11 February 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

किसान क्रेडिट कार्ड
किसान क्रेडिट कार्ड

11 February 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (11 फेब्रुवरी 2020)

अ‍ॅट्रॉसिटीच्या प्रकरणात विनाचौकशी होणार गुन्हा दाखल :

  • अ‍ॅट्रॉसिटी प्रतिबंधक कायद्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं महत्त्वाचा निकाल दिला. अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात करण्यात येणारी दुरूस्ती घटनाबाह्य नसल्याचं सांगत सर्वोच्च न्यायालयानं कायद्याला हिरवा कंदील दाखवला आहे.
  • तर न्यायालयाच्या निकालामुळे अ‍ॅट्रॉसिटी प्रकरणात कोणत्याही चौकशीशिवाय गुन्हा दाखल करता येणार असून, आरोपीच्या अटकपूर्व जामिनाचा मार्गही बंद झाला आहे.
  • अ‍ॅट्रॉसिटी कायद्यासंदर्भात वाढत्या तक्रारीवर निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयानं कायद्यातील काही तरतूदी रद्द केल्या होत्या. 20 मार्च 2018 रोजी न्यायमूर्ती ए.के. गोयल, यू. यू.ललित यांच्या खंठपीठासमोर सुनावणी झाली होती.
  • तसेच आपल्या निकालात न्यायालयानं सबंधित प्रकरणात नियुक्त केलेल्या समिती अथवा वरिष्ठ पोलीस अधीक्षकांच्या परवानगीशिवाय अटक करता येणार नाही. त्याचबरोबर अ‍ॅट्रॉसिटीच्या संबंधित प्रकरणात गुन्हा दाखल करण्यापूर्वी चौकशी करण्यात यावी, असे निर्देश दिले होते.
  • त्यामुळे गुन्हा दाखल करण्यातील अडचणींबरोबरच आरोपींना जामिनाचा मार्ग मोकळा झाला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर केंद्र सरकारनं अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात पुन्हा दुरूस्ती केली होती.

LICपाठोपाठ ‘या’ सरकारी कंपनीची भागीदारी विकणार मोदी सरकार :

  • केंद्र सरकार आता आणखी एका सरकारी कंपनीचं खासगीकरण करणार आहे. एअर इंडिया, बीपीसीएल, भेलनंतर आता सरकार भारतीय स्टील प्राधिकरण लिमिटेड(सेल)मधली भागीदारी विकणार आहे.
  • तर या निर्गुंतवणुकीतून सरकारला 1 हजार कोटी रुपयांचा फायदा मिळण्याची आशा आहे. ही विक्री ऑफर फॉर सेल (ओएफएस)च्या माध्यमातून केली जाणार आहे.
  • तसेच या प्रक्रियेंतर्गत सरकारी कंपनीतील प्रमोटर्स स्वतःची भागीदारी सहजरीत्या गुंतवणूकदारांना विकू शकतात. ज्यात पारदर्शकतेवर विशेष लक्ष दिलं जातं.
  • गुंतवणूक आणि सार्वजनिक संपत्ती व्यवस्थापन विभागा(दीपम)च्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, स्टील मंत्रालय या निर्गुंतवणुकीसाठी सिंगापूर आणि हाँगकाँगमध्ये रोड शो करण्यासाठी तयार आहे.
  • सेलमध्ये सरकारची 75 टक्के भागीदारी आहे. सरकार देशातील दुसरी सर्वात मोठी पेट्रोलियम कंपनी असलेल्या भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल)चंही खासगीकरण करणार आहे.
  • तसेच अर्थसंकल्प 2020मध्येही केंद्र सरकार भारतीय जीवन विमा निगम (एलआयसी)मधली भागीदारी विकणार आहे.
    सरकारनं निर्गुंतवणुकीच्या माध्यमातून 1.05 लाख कोटी रुपये मिळवण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. परंतु हे लक्ष्य पूर्ण होण्याची सूतराम शक्यता नाही. अर्थसंकल्प 2020दरम्यान यात सुधारणा करून 65 हजार कोटी रुपये कमावण्याचं लक्ष्य ठेवलं आहे.
  • तर सद्यस्थितीत सरकारनं 35 हजार कोटी रुपये जमवलेले आहेत. आर्थिक वर्ष 2020 मध्ये 2.1 लाख कोटी रुपयांच्या निर्गुंतवणुकीचं सरकारचं टार्गेट आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आयपीओच्या माध्यमातून भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या LICची भागीदारी विकण्याचा प्रस्ताव ठेवलेला आहे.

ललिता एअरो इंजिनिअरिंग परीक्षेत राज्यात पहिली :

  • भाजीपाला विक्रेत्याच्या मुलीने एरोनॉटिकल इंजिनिअरिंगमध्ये राज्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळवला.
  • ललिताने एरोनॉटिकल अभियांत्रिकीमध्ये 9.7 गुण मिळवत राज्यात प्रथम क्रमांक मिळवला. विशेष म्हणजे गेट परीक्षेत तिने 707 गुण मिळवले आहेत.
  • तर नुकतेच 8 फेब्रुवारी रोजी विश्वैश्वरेय्या टेक्निकल विद्यापीठातून तिचा राज्यातील टॉपर म्हणून गोल्ड मेडलने गौरव करण्यात आला.

दक्षिण कोरियाचा ‘पॅरासाइट’ सर्वोत्कृष्ट चित्रपट :

  • सिनेपंडितांची पुरस्कारांबाबतची भाकिते खोटी ठरवत आणि हॉलीवूडमध्ये दशकांची कारकीर्द गाजविलेल्या दिग्दर्शकांच्या कलाकृतींना मागे सारत यंदा दक्षिण कोरियाच्या ‘पॅरासाइट’ चित्रपटाला सन्मानाचे सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे ऑस्कर जाहीर झाले.
  • तर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक या महत्त्वाच्या पुरस्कारावरही बोंग जून-हो यांनी आपले नाव कोरले. दक्षिण कोरियाच्या सिनेमाला ऑस्कर मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. सर्वोत्कृष्ट परभाषिक चित्रपटासाठीही पॅरासाइटचीच निवड करण्यात आली.
  • तसेच गेल्या वर्षी अल्फान्सो कुआरॉन यांच्या ‘रोमा’ चित्रपटाला तो केवळ बिगरइंग्रजी असल्यामुळे सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार नाकारल्यानंतर झालेल्या टीकेची भरपाई यंदा अ‍ॅकेडमीने केली.
  • अमेरिका, ब्रिटन सोडून अन्य देशातील चित्रपटास ऑस्कर मिळण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी 2012मध्ये फ्रान्सच्या ‘द आर्टिस्ट’ या मूकपटास सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा सन्मान मिळाला होता.
  • ऑस्कर अकादमीत यावेळी 842 चित्रपट उद्योग व्यावसायिकांना सदस्यत्वासाठी निमंत्रित केले होते त्यातील निमंत्रक हे 59 देशांतील होते. ज्युडी चित्रपटातील भूमिकेसाठी रेनेई झेलवेगर ही सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली. जोकर चित्रपटातील भूमिकेसाठी व्होकीन फिनिक्स याने उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार पटकावला.
  • तसेच ऑस्कर सोहळ्यासाठी यंदा कुणी अधिकृत सादरकर्ते (यजमान) नव्हते. रिगीना किंग यांनी वन्स अपॉन अ टाइम इन हॉलिवूड या चित्रपटासाठी ब्रॅड पीटला ऑस्कर प्रदान केले. सि ‘पॅरासाइट’ ही वर्गसंघर्षांची कथा आहे. या चित्रपटाचे प्रसारण थाटामाटात करण्यात आले नव्हते, ते नेहमीच्या चित्रपटगृहांमधून करण्यात आले.
  • तर या चित्रपटाने कुठलाही बडेजाव ठेवला नव्हता. या चित्रपटाला गोल्डन ग्लोब, बाफ्टा व स्क्रीन अ‍ॅक्टर गील्ड पुरस्कार मिळाले आहेत. जे वैश्विक प्रेम आणि प्रशंसा मिळाली ती पाहता या चित्रपटाला सवोत्कृष्ट चित्रपटाचे ऑस्कर देण्याचा मोह ऑस्कर निवड समितीलाही आवरला नाही. त्यामुळे परदेशी भाषेतील चित्रपटाला ऑस्कर मिळून रात्र ऐतिहासिक ठरली.

विवेक प्रसादला ‘उदयोन्मुख हॉकीपटू’चा पुरस्कार :

  • भारताचा विवेक सागर प्रसाद याची ‘2019 मधील उदयोन्मुख आंतरराष्ट्रीय हॉकीपटू’ पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
  • आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाकडून (एफआयएच) सोमवारी विवेकच्या नावाची घोषणा करण्यात आली.
  • विवेकला सर्व राष्ट्रीय संघटनांकडून 50 टक्के, प्रसारमाध्यमांकडून 23 टक्के, चाहत्यांकडून 15.1 टक्के मते मिळाली होती. विवेकने हे यश मिळवताना अर्जेटिनाचा मायको कॅसेला आणि ऑस्ट्रेलियाचा ब्लेक गोव्हर्स यांना मागे टाकले.
  • तर कॅसेला याला २२ टक्के मते आणि गोव्हर्सला 20.9 टक्के मते मिळाली.

‘आयसीसी’ युवा संघात यशस्वी, बिश्नोईला स्थान :

  • भारताला रविवारी विश्वविजेतेपदाने हुलकावणी दिली असली तरी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) सोमवारी जाहीर केलेल्या आपल्या 19 वर्षांखालील विश्वचषक संघात यशस्वी जैस्वाल, फिरकीपटू रवी बिश्नोई आणि वेगवान गोलंदाज कार्तिक त्यागी यांचा समावेश केला आहे.
  • तर विश्वचषक विजेता बांगलादेशचा कर्णधार अकबर अली याच्याकडेच आयसीसीच्या युवा संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे.
  • तसेच भारताला अंतिम फेरीत पोहोचवण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या यशस्वीला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्काराने गौरवण्यात आले होते. त्याने 133च्या सरासरीने सहा सामन्यांत 400 धावा फटकावल्या होत्या. सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत तो अग्रस्थानी होता.
  • बिश्नोईने अप्रतिम गोलंदाजीचे प्रदर्शन करत सहा सामन्यांत 17 बळी मिळवले. आपल्या वेगवान आणि स्विंग गोलंदाजीने प्रतिस्पर्धी फलंदाजांच्या मनात धडकी भरवणाऱ्या कार्तिक त्यागीने त्याला चांगली साथ देत 11 बळी टिपले होते. भारताला 19 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेचे
  • ‘आयसीसी’चा 19 वर्षांखालील विश्वचषकासाठीचा संघ: यशस्वी जैस्वाल (भारत), इब्राहिम झादरान (अफगाणिस्तान), रवींदू रसंता (श्रीलंका), महमुदुल हसन जॉय (बांगलादेश), शाहदात होसेन (बांगलादेश), नईम यंग (वेस्ट इंडिज), अकबर अली (बांगलादेश, कर्णधार), शफीकुल्ला गफार (बांगलादेश), रवी बिश्नोई (भारत), कार्तिक त्यागी (भारत), जेडन सील्स (वेस्ट इंडिज), अकिल कुमार (कॅनडा).

PM किसान सन्मान निधीतल्या लाभार्थ्यांना मिळणार किसान क्रेडिट कार्ड :

  • पंतप्रधान किसान सन्मान निधी योजने(PM-Kisan samman nidhi scheme)तल्या लाभार्थी शेतकऱ्यांना मोदी सरकार किसान क्रेडिट कार्डा(KCC)चा लाभ देणार आहे.
  • तर त्यामुळे शेतकऱ्यांना पीक कर्ज सहजरीत्या मिळणार आहे. जेणेकरून शेतकऱ्यांचं सावकरांकडून कर्ज घेण्यापासून परावृत्त करण्यात येणार आहे. तसेच शेतकऱ्यांची सावकारी जाचातून मुक्तता होणार आहे. 1.60 लाख रुपयांपर्यंत कर्ज घेतल्यास शेतकऱ्यांना कोणतीही हमी द्यावी लागणार नाही.
  • तसेच पहिल्यांदा ही मर्यादा 1 लाख रुपयांपर्यंत होती. अशा प्रकारे सरकारनं पीएम किसान योजनेला केसीसीशी लिंक केलं आहे. त्यामुळे पीएम किसान योजनेवर आता किसान क्रेडिट कार्डचाही फायदा मिळणार आहे.
  • बऱ्याचदा बँका शेतकऱ्यांना कर्ज देण्यास कचरतात. तसेच किसान क्रेडिट कार्ड तयार करण्यासाठी बँकांकडून अनेक अटी लादल्या जातात. त्यामुळे शेतकऱ्यालाही बँकांमधून किसान क्रेडिट कार्ड बनवणं कठीण जातं. त्याच पार्श्वभूमीवर मोदी सरकार आणि आरबीआयच्या आदेशानंतर बँक अधिकारी गावागावांत जाऊन कॅम्पच्या माध्यमातून केसीसी कार्ड कशा पद्धतीनं बनवता येईल, याचं मार्गदर्शन करत आहेत.
  • तर 41 टक्के लघु आणि सीमांत शेतकऱ्यांना अद्यापही कर्ज मिळत नसून ते किसान क्रेडिट कार्ड प्रणालीच्या बाहेर आहेत. अशातच सरकारनं नवा पर्याय उपलब्ध करून शेतकऱ्यांना केसीसी जोडण्याची योजना सुरू करून दिली आहे, अशी माहिती कृषी अर्थशास्त्री देविंदर शर्मा म्हणाले आहेत.
  • तसेच सर्वच स्तरावरून हे काम सुरू करण्यात आलं आहे. शेतकऱ्यांना दस्तावेज आणि पडताळणी केल्यानंतर दरवर्षी 6-6 हजार रुपये देत आहे.

न्यूझीलंडच्या महिला फलंदाजाचा विक्रम :

  • न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघानं सोमवारी दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघाविरुद्धच्या चौथ्या ट्वेंटी-20 सामन्यात विजय मिळवला. या विजयासह न्यूझीलंडनं 5 सामन्यांच्या मालिकेत 3-1 अशी विजयी आघाडी घेतली.
  • न्यूझीलंडच्या 2 बाद 172 धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण संघ 17 षटकांत 102 धावांवर माघारी परतला.
  • सोफी डेव्हीननं या सामन्यात दमदार शतकी खेळी करताना न्यूझीलंडच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला.
  • गोलंदाजीतही डेव्हीननं एक विकेट घेतली. न्यूझीलंडनं हा सामना 69 धावांनी जिंकला. या सामन्यात डेव्हीननं केलेला विक्रमाची नोंद ही आतापर्यंत पुरुष किंवा महिला खेळाडूला जमलेली नाही.
  • प्रथम फलंदाजी करताना डेव्हीन आणि लॉरेन डॉन यांना साजेशी सुरुवात करता आली नाही. लॉरेल (11) चौथ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर त्रिफळाचीत होऊन माघारी परतली. त्यानंतर डेव्हीन आणि सुझी बेट्स यांनी तुफान फटकेबाजी केली.
  • तर या दोघींनी दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. बेट्सनं 46 चेंडूंत 3 चौकारांसह 47 धावा केल्या. डेव्हीननं 65 चेंडूंत 12 चौकार व 3 षटकार खेचून 105 धावांची खेळी केली.

बांगलादेशवर ICC कारवाईच्या तयारीत :

  • दक्षिण आफ्रिकेत पार पडलेल्या 19 वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत बांगलादेशच्या संघाने भारतावर मात करत आपलं पहिलं विजेतेपद पटकावलं.
  • मात्र सामन्यानंतर दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये झालेल्या हमरीतुमरीमुळे बांगलादेशच्या विजयाला वेगळ वळण मिळालं. सामन्यात बाजी मारल्यानंतर बांगलादेशच्या सर्व खेळाडूंनी मैदानात येऊन जल्लोषाला सुरुवात केली.
  • यादरम्यान बांगलादेशच्या संघातील एका राखीव खेळाडूने भारतीय खेळाडूकडे पाहत काही आक्षेपार्ह वक्तव्य केलं. यावर भारतीय खेळाडूंनीही बांगलादेशी खेळाडूला प्रत्युत्तर दिलं.
  • ज्यामुळे काहीकाळ मैदानात दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये जुंपलेली पहायला मिळाली. दोन्ही पंचांनी वेळेत हस्तक्षेप केल्यामुळे हा वाद फारसा लांबला नाही.
  • आयसीसीनेही या घटनेची दखल घेतली असून व्हिडीओ फुटेज तपासल्यानंतर योग्य कारवाई केली जाणार असल्याचं आश्वासक सामनाधिकाऱ्यांकडून देण्यात आलेलं आहे.

दिनविशेष:

  • लंडन विद्यापीठाची स्थापना 11 फेब्रुवारी 1826 मध्ये झाली.
  • सन 1830 मध्ये मुंबईचे हंगामी राज्यपाल सर सिडने ब्रेकनिथ यांच्या अध्यक्षतेखाली सभा होऊन ऍग्री हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना झाली.
  • पोप पायस (11वा) आणि बेनिटो मुसोलिनी यांच्यात झालेल्या लॅटेरान ट्रिटी या विशेष करारानुसार व्हॅटिकन सिटी हे शहर सन 1929 मध्ये राष्ट्र इटालीतुन वेगळे करण्यात आले.
  • पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी सन 1979 मध्ये अंदमान निकोबार बेटावरील सेल्युलर जेल राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.