10 September 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

10 September 2018 Current Affairs In Marathi

10 September 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (10 सप्टेंबर 2018)

अंकुर मित्तलचा डबल ट्रॅप नेमबाजीत सुवर्णपदक:

  • जागतिक नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय नेमबाजांची धडाकेबाज कामगिरी सुरुच आहे. भारताच्या अंकुर मित्तलने डबल ट्रॅप नेमबाजीत सुवर्णपदकाची कमाई केली आहे. Ankur Mittal
  • 150 पैकी 140 गुणांची कमाई करत अंकुरने सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. स्लोवाकिया आणि चीनच्या प्रतिस्पर्धी खेळाडूने अंकुरला चांगलीच टक्कर दिली, मात्र शूटऑफमध्ये बाजी मारत अंकुरने अव्वल स्थान कायम राखले. याचसोबत अंकुरने सांघिक प्रकारात शार्दुल विहान आणि मोहम्मद असबसोबत कांस्यपदकाची कमाई केली.
  • महिलांमध्ये अंजुम मुद्गील मात्र 50 मी. रायफल थ्री पोजीशन प्रकारात पदकांच्या शर्यतीमधून बाहेर गेली. याचसोबत 25 मी. पिस्तुल प्रकारात भारताची मनू भाकेर दहाव्या स्थानावर फेकली गेली. आतापर्यंत या स्पर्धेतून भारताच्या दोन खेळाडूंनी ऑलिम्पिकचा कोटा मिळवला आहे.

2022 पर्यंत नवभारताची निर्मिती:

  • सन 2022 पर्यंत ‘नवभारता’ची निर्मिती करण्याचा निर्धार भाजपने केला आहे. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी 9 सप्टेंबर रोजी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत मांडलेल्या या राजकीय ठरावाला मंजुरी देण्यात आली.
  • भाजपच्या दृष्टीने हा नवाभारत गरिबीमुक्त, भ्रष्टाचारमुक्त, दहशतवादमुक्त, जातिवादमुक्त असेल! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे द्रष्टे नेतृत्व देशाला लाभलेले आहे. त्यांचा विकासाचा दृष्टिकोन, सरकारची नीती आणि त्याची अंमलबजावणी यातून हा नवभारत साकार होण्याचा संकल्प भाजपने व्यक्त केला आहे.
  • या राजकीय ठरावाची माहिती देताना केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले की, गेल्या चार वर्षांत मोदी सरकारच्या कल्याणकारी योजनेत लोकांचा थेट सहभाग राहिलेला आहे. लोक नवनवे प्रयोग करत आहेत. त्यातून विकासाला नवी दिशा मिळाली आहे. पण विरोधक मात्र मोदी रोको आंदोलन चालवत आहेत.
  • विरोधकांचा हा विचार पूर्ण नकारात्मक असून जनता त्यांना प्रतिसाद देणार नाही. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला हरवण्याचे विरोधक निव्वळ स्वप्न बघत आहे. विरोधकांकडे ना नेता, ना नीती, ना रणनीती आहे. विरोधक हताश झालेला आहे.

महिलांच्या सुरक्षेसाठी कोटींच्या योजना मंजूर:

  • दिवसेंदिवस समाजात महिला असुरक्षित होत असताना आता केंद्रीय गृह मंत्रालयाने तीन हजार कोटींच्या नवीन उपाययोजना मंजूर केल्या असून त्यात दिल्लीसह आठ प्रमुख शहरांत सार्वजनिक धोक्याचे बटन, सर्व महिला असलेल्या पोलिस पथकांची गस्त या उपायांचा समावेश आहे.
  • महिला व मुलांसाठी प्रवासी प्रसाधनगृहे, स्मार्ट एलइडी पथदिवे, एकखिडकी तक्रार केंद्रे, न्यायवैद्यक व सायबर गुन्हे विभाग यांचा समावेश महिला शहर सुरक्षा प्रकल्पात करण्यात आला आहे. ही योजना दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, बंगळुरु, हैदराबाद, अहमदाबाद व लखनौ या शहरांमध्ये 2018-19 ते 2020-21 दरम्यान लागू करण्यात येईल, असे गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. Rape Sexual Abuse
  • सुरक्षित शहर प्रस्तावासाठी 2919.55 कोटी रुपये निर्भया निधीतून मंजूर करण्यात आले आहेत. निर्भया निधीची स्थापना 2013 मध्ये करण्यात आली होती. त्याचा हेतू महिलांची सुरक्षा हाच होता.
  • तसेच यात महिला पोलिसांची गस्ती पथके ‘शी टीम’ नावाने काम करतील तर अभयम व्हॅन महिलांच्या तक्रारीला लगेच प्रतिसाद देतील. सीसीटीव्ही कॅमेरे, एलइडी लाइट सुविधा, सार्वजनिक धोक्याचे बटन, समुपदेशकांची सेवा या सोयी दिल्या जाणार असून एकाच ठिकाणी न्यायवैद्यक व सायबर गुन्हे कक्षासह सर्व सेवा देण्यात येणार आहेत. तेथेच तक्रार नोंदवली जाईल. जीआयएस पद्धतीने गुन्ह्य़ांची केंद्रे नेमकी कोणती आहेत हे ठरवले जाईल.

IAAF च्या स्पर्धेत अरपिंदर सिंहची ऐतिहासिक ‘तिहेरी उडी’:

  • IAAFच्या कॉंटिनेंटल कप स्पर्धेत 9 सप्टेंबरला भारताकडून अरपिंदर सिंहने कांस्यपदकाची कमाई केली. विशेष म्हणजे या स्पर्धेत पदक जिंकणारा तो पहिलाच भारतीय खेळाडू ठरला.
  • झेक प्रजासत्ताक येथील ऑस्ट्राव्हा येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत अरपींदरने तिहेरी उडीत कांस्यपदक जिंकले. त्याने 16.59 मीटरची तिहेरी उडी घेत कांस्यपदकावर आपले नाव कोरले.
  • या आधी त्याने अरपिंदरने इंडोनेशियात झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये अकराव्या दिवशी अखेरच्या सत्रात भारताच्या खात्यात सुवर्णपदकाची भर घातली होती. या स्पर्धेतील ते भारताचे 10वे सुवर्णपदक होते.
  • याच प्रकारात भारताचा राकेश बाबुही अंतिम फेरीत दाखल झाला होता, मात्र पदकांच्या शर्यतीत आपलंले आव्हान कायम राखणे त्याला जमले नाही. तसेच अरपिंदरने 2014च्या राष्ट्रकुल स्पर्धेतही कांस्यपदक पटकावले होते.

हॉंगकॉंगविरुद्ध भारताची एकदिवसीय लढत अधिकृत:

  • आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत भारताची होणारी हॉंगकॉंगविरुद्धची सलामीची लढत अधिकृत धरण्याचा निर्णय आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) घेतला आहे.  ही स्पर्धा 15 सप्टेंबरपासून दुबईत सुरू होणार आहे.
  • हॉंगकॉंगने पात्रता फेरी जिंकून या स्पर्धेत प्रवेश मिळविला आहे. भारत आणि पाकिस्तानसह त्यांचा एका गटात समावेश करण्यात आला आहे. हॉंगकॉंग अजूनही आयसीसीचे सहयोगी सदस्य आहेत. त्यांना अजून एकदिवसीय सामने खेळण्याचा दर्जा मिळालेला नाही. ICC
  • सहयोगी सदस्य पात्रता स्पर्धेतून मुख्य स्पर्धेत खेळू शकतो. पण, अशा वेळी त्यांच्या सामन्याला अधिकृत दर्जा मिळत नाही, असा आयसीसीचा नियम आहे. या वेळी मात्र हा नियम अपवाद ठरला आहे. यापूर्वी महिलांच्या टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धेत भारत वि. थायलंड ही लढत अधिकृत धरण्यात आली नव्हती.
  • आयसीसीने या वेळी हा नियम बाजूला ठेवून हॉंगकॉंगच्या भारत आणि पाकिस्तानविरुद्धच्या दोन्ही सामन्यांना अधिकृत मानण्यास परवानगी दिली आहे. ‘बीसीसीआय’सह आशियाई क्रिकेट समितीने या संदर्भात आयसीसीकडे विनंती केली होती. त्या विनंतीवर विचार करताना ‘आयसीसी’ने हा निर्णय घेतला आहे.

दिनविशेष:

  • 10 सप्टेंबर हा दिवस जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन आहे.
  • कसोटी क्रिकेट खेळाडूमहाराजा के.एस. रणजितसिंह यांचा जन्म 10 सप्टेंबर 1872 मध्ये झाला. तसेच यांच्या स्मरणार्थ 1934 पासून रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा होतात.
  • स्वातंत्र्यसैनिक, भारताचे दुसरे गृहमंत्रीउत्तर प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री गोविंद वल्लभ पंत यांचा जन्म 10 सप्टेंबर 1887 मध्ये झाला.
  • सन 1966 मध्ये पंजाब राज्याचे विभाजन होऊन पंजाब व हरियाणा अशी दोन राज्ये अस्तित्वात आली.
  • सन 2002 मध्ये परंपरेने तटस्थ देश स्वित्झर्लंड देश युनायटेड नेशन्समध्ये सामील झाला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.