11 March 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

जॅक मा
जॅक मा

11 March 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (11 मार्च 2020)

शस्त्र निर्यातीमध्ये भारत 23 व्या स्थानी :

 • शस्त्रांची आयात न करता आपण जास्तीत जास्त निर्यात केली पाहिजे. मेक इन इंडिया मोहिमेमागे मोदी सरकारचा हाच उद्देश आहे. पण सध्याच्या घडीला शस्त्रास्त्रांची आयात करणाऱ्या देशांमध्ये भारत जगात दुसऱ्या स्थानावर आहे.
 • दिलासा देणारी बाब इतकीच आहे की,जगातील 25 आघाडीच्या शस्त्र निर्यातदार देशांमध्ये आपण 23 व्या स्थानी आहोत.
 • तर शस्त्रास्त्र विक्रीच्या जागतिक व्यापारामध्ये 0.2 टक्के इतकाच आपला वाटा आहे. म्यानमार, श्रीलंका आणि मॉरिशेस हे आपले सर्वात मोठे ग्राहक आहेत. स्टॉकहोल्म इंटरनॅशनल पीस रिसर्च संस्थेच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.
 • तसेच 2015 ते 2019 या काळात सौदी अरेबियाने सर्वाधिक 12 टक्के शस्त्रास्त्रांची आयात केली. त्याखालोखाल भारत 9.2 टक्क्यांसह दुसऱ्या स्थानावर आहे.
 • चीन 4.3 टक्क्यांसह पाचव्या तर पाकिस्तान 2.6 टक्क्यांसह 11 व्या स्थानावर आहेत. सर्व महत्वाची शस्त्रास्त्रे स्वत: विकसित करण्याचे भारत आणि पाकिस्तानचे उद्दिष्टय आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (9 मार्च 2020)

पाच दिवसांचा आठवडा रद्द :

 • कर्मचाऱ्यांच्या कामगिरीवर नाखूष असल्याने सिक्कीम सरकारने पाच दिवसांचा आठवडा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने पाच आठवड्याची सुविधा पूर्णपणे रद्द केली असून दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे.
 • सरकारी आदेशानुसार, 1 एप्रिलपासून या आदेशाची अंमलबजावणी होणार आहे.
 • तर गतवर्षी मे महिन्यात सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री प्रेमसिंह तमंग यांनी सरकारी आणि सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा जाहीर केला होता. याआधी कर्मचाऱ्यांसाठी सहा दिवसांचा आठवडा होता. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्मचाऱ्यांना पाच
 • दिवसांच्या आठवड्याची सुविधा देऊनही त्यांची कामगिरी न सुधारल्याने सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा सरकार नाराज होतं.
 • तसेच सरकारने 28 मे 2019 मधील आदेशात बदल केला आहे.

सरकार आणणार मोहाची ‘दारू’ :

 • सरकारनं मोहाची दारू लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे. या दारूमध्ये अल्कोहोलही असेल. पहिल्यांदाच सरकार असं करणार आहे. या दारूला महुआ न्युट्रिबेव्हरेज असं नाव दिलं आहे. येत्या महिन्याभरात याची विक्री सुरू केली जाण्याची शक्यता आहे.
 • तर या दारूमध्ये पोषण तत्वे असतील, असा दावा केला जात आहे. यात अल्कोहोलचे प्रमाण 5 टक्क्यांच्या आसपास असेल.
 • भारतीय आदिवासी सहकारी विपणन विकास महामंडळाच्या साह्याने आयआयटी-दिल्लीने दोन वर्षांच्या संशोधनानंतर या पेयाची निर्मिती केली आहे.
 • तसेच या महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रवीर कृष्णा यांनी सांगितले की, सध्या आम्हाला या पेयासाठी उत्पादन शुल्क विभागाकडून परवानगीची गरज आहे. त्यानंतर दिल्लीतील पाच ठिकाणी हे पेय विकले जाणार आहे. ट्राईब्स इंडिया नावाच्या स्टोअर्समध्ये हे पेय मिळेल.
 • त्याची किंमत 750 एमएलच्या बॉटलसाठी 750 रूपये इतकी आहे. हे पेय सहा प्रकारच्या फळांच्या फ्लेवरमध्ये उपलब्ध असेल.

‘आयसीसी’ विश्वचषक संघात भारताच्या पूनमला स्थान :

 • अनुभवी फिरकीपटू पूनम यादव या एकमेव भारतीय खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) महिला विश्वचषक ट्वेन्टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या सर्वोत्तम 11 खेळाडूंच्या संघात स्थान मिळवले आहे. भारताच्या शफाली वर्माला 12वा क्रमांक देण्यात आला आहे.
 • तर आयसीसी’ने नमूद केलेल्या निवड समितीतर्फे या संघाची निवड करण्यात आली. यामध्ये माजी क्रिकेटपटू इआन बिशप, अंजुम चोप्रा, लिसा स्थलेकर, पत्रकार रॅफ निकोल्सन आणि ‘आयसीसी’चे प्रतिनिधित्व करणारे हॉली कॉल्व्हिन यांचा समावेश आहे.
 • तसेच 28 वर्षीय पूनमने स्पर्धेत भारताकडून सर्वाधिक 10 बळी मिळवले. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या साखळी लढतीत तिने 19 धावांत चार बळी मिळवून सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली.
 • आयसीसी’च्या संघात अपेक्षेप्रमाणे विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी वर्चस्व राखले आहे. ऑस्ट्रेलियाच्या पाच तर, इंग्लंडच्या चार खेळाडूंना या संघात स्थान लाभले आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका या संघांच्या प्रत्येकी एका खेळाडूचा ‘आयसीसी’च्या संघात समावेश करण्यात आला आहे.

जॅक मा बनले आशियातील सर्वात धनाढ्य व्यक्ती :

 • सोमवारी आंतरराष्ट्रीय बाजारात कमी झालेले खनिज तेलाचे दर आणि त्याचा परिणाम म्हणून घसरलेला शेअर बाजार यामुळे रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी यांची संपत्ती कमी झाली. त्यामुळे आशियातील सर्वात धनाढ्य व्यक्तीची जागा त्यांनी गमावली आहे. या जागेवर आता अलिबाबा ग्रुपचे जॅक मा आले आहेत.
 • कोरोना व्हायरसच्या जगभरातील प्रसारामुळे जागतिक अर्थव्यवस्था मंदीमध्ये आल्याची भीती व्यक्त होत आहे. सोमवारी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खनिज तेलाचे दर खूपच कमी झाले. यामुळे शेअर बाजारातही मोठी घसरण झाली. याचा फटका रिलायन्सच्या समभागांना बसून त्याची किंमत बरीच कमी झाली.
 • जगातील खनिज तेलाची मागणी कमी होत असताना सौदी अरेबिया आणि रशियाने उत्पादनवाढीचा निर्णय घेतल्याने खनिज तेलाचे दर मोठ्या प्रमाणात कमी झाले. त्यामुळेच भारतातील खनिज तेल उत्पादनातील अव्वल कंपनी असलेल्या रिलायन्सचे शेअर बाजारातील दर खाली आले. त्याचा परिणाम कंपनीचे बाजार भांडवल मूल्य कमी होऊन मुकेश अंबानी यांची मालमत्ता घटली.

दिनविशेष:

 • 1886 या वर्षी आनंदीबाई गोपाळराव जोशी यांना फिलाडेल्फिया विद्यापीठात डॉक्टर पदवी प्रदान करण्यात आली.
 • पंडिता रमाबाई यांनी मुंबई सन 1889 मध्ये शारदासदन हि शाळा विधवा आणि कुमारीकांसाठी सुरु केली.
 • सन 1984 मध्ये ओअहिली आधुनिक जहाज जलउषा हिचे विशाखापट्टणम् येथे जलावरण झाले.
 • 1999 या वर्षी नॅसडॅक शेअरबाजारात जागा मिळवणारी इन्फोसिस ही पहिली भारतीय कंपनी झाली.
 • कसोटी क्रिकेटमधे हॅटट्रिक घेणारे हरभजनसिंग हे पहिले भारतीय गोलंदाज बनले. सन 2001 मध्ये त्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध ही कामगिरी केली.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (12 मार्च 2020)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.