली आहे,’ असे न्यूझीलंडच्या उच्चायुक्त जोन्ना केम्पकर्स यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.

पश्चिम रेल्वेवरील प्रवासाची 152 वर्षे पूर्ण:

 • बोरीबंदर ते ठाणे या स्थानकांदरम्यान देशातील पहिली रेल्वेगाडी धावल्यानंतर 14 वर्षांनी पश्चिम रेल्वे मार्गावर पहिली रेल्वेगाडी धावली.
 • विरार ते बॅकबे या स्थानकांदरम्यान धावणारी ही ट्रेन 12 एप्रिल रोजी 152 वर्षांची होत आहे. या 152 वर्षांत पश्चिम रेल्वेने मोठय़ा प्रमाणात प्रगती केली असून विरार-बोरिवली चौपदरीकरण, डहाणू-विरार लोकल, वातानुकूलित लोकल असे महत्त्वपूर्ण प्रगतीचे टप्पे गाठण्यात यश आले आहे.
 • 1853मध्ये बोरीबंदर ते ठाणे या स्थानकांदरम्यान देशातील पहिली रेल्वेगाडी धावली. त्यानंतर 14 वर्षांनी म्हणजेच 12 एप्रिल 1867 रोजी पश्चिम रेल्वेवरील विरार ते बॅकबे यादरम्यान ट्रेन धावली.
 • बॅकबे हे स्थानक पश्चिम रेल्वे मार्गाचे मुख्य स्थानक चर्चगेट होण्यापूर्वी अस्तित्वात होते. येथूनच गाडय़ा सुटत होत्या. हे स्थानक चर्चगेट आणि मरिन लाइन्स यांमध्ये होते. त्यावेळी बॉम्बे बडोदा आणि सेंट्रल इंडिया या विभागांतर्फे संपूर्ण पश्चिम रेल्वेचे रुळ, स्टेशन, रेल्वेगाडय़ांचे काम करण्यात आले होते.
 • पहिल्यांदा इलेक्ट्रिक ट्रेन 1928मध्ये बोरिवलीपर्यंत धावली होती. त्यापूर्वी ट्रेन वाफेवर धावत होत्या. 3 मार्च 1961ला 9 डब्यांची तर 1986ला 12 डब्यांची ट्रेन सुरू झाली. सध्या पश्चिम रेल्वे मार्गावर 2900 हून अधिक गाडय़ांच्या फेऱ्या आहेत.

रेल्वे प्रवाशांना मिळणार अतिरिक्त 5 टक्के बोनस:

 • रेल्वे प्रवास विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठीच आहे. सामान्य तिकीट विक्रीची संख्या एक्सप्रेस तिकीट विक्रीपेक्षा अधिक आहे. रेल्वेचं तिकीट काढण्याच्या रांगेत तासनतास ताटकळत उभं राहायला लागत होते.
 • मात्र रेल्वेकडून आलेल्या युटीएस अ‍ॅप्लिकेशनमुळे रेल्वे प्रवाशांचा रांगेत उभं राहण्याचा त्रास वाचला. युटीएस अॅप वापरणाऱ्यांची संख्या वाढावी या उद्देशाने रेल्वेकडून वॉलेट रिचार्जवर 5 टक्के अतिरिक्त बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. UTS
 • दररोज सकाळी तिकिटासाठी रांगेतल्या गर्दीमध्ये उभे रहावे लागते. त्यासाठी रेल्वे प्रशासनाने काही वर्षापूर्वी डिजिटल पद्धतीने तिकिट काढण्याची सुविधा प्रवाशांना उपलब्ध करुन दिली आहे.
 • तर त्यामुळे आता आर वॉलेट रिचार्ज असणाऱ्या तिकिटांवर पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून 5 टक्के अतिरिक्त बोनस मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे. हा अ‍ॅप मोबाईल फोनमध्ये डाऊनलोड करुन मोबाईल नंबर रजिस्टर करणे बंधनकारक असते. यानंतर डिजिटल स्वरुपात तिकीट वैध ठरली जाते.
 • या सेवेसाठी प्रशासनाकडून सहा महिन्यांची मुदत देण्यात आली असून 24 ऑगस्ट पर्यंत वॉलेट रिजार्चवर बोनस देण्यात येणार आहे. तर लोकल तिकिटासाठी स्मार्ट कार्ड. एटीव्हीएम आणि जेटीबीएससाठी सुद्धा ही सुविधा लागू करण्यात आली आहे.

भारताची लोकसंख्या पोहोचली 136 कोटींवर:

 • भारताच्या लोकसंख्येत वाढ झाली असून ती 136 कोटींवर पोहोचली आहे. 2010 ते 2019 या काळात 1.2 टक्के वार्षिक दराने ही वाढ झाली आहे.
 • चीनच्या वार्षिक लोकसंख्या वाढीच्या दरापेक्षा ही वाढ निम्म्याने जास्त आहे. संयुक्त राष्ट्रांच्या लोकसंख्या निधीच्या अहवालानुसार ही आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे.
 • 2019 मध्ये भारताची लोकसंख्या 136 कोटींवर पोहोचली आहे. 1994 मध्ये ती 94.22 कोटी इतकी होती. तत्पूर्वी 1969 मध्ये ती 54.15 कोटी इतकी होती.
 • जगाच्या लोकसंख्येत वाढ होऊन 2019 मध्ये ती 771.5 कोटी इतकी झाली आहे. गेल्या वर्षी ही आकडेवारी 763.3 कोटी होती.
 • संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीनुसार, 2010 आणि 2019 मध्ये भारताच्या लोकसंख्येत 1.2 टक्क्यांनी वाढ झाली आहे. याच्या तुलनेत चीनची लोकसंख्या 2019 मध्ये 142 कोटींवर पोहोचली आहे.

दिनविशेष:

 • मेवाडचा महापराक्रमी राजा संग्रामसिंग ऊर्फ राणा सांगा यांचा जन्म 12 एप्रिल 1382 मध्ये झाला होता.
 • 12 एप्रिल 1720 हा दिवस पहिला पेशवा बाळाजी विश्वनाथ भट यांचा स्मृतीदिन आहे.
 • सन 1967 मध्ये कैलाशनाथ वांछू भारताचे 10वे सरन्यायाधीश झाले होते.
 • भारताचे पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांनी सन 1997 मध्ये राजीनामा दिला होता.
 • सन 1998 मध्ये सी. सुब्रमण्यम यांना भारतरत्न प्रदान करण्यात आला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (13 एप्रिल 2019)

You might also like
1 Comment
 1. ankur says

  nice

Leave A Reply

Your email address will not be published.