11 April 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

11 April 2019 Current Affairs In Marathi

11 April 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (11 एप्रिल 2019)

मतदानासाठी ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरली जाणारी कागदपत्रे:

 • राज्यातील सात मतदार संघात आज (11 एप्रिल) लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान होत आहे.
 • मतदानासाठी निवडणूक आयोगाचे ओळखपत्र नसेल आणि मतदार यादीत नाव असेल तर मतदानासाठी ओळखपत्र म्हणून 11 कागदपत्रे ग्राह्य धरली जाणार आहेत. यात पासपोर्ट, वाहन चालक परवाना, वाहन चालक परवाना, छायाचित्र असलेले बँकांचे पासबूक यांचा समावेश आहे.
 • राज्यातील वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर आणि यवतमाळ-वाशिम या सात मतदार संघामध्ये मतदान होणार आहे.
 • पहिल्या टप्प्यात एकूण 116 उमेदवार असून 14 हजार 919 मतदान केंद्र आहेत. तर 1 कोटी 30 लाख 35 हजार मतदार मतदानाचा हक्क बजावतील.
 • राज्यात सर्वाधिक 30 उमेदवार नागपूर मतदार संघात असून सर्वात कमी 5 उमेदवार गडचिरोली-चिमूर मतदार संघात आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (10 एप्रिल 2019)

‘आरॉन’ची आंतरराष्ट्रीय ‘कान’ चित्रपट महोत्सवासाठी निवड:

 • कुठल्याही निर्मात्या दिग्दर्शकाला आपल्या चित्रपटाची निवड एखाद्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी व्हावी असे कायम वाटत असते. त्याची निवड प्रक्रिया अत्यंत कठीण असते हे सर्वश्रुत आहेच. Aaron
 • सर्वांचीच इच्छा पूर्ण होत नसली तरी ‘आरॉन’ या मराठी चित्रपटाच्या निर्मात्या-दिग्दर्शकांची इच्छा पूर्ण झाली आहे.
 • जागतिक चित्रपट क्षेत्रात सर्वात मनाच्या समजल्या जाणाऱ्या ‘कान’ (Cannes) आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘आरॉन’ ची वर्णी लागली आहे.
 • तर या प्रतिष्ठित महोत्सवासाठी महाराष्ट्र सरकारने 2018 मध्ये सेन्सॉरसंमत झालेल्या तीन चित्रपटांची घोषणा केली असून ‘दिठी’, ‘बंदिशाला’ व ‘आरॉन’ हे चित्रपट अधिकृतरित्या फ्रांसमधील ‘कान’ चित्रपट महोत्सवाचा भाग होतील.

भारतीय क्रिकेटपटूंचा ‘विस्डन’कडून गौरव:

 • भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि महिला संघाची महत्वाची खेळाडू स्मृती मंधाना यांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. Virat-Smriti-Mandhana
 • ‘विस्डन’कडून विराट आणि स्मृतीचा सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून गौरव करण्यात आला आहे. याव्यतिरीक्त अफगाणिस्तानचा उदयोनमुख खेळाडू राशिद खानला, सलग दुसऱ्यांदा टी-20 क्रिकेटमधली सर्वोत्तम खेळाडूचा किताब देण्यात आला आहे.
 • ‘विस्डन क्रिकेटर ऑफ दी इयर’ पुरस्कारासाठी निवडलेल्या पाच खेळाडूंमध्येही कोहलीने स्थान पटकावले आहे. त्याच्यासह पाच खेळाडूंत टॅमी बेमाँट, जोस बटलर, सॅम कुरन आणि रॉरी बर्न्स यांचा समावेश आहे.
 • सन 1881 पासून विस्डन क्रिकेट पुरस्कार दिला जातो. कोहलीला सलग तिसऱ्यांदा हा पुरस्कार मिळणार आहे. त्याने तीनही प्रकारात एकूण 2735 गुणांची कमाई केली आहे.
 • महिला क्रिकेटपटूंत मानधनाची कामगिरी उल्लेखनीय झाली आहे. तिने 2018 मध्ये वन डे व टी-20 क्रिकेटमध्ये अनुक्रमे 669 व 662 धावा केल्या आहेत.

भारतीय लष्कराचे सामर्थ्य आणखी वाढणार:

 • भारताच्या ताफ्यात लवकरच T-90 MS रणगाडे दाखल होणार आहेत. भारताने रशियाकडून T-90 MS बनावटीचे 464 रणगाडे खरेदी करण्यास मंजुरी दिली आहे. यासाठी केंद्राने 13,500 कोटींच्या या संरक्षण व्यवहाराला मान्यता दिली आहे. T-90 MS
 • T-90 MS रणगाडे हे रात्रीच्या अंधारातही शत्रूला अचूक हेरून हल्ला करू शकतात.T-90MS रणगाडे एका जागेहून दुसऱ्या जागी सहजगत्या नेता येतात.
 • भारताकडे सध्या T-90 या प्रकारातले जवळपास 1650 रणगाडे आहेत. नवे रणगाडे आल्यानंतर ही संख्या 2 हजारांवर जाणार आहे.
 • भारताच्या लष्करात T-90 आणि T-72 हे दोन प्रकारचे रणगाडे असून, मेक इन इंडियांतर्गत नवे रणगाडे बनवण्यासाठी भारत प्रयत्नशील आहे.
 • रशियाकडून खरेदी करण्यात येणारे रणगाडे हे T-90 या प्रकारातलेच अद्ययावत करण्यात आलेले रणगाडे असणार आहेत.

लोगन ठरला ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’चा मानकरी:

 • एखाद्या व्यक्तिरेखेमुळे एखादा कलाकार मोठा होतो किंवा एखादा कलाकार एखाद्या व्यक्तिरेखेला मोठा करतो. उदा. ‘स्पायडरमॅन’ या व्यक्तिरेखेमुळे अभिनेता टॉम हॉलंडला प्रसिद्धी मिळाली. तर याच्या बरोबर उलट रॉबर्ट डाउनी ज्युनिअरमुळे ‘आयर्नमॅन’ ही व्यक्तिरेखा लोकप्रिय झाली.
 • परंतु, ‘वुल्वरिन’ ही जितकी प्रभावी व्यक्तिरेखा आहे तितकीच ती साकारणारा ह्यू जॅकमनही त्याच ताकदीचा अभिनेता आहे. त्यामुळे ते दोघेही एकमेकांत एकरूप झालेले दिसतात.
 • एक्स-मॅन सुपरहिरोपट मालिकेतील ‘वुल्वरिन’ जगातील सर्वात लोकप्रिय व्यक्तिरेखांपैकी एक म्हणून ओळखला जातो. इतकी अफाट लोकप्रियता मिळवणाऱ्या या ‘वुल्वरिन’चा ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे.
 • अद्वितीय किंवा विलक्षण विक्रम करणाऱ्या व्यक्तिंना हा पुरस्कार देण्यात येतो. तब्बल 6 हजार 570 दिवस म्हणजेच सलग 18 वर्ष वुल्वरिन ही व्यक्तिरेखा साकारल्यामुळे अभिनेता ह्यू जॅकमनला ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ या पुरस्काराने गौरवण्यात आले.

दिनविशेष:

 • 11 एप्रिल हा ‘दिवस जागतिक पार्किन्सन दिन’ आहे.
 • कंपवाताचा मानवी मेंदूशी संबंध आहे हे सिद्ध करणारे शास्त्रज्ञ जेम्स पार्किन्सन यांचा जन्म 11 एप्रिल 1755 रोजी झाला.
 • श्रेष्ठ समाजसुधारक तसेच श्रमजीवी वर्गाच्या शोषणाची दास्याची मीमांसा करणारे क्रांतिकारक विचारवंत ज्योतीराव गोविंदराव फुले ऊर्फ महात्मा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 मध्ये झाला.
 • कस्तुरबा गांधी यांचा जन्म 11 एप्रिल 1869 मध्ये झाला होता.
 • सन 1919 मध्ये इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनची स्थापना झाली.
 • सन 1999 मध्ये अग्नी-2 या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी झाली.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (12 एप्रिल 2019)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.