11 जून 2022 चालू घडामोडी – Current Affairs

11 June 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (11 जून 2022)

जाहिरातींबाबत नवी मार्गदर्शक तत्त्वे :

  • मुलांना लक्ष्य करून दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने नवी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.
  • मुलांचे आरोग्य आणि पोषण यासंबंधी लाभांचे खोटे दावे करण्याच्या प्रकाराला आळा घालणे आणि त्यांना भेटवस्तूचे प्रलोभन दाखवून वस्तू आणि सेवा घेण्यास प्रवृत्त करण्याच्या प्रकाराला प्रतिबंध करण्याची यामध्ये तरतूद आहे.
  • ग्राहक संरक्षण मंत्रालयाने दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रतिबंध आणि जाहिरातींसंबंधी आवश्यक सतर्कतेसाठी यंदा मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.
  • मुलांना लक्ष्य करणाऱ्या जाहिरातींसंबंधी 19 तरतूदी आहेत. त्या तातडीने लागू करण्यात आल्या आहेत.
  • ग्राहक व्यवहार विभागाचे सचिव रोहित कुमार सिंह यांनी याबाबत माहिती दिली.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (10 जून 2022)

आदिवासी भागाच्या विकासासाठी योजनांचा प्रारंभ :

  • गुजरातमधील नवसारी जिल्ह्यातील आदिवासीबहुल भागातील खुदवेल गावात ‘गुजरात गौरव अभियान’ सभेत ते बोलत होते.
  • तर यावेळी मोदींनी आदिवासी भागाच्या विकासासाठी तीन हजार 50 कोटींच्या योजनांचा प्रारंभ केला.
  • गुजरातमधील माझ्या ‘मुख्यमंत्री अमृतम योजने’च्या धर्तीवर केंद्रात ‘आयुष्मान भारत योजना’ सुरू केली.
  • तर या अंतर्गत गरिबांना उपचारांसाठी पाच लाखांची मदत मिळते.

वरिष्ठ राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धा :

  • महाराष्ट्राच्या संजीवनी जाधवने वरिष्ठ राष्ट्रीय आंतरराज्य ॲथलेटिक्स स्पर्धेत महिलांच्या 10,000 मीटर शर्यतीत सुवर्णपदक कमावले, तर प्राजक्ता गोडबोलेने रौप्यपदक पटकावले.
  • 25 वर्षीय संजीवनीने 33:16.43 सेकंद, तर प्राजक्ताने 33:59.34 सेकंद अशी वेळ नोंदवली.
  • एप्रिल महिन्यात झालेल्या फेडरेशन चषक स्पर्धेत तिने सुवर्णपदक मिळवताना यापेक्षा तीन सेकंदांनी उत्तम अशी अशी वेळ गाठली होती.
  • मात्र राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी पात्रतेची 31 मिनिटांची वेळ नोंदवण्यात ती अपयशी ठरली आहे.

दुखापतीमुळे मेरीची राष्ट्रकुल स्पर्धातून माघार :

  • भारताची अनुभवी बॉक्सिंगपटू एमसी मेरी कोमने पायाला झालेल्या दुखापतीमुळे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून माघार घेतली आहे.
  • सहा वेळा विश्वविजेत्या मेरीला दुखापतीमुळे निवड चाचणी स्पर्धेतील ४८48 किलो वजनी गटातील उपांत्य सामना अर्धवट सोडावा लागला.
  • त्यामुळे हरयाणाच्या नितूला अंतिम फेरीसाठी पुढे चाल देण्यात आली.
  • इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये चालू असलेल्या निवड चाचणी स्पर्धेत 39 वर्षीय मेरीच्या डाव्या पायाला झालेल्या दुखापतीमुळे तिला खेळताना समतोल साधणे कठीण गेले.
  • मग हा सामना थांबवून सामनाधिकाऱ्यांनी नितूला विजयी घोषित केले.

दिनविशेष :

  • मिर्झाराजे जयसिंग आणि शिवाजी महाराज यांच्यात सन 1665 मध्ये 11 जून रोजी पुरंदरचा तह झाला.
  • 11 जून 1895 मध्ये पॅरिस-बॉर्डोक्स-पॅरिस ही इतिहासातील पहिली ऑटोमोबाईल रेस किंवा पहिली मोटर रेस झाली.
  • एडविन आर्मस्ट्राँग यांनी 11 जून 1935 रोजी पहिल्यांदा एफ.एम. लहरींचे प्रसारण केले.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (12 जून 2022)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.