Complete Guidance For MPSC Exams, Current Affairs, Rajyaseva, PSI, STI Exams, Job Alerts 2020

10 November 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

डॉक्टर विवेक मूर्ती
डॉक्टर विवेक मूर्ती

10 November 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (10 नोव्हेंबर 2020)

बायडेन यांचा पहिला निर्णय Covid Task Force स्थापन :

 • अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन व उप राष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांनी सोमवारी अमेरिकेतील करोना संदर्भातील टास्क फोर्सची निर्मिती केली.
 • तर विशेष म्हणजे या टास्क फोर्सचे नेतृत्व करण्यासाठी नेमण्यात आलेल्या तीन सह अध्यक्षांमध्ये एका भारतीय वंशाच्या समावेश आहे.
 • करोना टास्क फोर्सचे नेतृत्व करण्याची जबाबदारी तीन सह अध्यक्षांवर असणार आहे. ज्यामध्ये डॉक्टर विवेक मूर्ती यांच्यासह येल विद्यापीठातील औषधी विभागाचे सहयोगी प्राध्यापक मार्सेला नुनेझ-स्मिथ व अन्न व औषध प्रशासन विभागचे माजी आयुक्त डेव्हिड केसलर यांचा समावेश आहे.
 • तसेच करोना टास्क फोर्समधील 13 सदस्यांच्या नावांची घोषणा आज करण्यात आली आहे. यामध्ये प्रख्यात आरोग्य तज्ज्ञांचा समावेश आहे.

‘फायझर’ची करोना लस 90 टक्के परिणामकारक :

 • जगभर आतापर्यंत सुमारे 10 लाख लोकांचा बळी घेणाऱ्या करोना विषाणूच्या प्रतिबंधाबाबत दिलासादायक माहिती फायझर कंपनीने सोमवारी दिली. कंपनीने तयार केलेली लस 90 टक्के परिणामकारक ठरू शकते, असे कंपनीने सांगितले.
 • तसेच फायझर आणि तिची जर्मन सहयोगी कंपनी बायोएनटेक यांनी ही लस संयुक्तपणे तयार केली आहे. ती 90 टक्के परिणामकारक ठरू शकेल, असे प्राथमिक निष्कर्ष असल्याचे फायझर कंपनीने सांगितले.
 • तर लशीचा उपयोग 16 ते 85 वयोगटातील लोकांवर तातडीने करण्यासाठी या महिनाअखेरीस अमेरिकेच्या नियंत्रकांकडे अर्ज करण्याचे संकेतही कंपनीने दिले आहेत.

केंद्रीय कार्यालयांत मराठी भाषा आता सक्तीची :

 • केंद्र शासनाच्या सर्व कार्यालयांत इंग्रजी व हिंदीबरोबरच स्थानिक भाषा म्हणजेच मराठी भाषेचा वापर करणे बंधनकारक केले आहे.
 • तर ते न करणारे कार्यालय जिल्ह्यात आढळल्यास त्याच्या प्रमुखास निमंत्रक करून त्यास पालकमंत्री, लोकप्रतिनिधी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी मराठीचा वापर करण्यास प्राधान्य देण्याचे लक्षात आणून देणे आवश्यक आहे.
 • तसेच यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दर तीन महिन्यांनी भाषा संचालनालयास अहवाल देण्याचे आदेश राज्य शासनाने 6 नोव्हेंबर रोजी जारी केले आहेत.
 • राज्यातील केंद्र शासनाच्या राजभाषा विभागाने हिंदी व इंग्रजीबरोबर प्रादेशिक मराठी भाषेचा वापर प्राधान्याने करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
 • यानुसार, राज्यासह जिल्ह्यातील केंद्रीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका, विमा कंपन्या, रेल्वे तसेच अन्य केंद्रीय आस्थापनांच्या कार्यालयांत मराठी भाषेचा वापर करण्यात येतो यावर लक्ष केंद्रित करून अहवाल तयार करण्याच्या कामासाठी जिल्हा व तालुका स्तरावर गट-ब च्या दर्जापेक्षा कमी नाही अशा अधिकाऱ्यांमधून एका समन्वय अधिकाऱ्याची नेमणूक आदेशही आता जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त झाले आहेत.

इस्कॉनला मिळाला ग्रीन चॅम्पियन पुरस्कार :

 • ग्रीन बिल्डिंग काँग्रेसच्या नुकत्याच आयोजित झालेल्या अठराव्या आवृत्तीत इस्कॉनला यंदाचा ग्रीन चॅम्पियनशिप पुरस्कार जाहीर झाला आहे.
 • जनतेला निसर्गाविषयी संवेदनशील बनविण्यासाठी सतत अग्रणी राहिल्याने इस्कॉन या संस्थेला हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
 • तर इस्कॉन गोवर्धन इकोव्हिलेजचे संचालक गौरंगा दास यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
 • तसेच यावेळी ते म्हणाले की येत्या काळात इस्कॉनच्या वतीने भक्तिवेदांत संशोधन केंद्राच्या विद्यापीठाची रचना व बांधकाम ग्रीन कॅम्पस या संकल्पनेवर आधारित करण्यात येणार आहे. इस्कॉनची जगभरातील 700 मंदिरं उपासनेची ग्रीन केंद्रे म्हणून विकसित करण्यात येणार आहेत. यासाठी इस्कॉनची आंतरराष्ट्रीय ग्रीन कमिटी आयजीबीसीबरोबर कार्यरत आहे.

दिनविशेष :

 • 10 नोव्हेंबरजागतिक विज्ञान दिन
 • 10 नोव्हेंबर 1659 शिवाजी महाराजांनी प्रतापगड येथे अफझलखानाचा वध केला.
 • ईस्ट इंडिया कंपनीने कलकत्ता बंदर स्थानिक राजाकडून 10 नोव्हेंबर 1698 मध्ये विकत घेतले.
 • 10 नोव्हेंबर 1990 मध्ये भारताचे 8 वे पंतप्रधान म्हणून चंद्रशेखर यांनी सूत्रे हाती घेतली.
 • भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक राष्ट्रगुरू सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांचा जन्म 10 नोव्हेंबर 1848 मध्ये झाला.
You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC World