10 जून 2022 चालू घडामोडी – Current Affairs
10 June 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (10 जून 2022)
राष्ट्रपती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर :
- भारतीय निवडणूक आयोगाने राष्ट्रपती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
- मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली.
- यानुसार, राष्ट्रपती निवडणूक 18 जुलै रोजी होईल.
- तर या निवडणुकीत यंदा एकूण 4,809 जण मतदान करतील.
- विशेष म्हणजे कोणत्याही पक्षाला या निवडणुकीसाठी व्हिप जारी करता येणार नाहीये.
- विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपत आहे.
- या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती निवडणुकीसाठी 18 जुलै रोजी मतदान होईल आणि 21 जुलै रोजी मतमोजणी पार पडेल.
Must Read (नक्की वाचा):
खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धात आठ पदकांची कमाई :
- महाराष्ट्राच्या खेळाडूंनी खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत ॲथलेटिक्समध्ये तीन सुवर्ण, एक रौप्यपदक तर, जलतरणात दोन सुवर्ण आणि दोन कांस्यपदके मिळवली.
- महाराष्ट्राच्या पदकांमध्ये गुरुवारी पाच सुवर्ण, एक रौप्य व दोन कांस्यपदकांची भर पडली.
- परंतु हरयाणा 96 पदकांसह पदकतालिकेत अग्रस्थानी असून महाराष्ट्र 85 पदकांसह दुसऱ्या स्थानी आहे.
- ॲथलेटिक्समध्ये राज्याने आठ सुवर्ण, तीन रौप्य आणि एक कांस्यपदक मिळवले.
भारत-द. आफ्रिका क्रिकेट मालिकेत आफ्रिकेकडून भारताचा पराभव :
- रासी व्हॅन डर डसेन आणि डेव्हिड मिलर यांच्या अप्रतिम फलंदाजीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने पहिल्या ट्वेन्टी-20 क्रिकेट सामन्यात भारताचा सात गडी आणि पाच चेंडू राखून पराभव केला.
- दिल्ली येथे झालेल्या या सामन्यात भारताने दिलेले 212 धावांचे आव्हान पाहुण्या आफ्रिकेने 19.1 षटकांत गाठले.
- तर या विजयासह आफ्रिकेने पाच सामन्यांच्या या मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळवली.
दिनविशेष :
- 10 जून : महाराष्ट्र राज्य दृष्टीदिन.
- अॅक्रन, ओहायो येथे बॉब स्मिथ बिल विल्सन यांनी 10 जून 1935 रोजी अल्कोहोलिक्स अॅनॉनिमस या संस्थेची स्थापना केली.
- दुसरे महायुद्ध – नॉर्वेने जर्मनीसमोर 10 जून 1940 रोजी शरणागती पत्करली.
- दुसरे महायुद्ध – इटलीने फ्रान्स व इंग्लंडविरुद्ध 10 जून 1940 रोजी युद्ध पुकारले.
- 10 जून 1982 पासून दृष्टीदिन महाराष्ट्र राज्यात साजरा केला जातो.