11 September 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

संसदेच्या अधिवेशनाचे 62 टक्के कामकाज डिजिटल पद्धतीने चालेल:
संसदेच्या अधिवेशनाचे 62 टक्के कामकाज डिजिटल पद्धतीने चालेल

11 September 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (11 सप्टेंबर 2020)

संसदेच्या अधिवेशनाचे 62 टक्के कामकाज डिजिटल पद्धतीने चालेल:

 • करोनाच्या साथरोगामुळे संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचे कामकाज नेहमीप्रमाणे घेणे अशक्य असल्याने ते अधिकाधिक डिजिटल केले जाईल.
 • त्यादृष्टीनेही हे अधिवेशन ऐतिहासिक ठरेल, असे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी गुरुवारी पत्रकारांना सांगितले.
 • संसदेच्या इतिहासात पहिल्यांदाच सदस्यांना सर्व लेखी प्रश्न ऑनलाइन पाठवावे लागतील. अधिवेशनाचे 62 टक्के कामकाज डिजिटल पद्धतीने चालेल.
 • नजिकच्या भविष्यात ते पूर्णत: डिजिटल करण्याचा प्रयत्न असेल, अशी माहिती बिर्ला यांनी दिली.
 • लोकांच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणारे प्रश्न विचारण्याची संधी यावेळी अधिवेशनात दिली जाणार नाही.
 • या संदर्भात बिर्ला म्हणाले की, प्रश्नोत्तराचा तास रद्द केला गेला असला तरी लेखी प्रश्न विचारले जाऊ शकतात व त्याला उत्तरेही दिली जातील. शून्यप्रहर 60 मिनिटांऐवजी अर्ध्या तासाचा असेल.

पॅराशूट रेजिमेंटबरोबर एक महिन्यापेक्षा जास्त काळ प्रशिक्षण घेतले- महेंद्रसिंह धोनी:

 • अत्याधुनिक अशा ‘राफेल’ फायटर विमानांचा आज इंडियन एअर फोर्सच्या ताफ्यात समारंभपूर्वक समावेश करण्यात आला.
 • अंबाला एअर बेसवर झालेल्या सोहळयात ‘राफेल’ फायटर विमाने भारतीय वायू दलाचा भाग झाली.
 • भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने ट्विट करत राफेलच्या समावेशावर आनंद व्यक्त केला आहे.
 • इंडियन एअर फोर्सच्या ताफ्यात ही शक्तिशाली विमाने आल्याने त्यांची मारक क्षमता आणखी वाढणार आहे असे धोनीने म्हटंले आहे.
 • महेंद्रसिंह धोनीने भारतीय सैन्याच्या पॅराशूट रेजिमेंटबरोबर एक महिन्यापेक्षा जास्त काळ प्रशिक्षण घेतले आहे.
 • जगातील सर्वोत्कृष्ट लढाऊ 4.5 जनरेशनच्या विमानांना जगातील सर्वोत्कृष्ट पायलट मिळाले आहेत.
 • आमच्या वैमानिकांच्या हातात भारतीय वायुसेनेच्या वेगवेगळ्या विमानासोबत ही शक्तिशाली विमाने आल्याने त्यांची क्षमता आणखी वाढेल” असे धोनीने म्हटले आहे.

सेरेना, थिम उपांत्य फेरीत- अमेरिकन टेनिस स्पर्धा:

 • 23 ग्रँडस्लॅम विजेत्या सेरेना विल्यम्सने स्वेताना पिरोंकोव्हावर संघर्षमय विजय मिळवताना अमेरिकन खुल्या ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे.
 • नोव्हाक जोकोव्हिचला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्यानंतर जेतेपदासाठी प्रबळ दावेदार समजल्या जाणाऱ्या डॉमिनिक थिमने सहजपणे विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली आहे.
 • दोन तासांपेक्षा अधिक काळ रंगलेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत पहिला सेट गमावल्यानंतर सेरेनाने जोमाने पुनरागमन करत 4-6, 6-3, 6-2 अशा विजयासह आगेकूच केली.

दिनविशेष :

 • 11 सप्टेबर 1756 मध्ये होप हिरा चोरला गेला.
 • म. गांधींनी द. आफ्रिकेत सत्याग्रह हा शब्द 11 सप्टेमबर 1906 मध्ये पहिल्यांदा वापरला.
 • आझाद हिंद सेनेने जन गण मन 11 सप्टेबर 1942 मध्ये राष्ट्रगीत म्हणून गायले.
 • 11 सप्टेबर 1885 मध्ये इंग्लिश कादंबरीकार, कवी, नाटककार डी. एच. लॉरेन्स यांचा जन्म झाला.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.