10 फेब्रुवारी 2023 चालू घडामोडी – Current Affairs

रविचंद्रन अश्विन
रविचंद्रन अश्विन

10 February 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (10 फेब्रुवारी 2023)

देशातील उच्च शिक्षणाचा लेखाजोखा:

  • केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने अखिल भारतीय उच्च शिक्षण सर्वेक्षण (एआयएसएचई) हा अहवाल नुकताच जाहीर केला.
  • देशभरातील उच्च शिक्षण संस्थांकडून माहिती संकलित करून आकडेवारी जाहीर केली जाते. या आकडेवारीतून देशातील उच्च शिक्षणाचे चित्र स्पष्ट होते.
  • त्यानुसार 2020-21 मध्ये देशात उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी पहिल्यांदाच चार कोटींवर पोहोचल्याचे स्पष्ट झाले आहे.
  • तसेच मुलींच्या प्रवेशातही वाढ झाली.
  • विद्यार्थिसंख्येनुसार देशातील 10.98 टक्के विद्यार्थी महाराष्ट्रात होते.
  • विद्यार्थी संख्येच्या बाबतीत महाराष्ट्र देशात दुसऱ्या स्थानी आहे.
  • 16.7 टक्क्यांसह उत्तर प्रदेश अग्रस्थानी आहे.
  • सर्वाधिक महाविद्यालये असलेल्या राज्यांमध्ये उत्तर प्रदेशखालोखाल महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी आहे.
  • सर्वाधिक महाविद्यालये असलेल्या जिल्ह्यांमध्ये पुणे चौथ्या स्थानी आहे.
  • परदेशी विद्यार्थ्यांमध्ये कर्नाटक आघाडीवर असून, महाराष्ट्र तिसऱ्या स्थानी आहे.

अश्विनने तोडला कुंबळेचा विक्रम:

  • भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना नागपुरात खेळवला जात आहे.
  • त्याचबरोबर या कसोटी सामन्यात भारत प्रथम गोलंदाजी करत आहे.
  • बॉर्डर गावसकर ट्रॉफी अंतर्गत खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात रविचंद्रन अश्विनने भारतासाठी एक मोठा विक्रम केला आहे.
  • अश्विनने या मालिकेत पहिली विकेट घेताच एक अनोखा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
  • ऑस्ट्रेलियातील नागपूर कसोटीत टीम इंडियाचा स्टार फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने कांगारूंचा यष्टिरक्षक फलंदाज अ‍ॅलेक्स कॅरीला बॉलिंग देत कसोटी क्रिकेटमध्ये 450 बळी पूर्ण केल्या.
  • अनिल कुंबळेला मागे टाकून तो सर्वात जलद 450 कसोटी बळी घेणारा भारतीय ठरला आहे.
  • अश्विनने आपल्या 89व्या कसोटीतील 167व्या डावात गोलंदाजी करताना ही कामगिरी केली.
  • कसोटी क्रिकेटमध्ये 450 किंवा त्याहून अधिक कसोटी बळी घेणारा अश्विन हा अनिल कुंबळेनंतरचा जगातील नववा आणि दुसरा भारतीय गोलंदाज आहे.

मोहम्मद शमीने वॉर्नरला बोल्ड करत रचला इतिहास:

  • ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत मोहम्मद शमीने डेव्हिड वॉर्नरला क्लीन-बोल्ड करून इतिहास रचला.
  • मोहम्मद शमीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 400 बळी पूर्ण केले आहेत.
  • भारताकडून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विकेट घेणारा तो नववा गोलंदाज ठरला आहे.
  • या विकेटसह शमीही स्पेशल क्लबमध्ये देखील सामील झाला आहे.
  • मोहम्मद शमी 400 विकेट्स घेतल्यानंतर अनिल कुंबळे, झहीर खान, कपिल देव, हरभजन सिंग यांसारख्या दिग्गज गोलंदाजांच्या क्लबमध्ये सामील झाला आहे.
  • मोहम्मद शमी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 400 विकेट घेणारा जगातील 56 वा गोलंदाज बनला आहे.

चंद्रपॉल- ब्रॅथवेटने नोंदवला सर्वात अनोखा विक्रम:

  • वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे यांच्यातील पहिला कसोटी सामना पार पडला. हा सामना अनिर्णीत राहिला.
  • 145 वर्षांच्या कसोटी इतिहासात जे घडले नाही ते या सामन्यात घडले.
  • बुधवारी पहिल्या कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवशी अनोखा विक्रम रचला गेला.
  • हा विक्रम क्रेग ब्रॅथवेट आणि तेजनारायण चंद्रपॉल हे पाचव्या दिवशी खेळायला उतरताच निर्माण झाला.
  • त्या दोघांनी सलग पाच दिवस फलंदाजीसाठी उतरुन नवा विक्रम केला.

दिनविशेष :

  • जे. आर. डी टाटा हे 1929 मध्ये पहिले अधिकृत भारतीय वैमानिक बनले होते.
  • 1931 मध्ये भारताची राजधानी कोलकात्याहुन नवी दिल्ली येथे हलवली होती.
  • पुणे विद्यापीठाची स्थापना 1949 मध्ये झाली आहे.
  • गांधी-वध अभियोगातून 1949 मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांची निष्कलंक सुटका झाली होती.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.