11 November 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
11 November 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (11 नोव्हेंबर 2020)
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना डी. लिट :
- सार्वजनिक जीवनात गेली 60 वर्षे केलेल्या समाजसेवेबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना मंगळवारी एका विशेष दीक्षांत समारोहात डी.लिट ही मानद पदवी प्रदान करण्यात आली.
- राजस्थानच्या झुनुझुनु येथील श्री जगदीश प्रसाद झाबरमल टिब्रेवाला विद्यापीठातर्फे राज्यपालांना राजभवन येथे ही मानद पदवी समारंभपूर्वक देण्यात आली.
- जगदीशप्रसाद झाबरमल टिब्रेवाला विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. विनोद टिब्रेवाला यांनी विद्यापिठाच्या उपक्रमांची माहिती दिली.
- तर यावेळी राजस्थानी सेवा संस्थेचे विश्वस्त रमाकांत टिब्रेवाला, सुनिल पटोडीया, विनोद दालमिया, वनश्री वालेचा उपस्थित होते.
Must Read (नक्की वाचा):
23 नोव्हेंबरपासून शाळांची घंटा वाजणार :
- राज्याच्या शाळांतील 9 वी ते 12 वीचे वर्ग 23 नोव्हेंबरपासून सुरू करण्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे. त्यानुसार शालेय शिक्षण विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
- तर विद्यार्थ्यांच्या उपस्थितीसाठी पालकांकडून लेखी संमती गरजेची असेल. शाळा व्यवस्थापन समितीने शाळेतील गर्दी टाळण्यासाठी एक दिवसाआड अर्ध्या वर्गाला बोलवायचे असून (50 टक्के ऑनलाइन, 50 टक्के प्रत्यक्ष) एक बाकावर एकच विद्यार्थी बसवण्यात येणार आहे.
- तसेच शाळेमध्ये थर्मामीटर, थर्मल स्कॅनर, पल्स ऑक्सिमीटर, जंतुनाशक, साबण, पाणी या सर्वांची उपलब्धता असणे आवश्यक असेल.
- वाहतूक सुविधांचे निर्जंतुकीकरण, अंतराचे नियम पाळणे बंधनकारक आहे. शाळेतील क्वारंटाइन सेंटर दुसरीकडे नेणे शक्य नसल्यास शाळा खुल्या परिसरात किंवा इतर ठिकाणी भरवण्याचे निर्देश आहेत.
NDA ने स्पष्ट बहुमत मिळवत राखली सत्ता :
- बिहारमध्ये NDA ची दिवाळी गोड झाली आहे. भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने अर्थात NDA ने स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता कायम राखली आहे.
- बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया पहाटेपर्यंत सुरु होती. सर्व 243 जागांचे निकाल हाती असून NDA ने 125 जागा मिळवल्या आहेत.
- तर या 125 जागांमध्ये 74 जागा भाजपाने, 43 जागा जदयूने तर मित्र पक्षांनी 8 जागांवर विजय मिळवला आहे.
- दुसरीकडे महाआघाडीने 110 जागा मिळवल्या आहेत. हेच बिहारचे मुख्यमंत्री होतील हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे.
चिनी कोविड लशीच्या चाचण्या ब्राझीलमध्ये स्थगित :
- चीनच्या कंपनीने तयार केलेल्या कोविड 19 प्रतिबंधक लशीच्या चाचण्या ब्राझीलमध्ये थांबवण्यात आल्या आहेत.
- ‘करोनाव्हॅक’ असे या लशीचे नाव असून त्याच्या चाचण्या थांबवण्यात आल्याचे ‘अॅनव्हिसा’ संकेतस्थळावर सोमवारी म्हटले आहे.
- तर लस निर्मितीत सहभागी असलेल्या भागीदारांकडून लशीच्या चाचण्या स्थगित करण्याबाबत शंका उपस्थित केल्या गेल्या आहेत पण या लशीमुळे अनेक रुग्णांची प्रकृती गंभीर बनल्याचे समजते.
- ‘करोनाव्हॅक’ लशीची निर्मिती सिनोव्हॅक कंपनीने केली असली तरी ब्राझीलमध्ये साव पावलोतील बुटँटन इन्स्टिटय़ूटने लशीचे उत्पादन केले आहे.
पॅरिस मास्टर्स टेनिस स्पर्धात मेदवेदेवला जेतेपदासह चौथे स्थान :
- रशियाच्या डॅनिल मेदवेदेवने पॅरिस मास्टर्स टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावत जागतिक क्रमवारीत प्रथमच चौथे स्थान मिळवले.
- चौथे स्थान मिळवताना मेदवेदेवने विक्रमी 20 ग्रॅँडस्लॅम विजेत्या स्वित्र्झलडच्या रॉजर फेडररला मागे टाकले.
- मेदवेदेवने अंतिम फेरीत जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव्हवर 5-7, 6-4, 6-1 असा विजय मिळवला. पहिला सेट गमावूनही मेदवेदेवने ही बाजी मारली. त्याचे हे या वर्षांतील पहिले विजेतेपद ठरले.
दिनविशेष :
- 11 नोव्हेंबर – राष्ट्रीय शिक्षण दिन
- अमेरिकेतील रस्त्यांना सख्यांवरून नामकरण 11 नोव्हेंबर 1926 मध्ये करण्यात आले.
- 11 नोव्हेंबर 1926 मध्ये आइनस्टाइन रेफ्रिजरेटरच्या शोधासाठी अल्बर्ट आइनस्टाइन आणि लिओ झिझार्ड यांना पेटंट देण्यात आले.
- कुवेत देशाने 11 नोव्हेंबर 1962 मध्ये नवीन संविधान अंगीकारले.
- 11 नोव्हेंबर 1975 मध्ये अंगोला देशाला स्वातंत्र्य मिळाले.
- अँटिगा आणि बार्बुडा या देशांचा 11 नोव्हेंबर 1981 मध्ये संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.