11 January 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

11 January 2019 Current Affairs In Marathi

11 January 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (11 जानेवारी 2019)

मेरी कोम जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी:

  • नवी दिल्लीत झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय बॉक्सर मेरी कोम हिने 48 किलो वजनी गटात विजेतेपद मिळवले होते. या विजेतेपदाबरोबर जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सहा विजेतेपद पटकावण्याचा विक्रम तिने केला होता. Mary Kom
  • तर यानंतर सुपरमॉम मेरी कोम हिने भारतीयांना अभिमान वाटावी अशी आणखी एक कामगिरी केली आहे. मेरी कोम हिने जागितक बॉक्सिंग क्रमवारीत (AIBA) अव्वल स्थान पटकावले आहे.
  • कामगिरीत सातत्य राखल्यामुळे मेरी कोम हिने हा सन्मान मिळवला आहे. मेरीसाठी 2018 हे साल खूपच फलदायी ठरले. राष्ट्रकुल स्पर्धा आणि पोलंडमधील आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धा अशा दोनही स्पर्धांमध्ये तिने सुवर्णपदक पटकावले होते.
  • तसेच तिच्या पराक्रमी कामगिरीच्या जोरावर तिला नव्याने प्रसिद्ध करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग क्रमवारीत 700 गुणांसह 48 किलो वजनी गटातील अव्वल स्थान मिळाले आहे.

लघू उद्योगांना सरकारचा मोठा दिलासा:

  • निश्चलनीकरण आणि अप्रत्यक्ष कर अंमलबजावणीचा फटका बसलेल्या देशातील लघु उद्योगांना ऐन निवडणुकीच्या तोंडावर मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने केला. मात्र याचा फटका वित्तीय समतोलाचे आव्हान असलेल्या सरकारच्या तिजोरीलाही बसणार आहे.
  • वस्तू व सेवा कर प्रणालीकरिता (जीएसटी) नोंदणी व कर वजावटीसाठी उलाढाल मर्यादा दुपटीपर्यंत शिथिल करतानाच एक टक्का कर देणारी सध्याची वार्षिक उलाढाल मर्यादाही विस्तारण्यात आली आहे. याशिवाय केरळ राज्याला दोन वर्षांपर्यंत अतिरिक्त एक टक्का कर आकारणीस मुभा देण्यात आली आहे.
  • केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या वस्तू व सेवा कर परिषदेच्या 32व्या बैठकीतील झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी नव्या वित्त वर्षांच्या पहिल्या दिवसापासून होणार आहे. लघु उद्योजकांबाबत घेतलेल्या दोन सवलत निर्णयांमुळे सरकारला 8200 कोटी रुपयांचा फटका बसणार आहे.
  • वस्तू व सेवा करकरिता (जीएसटी) नोंदणी व कर भरण्यासाठी छोटय़ा व्यावसायिकांना असलेली सध्याची वार्षिक 20 लाख रुपयांची उलाढाल मर्यादा 40 लाख रुपये करण्यात आली आहे.
  • तर ईशान्येकडील छोटय़ा राज्यांसाठी असलेली याबाबतची मर्यादाही दुपटीने वाढवताना सध्याच्या वार्षिक 10 लाख रुपये उलाढीवरून 20 लाख रुपये करण्यात आली आहे.

महाराष्ट्र 57 पदकांसह अग्रस्थानी:

  • खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या मुला-मुलींनी चमकदार कामगिरी करत एकूण 15 सुवर्ण, 19 रौप्य आणि 23 कांस्य पदकांसह 57 पदकांची कमाई करीत आघाडी घेतली. महाराष्ट्राच्या खेळाडूंनी जिम्नॅस्टिक्स आणि अ‍ॅथलेटिक्समध्ये घवघवीत यश मिळवले. Khelo India
  • महाराष्ट्राच्या सौरभ रावतने 1500 मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक जिंकून अ‍ॅथलेटिक्समध्ये शानदार कामगिरी केली.
  • जिम्नॅस्टिक्समध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंनी पाच सुवर्ण, चार रौप्यपाच कांस्यपदकांची लयलूट केली.
  • कुस्तीमध्ये महाराष्ट्राच्या गोकुळ यादवरोहित अहिरे यांनी मुलांच्या विभागात तर भाग्यश्री फड हिने मुलींमध्ये रुपेरी कामगिरी केली.
  • महाराष्ट्राच्या प्रथम गुरवने 17 वर्षांखालील मुलांच्या 55 किलो गटात कांस्यपदक जिंकून उल्लेखनीय कामगिरी केली.
  • महाराष्ट्राच्या करीना शांक्ता, शेरॉन शाजूमिहिर आंब्रे यांनी सोनेरी वेध घेत जलतरणात चांगली कामगिरी केली.

नासाला सापडला पृथ्वीहून तिप्पट आकाराचा ग्रह:

  • नासाला आपल्या सूर्यमंडळाच्या बाहेर एक नवीन ग्रह सापडला आहे. नासाच्या ट्रांझिटींग एक्सोप्लॅनेट सर्वे सॅटेलाईट म्हणजेच TESS ने या ग्रहाचा शोध लावला आहे. हा नासाचा नवा टेलिस्कोप असून या नव्या ग्रहाचा शोध अनेक अर्थांनी महत्त्वाचा मानला जात आहे.
  • तर या ग्रहाला HD 21749b असे नाव देण्यात आले असून त्याचा आकार पृथ्वाच्या तिप्पट असल्याचे बोलले जात आहे. हा ग्रह पृथ्वीपासून 53 प्रकाशवर्ष दूर असून तो अतिशय थंड असल्याचे बोलले जात आहे. त्याचे तापमान 300 डीग्री फॅरेनहाईट असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. या ग्रहाला एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी 36 दिवस लागत असल्याचे बोलले जात आहे.
  • इतर ग्रहांवर असणाऱ्या जीवसृष्टीबाबत संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांसाठी हा शोध महत्त्वाचे यश मानले जात आहे. या ग्रहावर जीवसृष्टी असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सूर्यासारख्या प्रकाशमान ताऱ्याला प्रदक्षिणा घालणाऱ्या ग्रहांपैकी हा सर्वात थंड ग्रह असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. या ग्रहाला छोटा म्हटले जात असले तरीही पृथ्वीच्या तुलनेत हा ग्रह खूप मोठा आहे.

सीबीआय संचालक आलोक वर्मांची पदावरून बदली:

  • सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे तब्बल 77 दिवसांच्या खंडानंतर सीबीआय संचालक म्हणून परतलेले आलोक वर्मा यांची फेरनियुक्तीच्या दुसऱ्याच दिवशी हकालपट्टी करण्यात आली. त्रिसदस्यीय निवड समितीच्या बैठकीत बहुमताने हा निर्णय झाला. Alok-Verma
  • भ्रष्टाचाराच्या आरोपावरून ही कारवाई झाल्याचे सांगण्यात येते. केंद्रीय दक्षता आयोगाच्या (सीव्हीसी) अहवालाच्या आधारे ही कारवाई करण्यात आली असून एम. नागेश्वर राव यांच्याकडे पुन्हा सीबीआयची सूत्र सोपविण्यात आली आहेत. वर्मा यांची सीव्हीसीकडून सुरू असलेली चौकशीही कायम राहणार आहे.
  • निवड समितीत पंतप्रधान, सरन्यायाधीश आणि विरोधी पक्षनेते यांचा पदसिद्ध समावेश असतो. सरन्यायाधीश गोगोई यांनीच वर्मा यांना पदावर कायम करण्याचा निर्णय दिल्याने त्यांनी या बैठकीत आपल्याऐवजी न्या. ए.के. सिक्री यांना पाठविले होते.
  • तिसरे सदस्य काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी वर्मा यांची जोरदार पाठराखण केली आणि त्यामुळे बैठक अडीच तास लांबली, असे समजते. सिक्री यांनी मात्र सीव्हीसीचा अहवाल समाधानकारक असल्याचे सांगितले.

दिनविशेष:

  • ज्ञानपीठ विजेते साहित्यिक वि.स. खांडेकर यांचा जन्म 11 जानेवारी 1898 मध्ये झाला होता.
  • गुलजारीलाल नंदा यांनी सन 1966 मध्ये भारताचे हंगामी पंतप्रधान म्हणून कार्यभार स्वीकारला होता.
  • सन 1972 मध्ये पूर्व पाकिस्तानचे बांगला देश असे नामकरण करण्यात आले.
  • क्रिकेटपटू खेळाडू द. ग्रेट इंडियन वॉल राहुल द्रविड यांचा जन्म 11 जानेवारी 1973 मध्ये झाला.
  • बुद्धिबळाच्या खेळात सन 1980 मध्ये नायजेल शॉर्ट वयाच्या 14व्या वर्षी जगातील सर्वात लहान ईंटरनॅशनल मास्टर झाला.
  • कमाल जमीनधारणा कायदा रद्द करणारा वटहुकूम केंद्र सरकारकडून सन 1999 मध्ये जारी झाला होता.
  • सन 2001 मध्ये एस.पी. भरुचा यांनी भारताचे 30वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.