10 सप्टेंबर 2021 चालू घडामोडी – Current Affairs

‘इमर्जन्सी लँडिंग स्ट्रीप’
‘इमर्जन्सी लँडिंग स्ट्रीप’

10 September 2021 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (10 सप्टेंबर 2021)

हवाई दलाच्या विमानांसाठी ‘इमर्जन्सी लँडिंग स्ट्रीप’:

 • राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 925 वरील सट्टा- गंधव खंडावर भारतीय हवाई दलाच्या विमानांना आपत्कालीन परिस्थितीत उतरण्यासाठी ‘इमर्जन्सी लँडिंग स्ट्रीप’ चे उद्घाटन केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह व नितीन गडकरी यांनी केले.
 • तर या दोन मंत्र्यांसह संरक्षण दले प्रमुख जनरल बिपिन रावत यांना घेऊन भारतीय हवाई दलाचे हक्र्युलस सी-130 जे विमानाने या राष्ट्रीय महामार्गावर आपत्कालीन लँडिंग केले.
 • तसेच यामुळे एनएच-925 हा हवाई दलाच्या विमानांच्या आपत्कालीन लँडिंगसाठी वापरला जाणारा पहिला राष्ट्रीय महामार्ग ठरला आहे.
 • तर सुखोई-30 एमकेआय लढाऊ विमानाने या ठिकाणी प्रतिरूप आपत्कालीन लँडिंग केले.
 • बाडमेरप्रमाणेच एकूण 20 आपत्कालीन लँडिंग धावपट्ट्या सध्या देशभरात विकसित करण्यात येत आहेत, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी त्यांच्या भाषणात सांगितले.

जगातील सर्वात शक्तिशाली अवकाश दुर्बिण लाँच करण्याची तारीख जाहीर :

 • अवकाशात दुरवर बघण्याची आणि विश्वातील पहिल्या दीर्घिकेच्या निर्मितीचे गूढ उलगडून दाखवण्याची अफाट क्षमता असलेली सर्वात शक्तिशाली अवकाश दुर्बिण ‘जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप’च्या प्रेक्षपणाची, अवकाशात पाठवण्याची तारीख अखेर नासाने जाहीर केली आहे.
 • तर येत्या 18 डिसेंबरला सुमारे 6.5 टन वजनाची अवकाश दुर्बिण दक्षिण अमेरिकेतील फ्रान्स देशाच्या फ्रेंच गयाना या तळावरुन युरोपियन स्पेस एजन्सीच्या एरियन -5 या शक्तीशाली प्रक्षेपकाच्या सहाय्याने प्रक्षेपित केली जाणार आहे.
 • नासा, युरोपियन स्पेस एजन्सी आणि कॅनडा स्पेस एजन्सी यांनी संयुक्तरित्या या अवकाश दुर्बिणीची निर्मिती केली आहे.
 • तर एका टेनिस कोर्टच्या पसाऱ्याएवढा या दुर्बिणीता विस्तार असून 18 छोट्या षटकोनी आरशांपासून बनवलेली 6.5 मीटर व्यासाची, सोन्याचा मुलामा असलेली बेरेलियम धातुने तयार केलेली भव्य लेन्स या दुर्बिणीत असणार आहे.
 • व्हीजीबल, इन्फ्रोरेड आणि अल्ट्राव्हालेट अशा तीन प्रमुख तरंग लांबीच्या माध्यमातून अवकाशाचा वेध ‘जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप’घेणार आहे.
 • तसेच या दुर्बिणीमुळे अवकाशातील अनेक रहस्या्चा उलगडा होणार असून विश्व निर्मितीबाबत आणखी माहिती मिळण्यास मदत होणार आहे.
 • पृथ्वीभोवती प्रदक्षिण घालणारी प्रसिद्ध अवकाश दुर्बिण ‘हबल’चे काम जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप आणखी पुढे नेणार आहे.

फोर्ड कंपनीचा भारतातील वाहन उत्पादन बंद करण्याचा निर्णय :

 • अमेरिकेची वाहनं बनवणारी प्रमुख कंपनी फोर्ड मोटर भारतातील आपला गाशा गुंडाळणार असल्याची माहिती समोर येत आहे.
 • देशात सुरु असलेले दोन्ही कारखाने बंद करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे.
 • भारतात गेल्या काही दिवसात फोर्ड वाहनांच्या विक्रीत घट झाली आहे.
 • तर त्याचबरोबर कंपनीने वाहनांचं नवं मॉडेलदेखील लॉन्च केलेलं नाही. त्यामुळे दोन्ही कारखाने तोट्यात असल्याचं कारण सूत्रांनी रॉयटर्स या वृत्तसंस्थेला दिलं आहे.

जिओ देशभरात उभारणार इलेक्ट्रिक वेहिकल्ससाठी चार्जिंगचं नेटवर्क :

 • रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि बीपी यांच्या संयुक्त उपक्रमातून व्यावसायिक स्तरावर इलेक्ट्रिक वेहिकल्ससाठी चार्जिंग स्टेशनचे जाळे उभारण्यासाठी ब्लूस्मार्टसोबत भागीदारीची घोषणा केली आहे.
 • ब्लूस्मार्ट हे भारतातील पहिले आणि सर्वात मोठे ऑल-इलेक्ट्रिक, राइड-हेलिंग प्लॅटफॉर्म आहे. या अंतर्गत जिओ-बीपी देशभरातील प्रवासी इलेक्ट्रिक वाहने आणि ताफ्यांसाठी ही स्थानके उभारणार आहे.
 • ब्लूस्मार्ट, त्याच्या सर्व-इलेक्ट्रिक फ्लीटद्वारे, दिल्ली एनसीआरमध्ये विश्वसनीय, झिरो सर्ज आणि झिरो टेलपाईप उत्सर्जन राइड-हेलिंग सेवा प्रदान करत आहे.
 • इलेक्ट्रिक वाहनांचा सर्वात मोठा ताफा चालवणाऱ्या ब्लूस्मार्टचे लक्ष्य भारतातील इतर प्रमुख शहरांमध्ये आपले नेटवर्क वाढवण्याचे आहे.
 • भागीदारीद्वारे, दोन्ही कंपन्या ब्लूस्मार्ट कार्यरत असलेल्या शहरांमध्ये योग्य ठिकाणी ईव्ही चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरचे नियोजन, विकास आणि ऑपरेशनमध्ये सहकार्य करतील.
 • दिल्लीमध्ये पहिल्या टप्प्यातील रोलआउटसह, हे ईव्ही चार्जिंग स्टेशनच्या प्रत्येक स्टेशनवर किमान 30 वाहने बसविण्यास सक्षम असतील.

ऑलिम्पियाड बुद्धिबळ स्पर्धात दुसऱ्या दिवसावरही भारताचे वर्चस्व :

 • संयुक्त गतविजेत्या भारतीय संघाने ‘फिडे’ ऑलिम्पियाड ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशीही वर्चस्वपूर्ण कामगिरी करताना तीन विजयांची नोंद केली.
 • अव्वल विभागातील ‘ब’ गटात समावेश असलेल्या भारताने गुरुवारी अनुक्रमे शेनझेन चायना, अझरबैजान आणि बेलारूस या संघांना धूळ चारली.
 • गुरुवारी झालेल्या चौथ्या फेरीत भारताने शेनझेन चायनाचा 5-1 असा धुव्वा उडवला. पी. हरिकृष्ण, बी. अधिबान, भक्ती कुलकर्णी, निहाल सरिन, आर. वैशाली यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर अशी मात केली.
 • तर कोनेरू हम्पीने मात्र पराभव पत्करला.

दिनविशेष :

 • 10 सप्टेंबर हा दिवस जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन आहे.
 • कसोटी क्रिकेट खेळाडू व महाराजा के.एस. रणजितसिंह यांचा जन्म 10 सप्टेंबर 1872 मध्ये झाला. तसेच यांच्या स्मरणार्थ 1934 पासून रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा होतात.
 • स्वातंत्र्यसैनिक, भारताचे दुसरे गृहमंत्री व उत्तर प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री गोविंद वल्लभ पंत यांचा जन्म 10 सप्टेंबर 1887 मध्ये झाला.
 • सन 1966 मध्ये पंजाब राज्याचे विभाजन होऊन पंजाब व हरियाणा अशी दोन राज्ये अस्तित्वात आली.
 • सन 2002 मध्ये परंपरेने तटस्थ देश स्वित्झर्लंड देश युनायटेड नेशन्समध्ये सामील झाला.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.