10 January 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
10 January 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (10 जानेवारी 2019)
आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना 10 टक्के आरक्षणाचे विधेयक राज्यसभेत मंजूर :
- समाजातील आर्थिकदृष्ट्या दृर्बल घटकांच्या 10 टक्के आरक्षणाचे विधेयक राज्यसभेत बहुमताने मंजूर झाले.
- तर या विधेयकाच्या बाजूने 165 मते पडली तर 7 जणांनी याच्या विरोधात मते दिली. त्यामुळे आता राज्यसभेतही ते मंजूर झाल्यानंतर थेट राष्ट्रपतींकडे स्वाक्षरीसाठी पाठवण्यात येणार आहे. राष्ट्रपतींनी यावर सही केल्यानंतर त्याचे
कायद्यात रुपांतर होईल. - तर त्यासाठी राज्यघटनेमध्ये 124वी घटनादुरुस्ती करण्यात येणार आहे.
Must Read (नक्की वाचा):
अमेरिकेचे अफगाणिस्तान समेटदूत भारतात येणार:
- अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे अफगाणिस्तानविषयक दूत झालमय खलिलाझाद हे सध्या पाकिस्तानात चर्चा करीत असून ते भारतालाही भेट देणार आहेत.
- अफगाणिस्तानातील तालिबानी दहशतवादामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर राजकीय तोडगा काढण्यासाठी ते प्रयत्नशील असून खलिलाझाद हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करणार आहेत.
- अमेरिकी परराष्ट्र खात्याने म्हटले आहे की, भारत, चीन, अफगाणिस्तान व पाकिस्तान यांचे एक आंतरसंस्थात्मक शिष्टमंडळ तयार करून 8 ते 21 जानेवारी दरम्यान चर्चा केली जाईल, पण खलिलाझाद नेमके कुठल्या देशात कुठल्या
दिवशी असतील हे ठरलेले नाही.
7 सामन्यात घेतले तब्बल 65 बळी मोडला 44 वर्षांचा विक्रम :
- भारतीय संघ ऑस्ट्रेलियात मैदान गाजवत असताना भारतात रणजी करंडक स्पर्धेची धूम सुरु आहे. या रणजी स्पर्धेतील एकाच हंगामात सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रम बिहारच्या एका गोलंदाजाने केला आहे.
- बिहारचा 32 वर्षीय गोलंदाज आशुतोष अमन याने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत एका हंगामात सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रम केला आहे.
- तर यासह त्याने 44 वर्षांपूर्वीचा माजी कर्णधार बिशनसिंग बेदी यांचा विक्रम मोडला आहे.
- अमनने रणजी करंडक स्पर्धेच्या प्लेट गटातील आठ सामन्यांत तब्बल 65 गडी टिपले. या कामगिरीसह त्याने 44 वर्षांपासून बेदी यांच्या नावावर असलेला विक्रम मोडला.
- तर बेदी यांनी 1974-75 च्या हंगामात ६४ बळी टिपले होते.
दिनविशेष :
- 10 जानेवारी 1666 मध्ये सुरत लुटून शिवाजी महाराज राजगडाकडे निघाले.
- पुण्यातील शनिवारवाड्याच्या बांधकामास 10 जानेवारी 1730 मध्ये सुरुवात झाली.
- 10 जानेवारी 1806 मध्ये केपटाऊन येथे स्थायिक असलेले डच वसाहतवादी ब्रिटिशांना शरण गेले.
- 10 जानेवारी 1926 मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी हुतात्मा स्वामी श्रद्धानंदांच्या स्मरणार्थ श्रद्धानंद साप्ताहिक मुंबईत सुरू केले.
- भारत व पाकिस्तान यांच्यात 10 जानेवारी 1966 मध्ये ताश्कंद करार झाला.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा