11 जानेवारी 2022 चालू घडामोडी – Current Affairs

भारतीय लष्कर
भारतीय लष्कर

11 January 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (11 जानेवारी 2022)

भारतीय लष्करातील जवानांचा गणवेश बदलणार :

  • भारतीय लष्करातील जवानांचा गणवेश बदलणार आहे.
  • 15 जानेवारी रोजी, आर्मी डे परेड दरम्यान, सैनिकांसाठी नवीन लढाऊ गणवेशाचा पहिला देखावा प्रदर्शित केला जाईल.
  • मेक इन इंडियाच्या अनुषंगाने सैनिकांच्या गणवेशाची निर्मिती भारतीय लष्कर आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (NIFT) यांनी संयुक्तपणे केली आहे.
  • डिजिटल नमुन्यांवर आधारित डिझाइन हे सैनिक तैनात असलेल्या विविध भूप्रदेशांना लक्षात घेऊन तयार केले गेले आहे.
  • तर सैनिकांना या गणवेशात आरामदायी वाटेल, याची काळजी घेण्यात आली आहे.
  • आतापर्यंत तीन वेळा सैन्याचा गणवेश बदलण्यात आलाय. स्वातंत्र्यानंतर पहिल्याच वेळी भारतीय आणि पाकिस्तानी सैन्याचा गणवेश वेगवेगळा असावा, यासाठी बदल करण्यात आले होते.
  • नंतर 1980 मध्ये, आणखी एक बदल करण्यात आला आणि त्याला बॅटल ड्रेस असे नाव देण्यात आले.
  • शेवटचा बदल 2005मध्ये, सरकारने CRPF आणि BSF च्या युनिफॉर्मसाठी आर्मी डीपी बॅटल ड्रेस वेगळे करण्यासाठी गणवेश बदलण्याचा निर्णय घेतला होता.

रेल्वेचं तिकीट महागणार :

  • भारतीय रेल्वेने घेतलेल्या एका निर्णयामुळे आता रेल्वे प्रवाशांसाठी प्रवास महागणार आहे.
  • रेल्वे स्थानकांच्या विकासाठी तसेच पुन:बांधणीसाठी रेल्वे प्रवाशांच्या खिशाला हात घालण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
  • रेल्वे स्थानकांच्या कामांसाठी लागणारा निधी आता टिकिटांवर अतिरिक्त पैसे आकारुन उभारला जाणार आहे.
  • तर या पैशांना स्टेशन डेव्हलपमेंट फी (Station Development Fee) असं नाव देण्यात आलं आहे.
  • प्रत्येक प्रवाशाकडून तो कोणत्या श्रेणीने प्रवास करत आहे यानुसार ही रक्कम किती असेल हे निश्चित केलं जाणार आहे.
  • सर्वासामान्यपणे वेगवेगळ्या श्रेणीमध्ये (म्हणजेच फर्स्ट क्लास, एसी क्लास) प्रवास करणाऱ्यांना प्रत्येक तिकीटामागे 10 ते 50 रुपये अतिरिक्त द्यावे लागणार आहेत.
  • तर हे शुल्क आकारण्यासंदर्भात रेल्वेने वेगवेगळे नियम निश्चित केले आहेत.

भारतीय क्रिकेटपटूला मागे सारत एजाज पटेलने जिंकला पुरस्कार :

  • आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) न्यूझीलंडचा मुंबईकर फिरकीपटू एजाज पटेलला डिसेंबर 2021 मधील सर्वोत्तम खेळाडू म्हणून सन्मान बहाल केला आहे.
  • तर एजाज पटेलने डिसेंबरमध्ये इतिहास रचला.
  • पटेलने वानखेडे स्टेडियमवर भारताविरुद्धच्या कसोटी सामन्याच्या एका डावात 10 बळी घेण्याची अप्रतिम कामगिरी केली.
  • तर ही कामगिरी करणारा तो जिम लेकर आणि अनिल कुंबळे यांच्यानंतरचा तिसरा गोलंदाज ठरला.
  • तसेच डिसेंबरमध्ये त्याने फक्त एकच कसोटी सामना खेळला, ज्यामध्ये त्याने 16.07च्या सरासरीने 14 बळी घेतले.
  • भारताचा कसोटी सलामीवीर मयंक अग्रवाल आणि ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क यांना डिसेंबर 2021 मधील कामगिरीसाठी नामांकन देण्यात आले होते.

केंद्र सरकार विकणार स्वस्त सोनं :

  • सॉवरेन गोल्ड बॉन्ड स्कीमचा 2021-22 चा नववा टप्पा आजपासून सुरु होणार आहे.
  • तर या योजनेअंतर्गत 10 जानेवारी ते 14 जानेवारीपर्यंत तुम्ही स्वस्तात सोने खरेदी करू शकता.
  • तसेच हे सोने तुम्हाला हातात मिळणार नाही. हे रोखे सर्व बँका, मान्यताप्राप्त स्टॉक एक्स्चेंज, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज लिमिटेड यांच्यामार्फत विकले जातील.
  • तर याचा लॉक-इन कालावधी पाच वर्षांचा असतो आणि 8 वर्षांनी मॅच्युअर होते.
  • जर तुम्हाला पाच वर्षानंतरच विकायचे असेल तर तुम्हाला दीर्घकालीन भांडवली नफा करानुसार 20.80 टक्के शुल्क भरावे लागेल.

दिनविशेष:

  • ज्ञानपीठ विजेते साहित्यिक वि.स. खांडेकर यांचा जन्म 11 जानेवारी 1898 मध्ये झाला होता.
  • गुलजारीलाल नंदा यांनी सन 1966 मध्ये भारताचे हंगामी पंतप्रधान म्हणून कार्यभार स्वीकारला होता.
  • सन 1972 मध्ये पूर्व पाकिस्तानचे बांगला देश असे नामकरण करण्यात आले.
  • क्रिकेटपटू खेळाडू द. ग्रेट इंडियन वॉल राहुल द्रविड यांचा जन्म 11 जानेवारी 1973 मध्ये झाला.
  • बुद्धिबळाच्या खेळात सन 1980 मध्ये नायजेल शॉर्ट वयाच्या 14व्या वर्षी जगातील सर्वात लहान ईंटरनॅशनल मास्टर झाला.
  • कमाल जमीनधारणा कायदा रद्द करणारा वटहुकूम केंद्र सरकारकडून सन 1999 मध्ये जारी झाला होता.
  • सन 2001 मध्ये एस.पी. भरुचा यांनी भारताचे 30वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.