11 एप्रिल 2022 चालू घडामोडी – Current Affairs

11 April 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (11 एप्रिल 2022)

केंद्र सरकारच्या उत्कृष्ट जिल्हा परिषद पुरस्कारात कोल्हापूर अव्वल :

  • राष्ट्रीय पंचायतराज दिनाचे औचित्य साधत केंद्र सरकारने राष्ट्रीय पंचायत पुरस्कार जाहीर केले आहे.
  • तर यात दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार 2022 उत्कृष्ट जिल्हा परिषद पुरस्कारात कोल्हापूर जिल्हा परिषद अव्वल ठरली असून, पंचायत समिती पुरस्कारामध्ये राहता आणि मालवण पंचायत समित्यांची निवड करण्यात आली आहे.
  • त्याचबरोबर बालसुलभ ग्राम पंचायत पुरस्कार कोल्हापूर जिल्ह्यातील श्रुंगारवाडी ग्रामपंचायतीस आणि ग्राम पंचायत विकास आराखडा पुरस्कार अहमदनगरच्या लोहगाव या ग्रामपंचायतीला मिळाला आहे.
  • तसेच नानाजी देशमुख राष्ट्रीय गौरव ग्रामसभा पुरस्कार उस्मानाबादमधील भंडारवाडी या ग्रामपंचायतीला मिळाल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
  • दिनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार 2022 अंतर्गत उत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कारात 17 ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (10 एप्रिल 2022)

पाकिस्तानात आज पंतप्रधानांची निवड :

  • गेल्या काही दिवसांतील नाटय़मय राजकीय घडामोडीनंतर पाकिस्तानात रविवारी सत्तापालटावर शिक्कामोर्तब झाले.
  • पाकिस्तान मुस्लीम लीग-नवाझ पक्षाचे (पीएमएल-एन) अध्यक्ष शाहबाझ शरीफ यांनी रविवारी पंतप्रधानपदासाठी अर्ज दाखल केला.
  • तर दुसरीकडे अविश्वास ठराव मंजूर झाल्याने पंतप्रधानपदावरून पायउतार झालेल्या इम्रान खान यांनी, आपल्या समर्थकांना रस्त्यावर उतरण्याचे आवाहन करीत पुन्हा स्वातंत्र्याचा लढा सुरू झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.
  • पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची निवडणूक आज, सोमवारी होत आहे.
  • पाकिस्तानचे माजी अध्यक्ष आणि पाकिस्तान पीपल्स पार्टीचे (पीपीपी) सहअध्यक्ष असीफ अली झरदारी यांनी विरोधी आघाडीच्या संयुक्त बैठकीत शाहबाझ यांचे पंतप्रधानपदासाठी नाव सुचवले.
  • शाहबाझ हे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे धाकटे भाऊ आहेत.

कनिष्ठ विश्वचषक हॉकी स्पर्धात उपांत्य फेरीत भारताचा पराभव :

  • भारतीय महिला हॉकी संघाला ‘एफआयएच’ कनिष्ठ विश्वचषक हॉकी स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या सामन्यात रविवारी तीन वेळच्या विजेत्या नेदरलँड्सकडून 0-3 असा पराभव पत्करावा लागला.
  • त्यामुळे भारताचे पहिल्यांदा या स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्याचे स्वप्न अधुरेच राहिले.
  • भारतीय महिला संघाने 2013 च्या पर्वात कांस्यपदक जिंकले होते.
  • तर ही भारताची कनिष्ठ विश्वचषकातील सर्वोत्तम कामगिरी होती.
  • तसेच आता मंगळवारी भारतीय संघ कांस्यपदकाच्या लढतीत खेळेल.
  • नेदरलँड्सने मात्र आक्रमण आणि बचाव या दोन्हींत अप्रतिम खेळ करताना सलग चौथ्यांदा स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे.

वॉर्नरची तुफान फटकेबाजी, रचला ‘हा’ नवा विक्रम :

  • आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील कोलकाता आणि दिल्ली कॅपिट्लस यांच्यातील सामन्याला चांगलीच रंगत चढलीय.
  • तर या सामन्यात अगोदर फलंदाजीसाठी आलेल्या दिल्ली कॅपिटल्सने तुफान फटकेबाजी करत केकेआरच्या गोलंदाजांना घाम फोडला.
  • सलामीला आलेल्या देविड वॉर्नरने तर चौकार आणि षटकार लगावत या हंगामातील पहिले अर्धशतक झळकावले आहे.
  • विशेष म्हणजे या सामन्यात डेविड वॉर्नरने मोठा विक्रम नोंदवला असून आयपीएलच्या इतिहासात तो सर्वाधिक अर्धशतक झळकावणारा फलंदाज ठऱला आहे.
  • तर त्याच्या या खेळीमुळेच दिल्लीला 215 धावांपर्यंत मजल मारता आली.

दिनविशेष:

  • 11 एप्रिल हा ‘दिवस जागतिक पार्किन्सन दिन’ आहे.
  • कंपवाताचा मानवी मेंदूशी संबंध आहे हे सिद्ध करणारे शास्त्रज्ञ जेम्स पार्किन्सन यांचा जन्म 11 एप्रिल 1755 रोजी झाला.
  • श्रेष्ठ समाजसुधारक तसेच श्रमजीवी वर्गाच्या शोषणाची दास्याची मीमांसा करणारे क्रांतिकारक विचारवंत ज्योतीराव गोविंदराव फुले ऊर्फ महात्मा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 मध्ये झाला.
  • कस्तुरबा गांधी यांचा जन्म 11 एप्रिल 1869 मध्ये झाला होता.
  • सन 1919 मध्ये इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनची स्थापना झाली.
  • सन 1999 मध्ये अग्नी-2 या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी झाली
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (12 एप्रिल 2022)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.