11 ऑक्टोबर 2021 चालू घडामोडी – Current Affairs
11 October 2021 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (11 ऑक्टोबर 2021)
स्पुटनिक लाइट लशीच्या निर्यातीस भारताची मान्यता :
- भारत सरकारने एका मात्रेच्या स्पुटनिक लाइट या कोविड 19 प्रतिबंधक लशीच्या निर्यातीस मान्यता दिली आहे.
- तर ही लस रशियाच्या सहकार्याने भारतात तयार करण्यात आली असून आपल्या देशात या लशीला अजून मान्यता देण्यात आलेली नाही .
- भारताच्या हेटरो बायोफार्मा लि. या कंपनीने या लशीचे उत्पादन केले असून स्पुटनिक लाइट लशीच्या 40 लाख मात्रांची निर्यात रशियाला करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
- स्पुटनिक लाइट ही रशियाच्या स्पुटनिक व्ही लशीसारखीच असून भारतातील लसीकरण कार्यक्रमात वापर करण्यासाठी अजून या लशीला मंजुरी देण्यात आलेली नाही.
- भारताच्या औषध महानियंत्रकांनी स्पुटनिक व्ही लशीला एप्रिलमध्ये मंजुरी दिली होती पण स्पुटनिक लाइट लशीला अजून मंजुरी मिळालेली नाही.
Must Read (नक्की वाचा):
कनिष्ठ जागतिक नेमबाजी स्पर्धात भारताला यश :
- नेमबाजांनी अखेरच्या दिवशीही अचूक वेध साधल्याने भारताने ‘आयएसएसएफ’ कनिष्ठ जागतिक नेमबाजी स्पर्धेची सर्वाधिक पदकांसह सांगता केली.
- ‘आयएसएसएफ’ने जाहीर केलेल्या पदकतालिकेनुसार, स्पर्धेअंती भारताच्या खात्यात एकूण 40 पदके होती.
- तर ज्यात 16 सुवर्ण, 15 रौप्य आणि 9 कांस्यपदकांचा समावेश होता.
- अखेरच्या दिवशी 25 मीटर स्टँडर्ड पिस्तूल आणि 50 मीटर पिस्तूल या ऑलिम्पिकमध्ये न खेळल्या जाणाऱ्या नेमबाजी प्रकारांत भारतीयांनी उत्कृष्ट कामगिरी करताना सर्व 12 पदके आपल्या नावे केली.
- तसेच 25 मीटर स्टँडर्ड पिस्तूल प्रकारात पुरुषांमध्ये विजयवीर सिद्धूने सुवर्ण, तर उधयवीर सिद्धूने रौप्यपदकाची कमाई केली.
आयसीसीने जाहीर केले विश्वचषक विजेत्यां संघाचे पारितोषिक :
- ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद मिळवणाऱ्या संघाला 16 लाख डॉलरचा धनादेश देऊन गौरवण्यात येणार आहे, असे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) जाहीर केले.
- तर यंदा 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर या कालावधीत संयुक्त अरब अमिराती आणि ओमान येथे ही स्पर्धा रंगणार आहे. 23 ऑक्टोबरपासून स्पर्धेच्या मुख्य फेरीला प्रारंभ होईल.
- तसेच या स्पर्धेच्या उपविजेत्या संघाला आठ लाख डॉलर, तर उपांत्य फेरी गाठणाऱ्या अन्य दोन संघांना प्रत्येकी चार लाख डॉलर देण्यात येतील.
- 2016मध्ये भारतात झालेल्या अखेरच्या ट्वेन्टी-20 विश्वचषकात वेस्ट इंडिजने इंग्लंडला नमवून जेतेपद मिळवले होते.
हरभजन सिंगला मानद डॉक्टरेट पदवीने सन्मानित :
- कोलकाता नाइट रायडर्सचा फिरकीपटू हरभजन सिंगला मानद डॉक्टरेट पदवीने सन्मानित करण्यात आले.
- फ्रान्सची युनिव्हर्सिटी इकोल सुपीरियर रॉबर्ट डी सॉर्बोनेने दीक्षांत समारंभात हरभजनला क्रीडा क्षेत्रातील मानद पीएचडी प्रदान केली.
- विद्यापीठ क्रीडा क्षेत्रातील कामगिरीसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांना मानद डॉक्टरेट प्रदान करते.
- हरभजनने त्याच्या कसोटी कारकिर्दीत भारतीय संघासाठी 103 सामने खेळले आणि त्यात 417 विकेट्स मिळवल्या आहेत.
- एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने 236 सामन्यात 269 विकेट्स घेतल्या आहे.
- तसेच 28 टी-20 सामन्यांमध्ये त्याने 25 विकेट्स घेतल्या आहेत.
टी 20 वर्ल्डमध्ये पहिल्यांदाच होणार DRS चा वापर :
- 17 ऑक्टोबरपासून युएई आणि ओमानमध्ये टी 20 वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात होणार आहे.
- तर या स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाने डीआरएसचा वापर करण्यास मंजुरी दिली आहे.
- टी 20 वर्ल्डकप इतिहासात पहिल्यांदाच डीआरएसचा उपयोग केला जाणार आहे.
- मागचा वर्ल्डकप 2016 मध्ये झाला होता. तेव्हा टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यात डीआरएस प्रणाली उपलब्ध नव्हती.
- मैदानात पंचांकडून निर्णय घेताना झालेली चूक दुरुस्त करण्यासाठी डीआरएसची सुरुवात करण्यात आली होती. डीआरएस घेत फलंदाज किंवा क्षेत्ररक्षण करणारी टीम पंचांच्या निर्णयाला आव्हान देऊ शकतात.
दिनविशेष:
- 11 ऑक्टोबर हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय बालिका दिन‘ आहे.
- सन 1852 मध्ये युनिव्हर्सिटी ऑफ सिडनी या ऑस्ट्रेलियातील विद्यापीठची स्थापना झाली.
- प्रसिद्ध चित्रपट अभिनेते व निर्माते अमिताभ बच्चन यांचा जन्म 11 ऑक्टोबर 1942 मध्ये झाला.
- व्ही.एस. नायपॉल यांना सन 2001 मध्ये साहित्यातील नोबेल पारितोषिक जाहीर झाले.