11 मार्च 2022 चालू घडामोडी – Current Affairs
11 March 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (11 मार्च 2022)
रशियातील धनाढय़ांना ब्रिटनमध्ये प्रवेशबंदी :
- रशियाच्या धनाढय़ नागरिकांना ब्रिटनमध्ये प्रवेशबंदी करण्यात आली असून त्यांना ब्रिटनमध्ये कोणताही आर्थिक व्यवहार करण्यास मनाई करण्यात आली आहे.
- प्रीमियर लीग सूकर क्लब चेल्सियाचा अब्जाधीश रोमन अॅब्रामोव्हिच यांनाही ब्रिटनमध्ये प्रवेशबंदी करण्यात आली असून त्यांची ब्रिटनमधील बँक खाती गोठवण्यात आली आहे.
- अॅब्रामोव्हिच यांना ब्रिटनमध्ये स्वतंत्रपणे किंवा व्यापारासाठी कोणताही आर्थिक व्यवहार करता येणार नाही, असे ब्रिटिश प्रशासनाकडून सांगण्यात आले.
- ब्रिटनमध्ये व्यापार करणाऱ्या आणि आर्थिक व्यवहार करणाऱ्या रशियन धनाढय़ांना तडाखा देण्यास ब्रिटनने सुरुवात केली आहे.
- तर या धनाढय़ांना ब्रिटनमध्ये प्रवेशबंदी करण्यात आली असून त्यांची ब्रिटनमधील बँक खाती गोठवण्यात आली आहे.
- तसेच‘बेसिक एलिमेंट्स’ या रशियातील मोठय़ा उद्योगसमूहाचे संस्थापक ओलेग देरिपास्का आणि रोस्नेफ्ट या ऊर्जा कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयगोर सियाचिन यांनाही ब्रिटनने त्यांच्या देशात प्रवेशबंदी केली आहे.
Must Read (नक्की वाचा):
पुन्हा भाजपचीच लाट :
- शेतकरी आंदोलन, करोना हाताळणी, बेरोजगारी आदी मुद्यांवरून विरोधकांनी उभे केलेले आव्हान मोडीत काढून भाजपने पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा विजयी चौकार लगावला़.
- उत्तर प्रदेशात प्रचाराच्या केंद्रस्थानी ठेवलेल्या भाजपच्या ‘बुलडोझर’ने विरोधकांना भुईसपाट केलेच.
- पण, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमधील सत्ताही राखत पक्षाने आपलीच लाट कायम असल्याचे सिद्ध केल़े.
- पंजाबने काँग्रेसचा ‘झाडू’न धुव्वा उडवला़ ‘आप’ने दिल्लीपाठोपाठ तिथेही एकहाती सत्ता मिळवून राष्ट्रीय राजकारणाच्या दिशेने घोडदौड केली़.
- पक्षांतर्गत गटबाजी, नेत्यांच्या पक्षांतराने जेरीस आलेल्या काँग्रेसच्या आणि उत्तर प्रदेशात चार वेळा सत्तास्थानी राहिलेल्या बसपच्या अस्तित्वावर या निकालाने प्रश्नचिन्ह उभे केल़े.
विश्वचषक क्रिकेट स्पर्धात भारताचा पराभव :
- सलामीवीरांसह मधल्या फळीने केलेल्या सुमार कामगिरीमुळे भारतीय संघाला गुरुवारी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत न्यूझीलंडकडून 62 धावांनी पराभव पत्करावा लागला.
- उपकर्णधार हरमनप्रीत कौरने भारताचा पराभव टाळण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली.
- हॅमिल्टन येथे झालेल्या या दुसऱ्या साखळी सामन्यात न्यूझीलंडने दिलेल्या 261 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा डाव 46.4 षटकांत 198 धावांत आटोपला.
- फेब्रुवारीत झालेल्या एकदिवसीय मालिकेत न्यूझीलंडने भारतावर 4-1 असे वर्चस्व गाजवले होते. त्यामुळे भारताला या वेळी पराभवाची परतफेड करण्याची संधी होती.
- दुसऱ्या विजयासह न्यूझीलंडने गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावले, तर भारतीय संघ दोन लढतींमधील दोन गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहे.
श्रीसंतची निवृत्तीची घोषणा :
- एस. श्रीसंतने भारतीय क्रिकेट संघाला दोनदा विश्वविजेता बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
- पण मॅच फिक्सिंगमुळे त्याच्यावर बंदी घालण्यात आली.
- तसेच बंदी उठल्यानंतर पुन्हा एकदा तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये परतला आणि त्याने टीम इंडियातही पुनरागमन दाखविण्याचा आशेचा किरण त्याच्या चाहत्यांना दाखवला.
- पण सलग दोन आयपीएल लिलावाट दुर्लक्ष आणि वृद्धत्व यामुळे त्याच्या कारकिर्दीला ब्रेक लागला.
- श्रीसंतने बुधवारी, 9 मार्च रोजी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.
- श्रीसंतने आधी एकामागून एक ट्विट केले आणि नंतर लाइव्ह येऊन ही दुःखद बातमी चाहत्यांसोबत शेअर केली.
दिनविशेष:
- 1886 या वर्षी आनंदीबाई गोपाळराव जोशी यांना फिलाडेल्फिया विद्यापीठात डॉक्टर पदवी प्रदान करण्यात आली.
- पंडिता रमाबाई यांनी मुंबई सन 1889 मध्ये शारदासदन हि शाळा विधवा आणि कुमारीकांसाठी सुरु केली.
- सन 1984 मध्ये ओअहिली आधुनिक जहाज जलउषा हिचे विशाखापट्टणम् येथे जलावरण झाले.
- 1999 या वर्षी नॅसडॅक शेअरबाजारात जागा मिळवणारी इन्फोसिस ही पहिली भारतीय कंपनी झाली.
- कसोटी क्रिकेटमधे हॅटट्रिक घेणारे हरभजनसिंग हे पहिले भारतीय गोलंदाज बनले. सन 2001 मध्ये त्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध ही कामगिरी केली.